मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

मानसन्मानात वाढ अन् आर्थिक लाभ? कसा असेल तुमचा दिवस? वाचा आजचं राशिभविष्य

मानसन्मानात वाढ अन् आर्थिक लाभ? कसा असेल तुमचा दिवस? वाचा आजचं राशिभविष्य

 मानसन्मानात वाढ अन् आर्थिक लाभ? कसा असेल तुमचा दिवस? वाचा आजचं राशिभविष्य

मानसन्मानात वाढ अन् आर्थिक लाभ? कसा असेल तुमचा दिवस? वाचा आजचं राशिभविष्य

आज दिनांक 25 नोव्हेंबर 2022. शुक्रवार. तिथी मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया. आज चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात भ्रमण करेल. शुक्र चंद्र शुभ योग होईल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 25 नोव्हेंबर 2022. शुक्रवार. तिथी मार्गशीर्ष शुक्ल द्वितीया. आज चंद्र ज्येष्ठा नक्षत्रात भ्रमण करेल. शुक्र चंद्र शुभ योग होईल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

सध्या मानसन्मानात वाढ ,आर्थिक लाभ कार्यक्षेत्रात संधी असा काळ आहे. मात्र आज भाग्य तुमच्या सोबत राहणार नाही. खर्च होईल. प्रकृती अस्वास्थ्य जाणवेल. मध्यम दिवस .

वृषभ

आज सप्तम स्थानात चंद्र भ्रमण आहे , तुम्हाला घरगुती जीवनात अनेक नवीन प्रस्ताव येतील. कार्यक्षेत्रात लाभ होईल. नातेवाईक भेट असा हा दिवस आहे. प्रकृती आणि मनस्वास्थ्य सांभाळा.

मिथुन

आज व्यवसाय आणि कुटुंबीय ही तुमची प्राथमिकता असेल. कार्यालयीन कामकाज,काही घरासाठी विशेष वस्तू तुम्ही खरेदी कराल. प्रकृती जपा. दिवस शुभ.

कर्क

दिवस काही महत्वाचे व्यवहार घडवून आणेल . घरात काम निघेल. मात्र त्यात अडचणी येतील. खर्च झाला तरी प्राप्ती होईल. महत्वाचे संपर्क होतील. संततीला जपा. भाग्य कारक दिवस आहे.

सिंह

आज कुठूनतरी सामाजिक कार्यक्रमात भाग घेण्याचे योग येतील. संततीचे सुख चांगले असून शेजाऱ्यांशी सांभाळून वागा. घरात ,कामात वाढ होईल.आर्थिक गणित जुळून येतील. दिवस मध्यम आहे.

कन्या

घरामध्ये किंवा सामाजिक जीवनात यश मिळेल. शांत रहा. तुमचा हेवा वाटणारे लोक फायदा घेतील. प्रवास आणि व्यवसायात लाभ संभवतात. वैवाहिक सुख मिळेल. दिवस उत्तम.

तुला

चंद्राचे द्वितीय स्थानातून भ्रमण आणि सप्तम राहू आज जपून राहण्याचे संकेत देत आहे.आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला असेल. काही अचानक खर्च होईल. प्रकृती सांभाळा . दिवस शुभ.

वृश्चिक

सप्तम मंगळ घरामध्ये काही तरी ताण निर्माण करेल. सूर्य राशी स्थानात असून आर्थिक व्यय होतील. राशीतील चंद्र व पंचमातील गुरू मनःशांती देईल. दिवस शुभ.

धनु

आज घरातील महत्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. वैवाहिक जीवनात कलह टाळा .खर्च होतील . दिवस शुभ.

मकर

आज दिवस शुभ असून भाग्य जोरात आहे. राहू आरोग्य समस्या निर्माण करील. घरामध्ये अधिकार गाजवाल. बंधू भेटीचा लाभ होईल. प्रवास योग येतील. दिवस शुभ .

कुंभ

दिवस आनंद दायक आहे. शांत रहा. आर्थिक उलाढाली होतील. होणाऱ्या खर्चाला आवर घाला. घराकडे लक्ष द्यावे लागेल. संतती सुख मिळेल कुटुंब सुख लाभेल. दिवस मध्यम.

मीन

व्यवसाय,आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींना शुभ लाभ मिळतील. वैवाहिक सुख मिळेल. सध्या गुरू शुभ असल्याने काही तरी धार्मिक कार्यक्रम कराल. दिवस चांगला.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya