मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

'ही' रास असेल तर तुमच्या अंगावर कर्जाचा बोझा पडणार; आर्थिकदृष्ट्या आजचं राशिभविष्य

'ही' रास असेल तर तुमच्या अंगावर कर्जाचा बोझा पडणार; आर्थिकदृष्ट्या आजचं राशिभविष्य

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक राशिभविष्य.

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं राशिभविष्य. भूमिका कलम या आंतरराष्ट्रीय ज्योतिषीतज्ज्ञ आणि टॅरो कार्ड रिडर आहेत. AstroBhoomi या विज्ञानाधारित ज्योतिषशास्त्राविषयी व्यासपीठाच्या संस्थापिका आहेत. ग्लोबल पीस अवॉर्डविजेत्या आहेत.

पुढे वाचा ...
  • Trending Desk
  • Last Updated :
  • Delhi, India

आर्थिक बाबींच्या दृष्टिकोनातून भूमिका कलम यांनी सांगितलेलं आजच्या दिवसाचं (1 ऑक्टोबर 2022) राशिभविष्य

मेष (Aries) : कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी असलेले नातेसंबंध दृढ होण्याची शक्यता आहे. बदल सहजपणे स्वीकारा. पैसे आणि नफा मिळेल. बिझनेसमध्ये प्रगती होईल.

उपाय : भगवान श्री गणेशाची पूजा करा.

वृषभ (Taurus) : न बोलताही तुम्हाला ऑफिसमध्ये चिंता सतावेल. आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. गरजा नियंत्रित करा. अन्यथा खर्च खूप वाढतील. एकाच वेळी दोन प्रोजेक्ट्सवर काम करू नका.

उपाय : श्री हनुमान मंदिरात बजरंग बाण स्तोत्रपठण करा.

मिथुन (Gemini) : बिझनेसमध्ये अडचण येण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये सूडाच्या भावनेने कोणतंही काम करू नका. प्रिय व्यक्तींशी वाद वाढण्याची शक्यता आहे. दिखाव्यासाठी केलेला खर्च कर्जाच्या खाईत नेऊ शकतो.

उपाय : सूर्यदेवाची पूजा करा.

कर्क (Cancer) : दीर्घ काळ रखडलेल्या प्रकल्पांमुळे मानसिक ताण येईल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. भावनेच्या भात वाहवत जाऊन कोणालाही वचन देऊ नका. त्याचा तुम्हाला भविष्यात पश्चात्ताप करावा लागू शकतो.

उपाय : भगवान श्री गणेशाला शेंदूर अर्पण करा.

सिंह (Leo) : आर्थिक अडचण टाळायची असेल, तर एकमेकांशी कोणतंही डील करू नका. अन्यथा तोट्याची शक्यता आहे. सातत्याने येत असलेल्या समस्यांमुळे तुमचा उत्साह, स्फूर्ती कमी असेल. व्यापाऱ्यांसाठी दिवस सर्वसाधारण असेल.

उपाय : गोशाळेला दान करा.

कन्या (Virgo) : ऑफिसमधलं उत्तरदायित्व वाढेल. नव्या व्यक्तींवर विश्वास ठेवण्याआधी सगळी माहिती काढा. अन्यथा तुम्ही कायदेशीर अडचणीत अडकण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस; मात्र तज्ज्ञाकडून सल्ला घेणं अत्यावश्यक.

उपाय : बुध ग्रहाशी निगडित वस्तू दान करा.

तूळ (Libra) : कायम वाढणाऱ्या गरजा तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अस्वस्थ करतील. तुम्हाला कदाचित कर्जही घ्यावं लागेल. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. व्यापाऱ्यांना फायदा मिळेल. तुमचे मुद्दे योग्य मार्गाने मांडा.

उपाय : मुंग्यांसाठी पीठ काढून ठेवा.

वृश्चिक (Scorpio) : कौटुंबिक समस्या वाढू शकतात. त्यामुळे ऑफिसमधल्या कामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या दोन्ही बाबी वेगवेगळ्या राखणं उत्तम. वेळेवर निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. नव्या रोजगार संधी तयार होत आहेत.

उपाय : प्राण्यांची सेवा करा.

धनू (Sagittarius) : आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. प्रिय व्यक्तींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. व्यापाऱ्यांनी शहाणपणाने निर्णय घ्यावेत.

उपाय : श्री सरस्वती देवीची आराधना करा.

मकर (Capricorn) : पैशांशी निगडित समस्या कायम राहतील. आर्थिक परिस्थितीबद्दल मनात चिंता असेल. गरजेच्या नसलेल्या खर्चांसाठी तुम्हाला कदाचित कर्ज घ्यावं लागण्याची शक्यता आहे. जमिनीत केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल.

उपाय : शिवलिंगावर अभिषेक करा.

कुंभ (Aquarius) : ऑफिसच्या कामाबद्दल विनाकारण चिंता सतावेल. मनात अस्वस्थता असेल. कौटुंबिक जीवनातही उलथापालथ होण्याची शक्यता आहे. उद्योजक/व्यावसायिकांसाठी आजचा दिवस निराशेचा असेल.

उपाय : भैरव मंदिरात ध्वज अर्पण करा.

मीन (Pisces) : रखडलेल्या कामांबद्दल चिंता वाटेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरीच्या शोधात असलेल्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

उपाय : श्रीसूक्ताचं पठण करा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Money, Rashibhavishya, Zodiac signs