मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Mars Transit: 5 राशींच्या व्यक्तींचं नशीब पालटणार; मंगळाचं राश्यांतर कुणाकुणाला फलदायी?

Mars Transit: 5 राशींच्या व्यक्तींचं नशीब पालटणार; मंगळाचं राश्यांतर कुणाकुणाला फलदायी?

5 डिसेंबर 2021 रोजी मंगळ (Mars) राशिपरिवर्तन करून वृश्चिक राशीत (Scorpio) प्रवेश करत आहे.

5 डिसेंबर 2021 रोजी मंगळ (Mars) राशिपरिवर्तन करून वृश्चिक राशीत (Scorpio) प्रवेश करत आहे.

5 डिसेंबर 2021 रोजी मंगळ (Mars) राशिपरिवर्तन करून वृश्चिक राशीत (Scorpio) प्रवेश करत आहे.

दिल्ली, 5 डिसेंबर: ज्योतिषशास्त्रात (Jyotish shastra) 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांना विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. या तीनही गोष्टी मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर होणारं ग्रहांचं राशिपरिवर्तन (Transit) महत्त्वपूर्ण मानलं जातं. 5 डिसेंबर 2021 रोजी मंगळ (Mars) राशिपरिवर्तन करून वृश्चिक राशीत (Scorpio) प्रवेश करत आहे. या राशीत मंगळ 4 जानेवारी 2022 पर्यंत असेल. वृश्चिक राशीत सध्या केतू असल्यानं मंगळाचं राशिपरिवर्तन अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. मंगळाच्या राशिपरिवर्तनाचा सर्वच राशींवर परिणाम दिसून येणार आहे. 12 पैकी 5 राशींना मंगळाचं वृश्चिक राशीतलं भ्रमण विशेष लाभदायक ठरणार असल्याचं ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी सांगितले आहे. याबाबतची माहिती `टीव्ही नाइन हिंदी`ने दिली आहे. मंगळ उद्या (5 डिसेंबर) शुक्राच्या तूळ राशीतून (Libra) वृश्चिक राशीत प्रवेश करत आहे. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असल्याने या राशी परिवर्तनाला विशेष महत्त्व आहे. मंगळाचं हे राशिपरिवर्तन मेष, मिथुन, सिंह, धनु आणि कुंभ या राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार असल्याचं ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे.

Chanakya Niti: दोन तर्‍हेचे लोक आयुष्यभर राहतात दुःखी; कधीच मिळत नाही यश

 कुंभ (Aquarius) राशीच्या व्यक्तींना मंगळाचं वृश्चिक राशीतलं भ्रमण विशेष फलदायी ठरणार आहे. या कालावधीत कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी चांगलं काम कराल. नोकरी बदलण्याचे योगदेखील आहेत. लवकरच उत्पन्नातही (Income) वाढ होईल. व्यापारात चांगला नफा मिळेल. भौतिक सुख वाढेल. हा कालावधी तुमच्यासाठी सर्वच बाबतीत अनुकूल असेल. कुटुंबातल्या लहान सदस्यांसोबत प्रवासाचे योग आहेत.
धनू (Sagittarius) राशीच्या व्यक्तींसाठी हा कालावधी करिअरच्या दृष्टिकोनातून शुभ आहे. कुटुंबाचं सहकार्य मिळेल. विवाह आणि धार्मिक यात्रांचे योग आहेत. जीवनात व्यग्रता वाढेल. जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल. या कालावधीत राजकीय चाली खेळल्यास अडचणी वाढू शकतात. स्पष्टता तुम्हाला तुमच्या बाजूने निकाल देईल.

प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात ‘या’ 4 राशींचे लोक

 सिंह (Leo) राशींच्या व्यक्तींसाठी पैशांची गुंतवणूक करण्याकरिता हा कालावधी उत्तम आहे. परंतु, संपत्तीबाबत वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे याबाबत धैर्य ठेवून संयमानं योग्य निर्णय घ्यावा. आर्थिक स्थिती चांगली होईल. प्रॉपर्टी खरेदीचा विचार करत असाल तर त्यात यश मिळेल. हृदयविकार असणाऱ्यांनी या कालावधीत तब्येतीची विशेष काळजी घ्यावी. कठीण प्रसंगी मित्रांकडून मदत मिळेल.
मिथुन (Gemini) राशीच्या व्यक्तींना या कालावधीत यश मिळेल. परीक्षेची तयारी करत असल्यास निकाल तुमच्या अपेक्षेप्रमाणे लागेल. मित्र आणि कुटुंबातल्या सदस्यांचं सहकार्य मिळेल. आत्मपरीक्षण करण्याची गरज भासेल. सर्व बाजूंनी सकारात्मक परिणाम प्राप्त होतील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. मंगळ हा मेष (Aries) आणि वृश्चिक या दोन राशींचा स्वामी आहे. त्यामुळे मंगळाचा वृश्चिक राशीत प्रवेश मेष राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरेल. कौटुंबिक आनंद मिळेल. मोठी कामं पूर्ण होतील. करिअरमध्ये चांगलं यश मिळू शकतं. पैशांच्या बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.
First published:

पुढील बातम्या