मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

उत्साही, हजरजबाबी तर असतातच! मिथुन राशीच्या लोकांचे हे गुण गर्दीतही वेगळे दिसतात

उत्साही, हजरजबाबी तर असतातच! मिथुन राशीच्या लोकांचे हे गुण गर्दीतही वेगळे दिसतात

मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव

मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव

मिथुन राशीचे लोक मिलनसार मानले जातात. हे लोक स्वतःसोबत इतरांनाही आनंदी ठेवतात. ते कुठेही गेले तरी त्या ठिकाणी मोहिनी घालतात. त्यांचे सर्व गुण-दोष पाहुया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 17 नोव्हेंबर : ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीचे आयुष्य त्याच्या राशी चिन्हावर बरंच अवलंबून असतं. राशीवरून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे गुण-दोष ओळखता येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी सांगितल्या गेल्या आहेत. यातील आज आपण मिथुन राशीविषयी जाणून घेऊया, मिथुन राशीचे लोक मिलनसार मानले जातात. असे मानले जाते की हे लोक स्वतःसोबत इतरांनाही आनंदी ठेवतात. ते कुठेही गेले तरी त्या ठिकाणी मोहिनी घालतात. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन ही तिसरी राशी आहे. या राशीचा स्वामी बुध ग्रह मानला जातो. भोपाळचे ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी मिथुन राशीच्या लोकांबद्दल दिलेली खास माहिती जाणून घेऊया.

मिथुन राशीच्या लोकांचा स्वभाव -

ज्योतिष शास्त्रानुसार मिथुन राशीचे लोक शारिरीकदृष्ट्या चपळ आणि हजरजबाबी असतात. त्याच्या बौद्धिक क्षमतेचे अनेक लोक कौतुक करतात. मिथुन राशीचे लोक धार्मिक असतात आणि त्यांना इतरांबद्दल सहानुभूती असते. आपल्या प्रतिभेच्या जोरावर ते गर्दीतून वेगळे दिसतात. या राशीच्या लोकांमध्ये आत भरपूर राग असतो, पण बाहेरून ते तितकेच शांत दिसतात. त्यांना आपले ध्येय ठरवून काम करायला आवडते आणि ते पूर्ण करतात.

मिथुन राशीचे लोक शिस्तप्रिय -

मिथुन राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात मोठी उंची गाठतात. त्याचे विचार चांगले असतात. कोणतेही काम करण्याची त्यांच्या मनात उत्सुकता असते. ते आपले जीवन शिस्तबद्ध पद्धतीने जगतात. मिथुन राशीचे लोक जेवणाचे शौकीन असतात. ते मेहनती, प्रामाणिक आणि सहनशील असतात.

हे वाचा - हनुमानाची या रुपातील मूर्ती/फोटो घरात लावणं असतं शुभ; संकटांचा होतो नाश

मिथुन राशीवाल्याशी मैत्री - 

ज्योतिष शास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांची तुळ आणि कुंभ राशीच्या लोकांशी चांगली मैत्री होते. मिथुन राशीच्या लोकांची मानसिकताही चांगली असते. ती एक चांगली मुत्सद्दी व्यक्ती मानली जाते. नवनवीन गोष्टी शिकायला ते खूप पुढे असतात. याशिवाय ते आपल्या मजेदार स्वभावाने सर्वांना त्याच्याकडे आकर्षित करतात.

First published:

Tags: Rashibhavishya, Rashichark