Home /News /astrology /

Money Mantra - बिझनेसमध्ये नफा, कर्जातूनही होणार मुक्तता; आर्थिकदृष्ट्या तुमचा दिवस कसा जाणार पाहा

Money Mantra - बिझनेसमध्ये नफा, कर्जातूनही होणार मुक्तता; आर्थिकदृष्ट्या तुमचा दिवस कसा जाणार पाहा

भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (6 ऑगस्ट 2022) राशिभविष्य. मेष (Aries) : आज तुम्ही बिझनेसमध्ये चांगला नफा कमवाल. बराच काळ वादविवाद सुरू असलेल्या जमिनीमुळे तुमचा खर्च होईल. त्यामुळे तुम्हाला मानसिक अस्वस्थता येऊ शकेल. दैनंदिन उत्पन्न घटेल. वृषभ (Taurus) : आज कौटुंबिक खर्च खूप जास्त असतील. त्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. पगाराच्या कारणावरून तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार कराल. बिझनेसमध्ये आर्थिक नफा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला मुलांच्या शिक्षणावर अधिक खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. मिथुन (Gemini) : तुम्ही पार्टनरशिपमध्ये नवा बिझनेस सुरू करू शकता; मात्र पार्टनरशिप करण्यापूर्वी सर्व पैलूंचा विचार करा. कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळेल, खासकरून तुम्ही उद्योजक असलात तर... कोणालाही पैसे कर्जाऊ देताना काळजीपूर्वक विचार करा. कौटुंबिक उत्पन्न वाढेल. कर्क (Cancer) : तुम्ही प्रवासाला गेलात, तर तुम्हाला अनिच्छेने बरेच पैसे खर्च करावे लागतील. आज तुमच्या बिझनेसबद्दल कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना खूप काळजीपूर्वक विचार करणं गरजेचं आहे. तुम्हाला वाहनावर बराच खर्च करावा लागू शकेल. त्यामुळे तुमचं बजेट कोलमडू शकेल. सिंह (Leo) : आर्थिक व्यवहारांमध्ये तोटा सोसावा लागण्याची शक्यता आहे. छोटे छोटे खर्च होऊन तुमचं एकंदर बजेट बिघडू शकेल. काही वैयक्तिक कारणांवरून तुमचे कुटुंबीयांशी वाद होतील. ते वाद तीव्र होणार नाहीत, याची काळजी घ्या. कन्या (Virgo) : नवा बिझनेस आज खूप यशस्वी ठरेल; मात्र तुम्ही आज कोणताही नवा बिझनेस सुरू करू नये. दैनंदिन उत्पन्नाचा स्रोत तुम्हाला सापडेल; मात्र खर्चही वाढतील. आज अनेक आर्थिक चिंता सतावतील. तूळ (Libra) : आज प्रॉपर्टीच्या खरेदीसाठी तुम्हाला बँकेकडून कर्ज घेण्याची गरज भासू शकेल. आर्थिक विषयांत तुम्हाला काळजी घेण्याची, सावध राहण्याची गरज आहे. कौटुंबिक खर्च वाढतील. तुम्ही जुनी प्रॉपर्टी विकण्याची शक्यता आहे. तुमच्या भावंडाच्या आरोग्यासाठी तुम्हाला काही खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. वृश्चिक (Scorpio) : तुम्हाला आज मित्रांकडून पैसे उसने घ्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या गरजेच्या वस्तूंसाठी आज मोठा खर्च केला जाईल. तुम्हाला तुमच्या बचतीतूनही खर्च करावा लागण्याची शक्यता आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त अशा स्थितीमुळे आर्थिक परिस्थिती बिघडेल. धनू (Sagittarius) : बिझनेसमध्ये आज काही अडचणी येतील. त्यामुळे तुमच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल. आज तुमच्या वडिलांकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. पार्टनरशिप बिझनेसेसमध्ये चांगला नफा होण्याची शक्यता आहे. प्रवासामुळे पैसे वायफळ खर्च होतील. मकर (Capricorn) : बिझनेसमध्ये आज अधिक भांडवलाची गरज लागेल. त्यातलं उत्पन्न मात्र खूप चांगलं नसेल. छोट्या छोट्या गोष्टींवरच्या खर्चामुळे कौटुंबिक खर्च खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. हरवलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. घरखर्च अनपेक्षितपणे वाढण्याची शक्यता आहे. कुंभ (Aquarius) : आज तुम्ही तुमच्या मित्रांना आर्थिकदृष्ट्या मदत करू शकाल. बिझनेसमध्ये चांगला नफा होईल. गरज नसलेल्या ऐशोआरामाच्या गोष्टींवर तुम्ही खर्च करण्याची शक्यता आहे. जमिनीशी संबंधित कामातून चांगलं उत्पन्न मिळेल. कोर्टाशी संबंधित बाबींतून तुमचा बराच खर्च होईल. मीन (Pisces) : पूर्वजांच्या प्रॉपर्टीतून काहीही नफा होणार नाही. धार्मिक कार्यक्रमांसाठी पैसे खर्च केले जातील. आजोळकडची मंडळी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मोठी मदत करतील. तुम्हाला तुमच्या धाकट्या भावंडांना आज मदत करावी लागेल. जुन्या कर्जांतून तुम्ही मोकळे होऊ शकाल.
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या