मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

राशिभविष्य : मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारीच गुरूही होत आहे मार्गी; मिळणार चांगलं फळ

राशिभविष्य : मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारीच गुरूही होत आहे मार्गी; मिळणार चांगलं फळ

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज मार्गशीर्ष मासारंभ होत असून आज देव दीपावली आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

आज दिनांक 24 नोव्हेंबर 2022. गुरूवार. आज मार्गशीर्ष मासारंभ होत असून आज देव दीपावली आहे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत होणार आहे. आज मार्गी होणारे गुरू महाराज सर्व राशींना सुखद फळ देतील. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज चंद्र अष्टम स्थानात असून मानसिक अस्थिरता निर्माण होईल. तृतीय स्थानातील मंगळ प्रवासात काळजी घ्या असं सुचवत आहे. आर्थिक लाभ होतील. शुभ दिवस.

वृषभ

सप्तम स्थानात चंद्र आज शुभ वार्ता देईल. थोडी दगदग होईल. गृह सौख्य मिळेल. मित्रमैत्रिणींना भेटण्याचा, सामाजिक जीवनात जोडीदारासोबत आनंद घेण्याचा उत्तम दिवस आहे.

मिथुन

कार्यक्षेत्रातील वाढती जबाबदारी तुम्हाला फलदायी ठरेल. जोडीदाराशी संबंध सुधारतील. आर्थिक घडामोडी होतील. आज काही महत्त्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. दिवस शुभ.

कर्क

पंचम स्थानात चंद्र असून कौटुंबिक गोष्टीत मन रमेल. संततीसंबंधी शुभ काळ. व्यय मंगळ आहे. काहीसा तणाव वाटेल. प्रवास होतील. आर्थिक लाभ होतील. एकूण दिवस समाधानात जाईल.

सिंह

आज चंद्राचा दिवसावर अनुकूल प्रभाव पडेल. फार ताण घेऊ नका. कार्यालयात जास्तीचं काम पडेल. कुटुंबीय भेटतील. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम जाईल.

कन्या

तृतीय स्थानातील चंद्र कामात वाढ करेल. खरेदीसाठी बाहेर जाण्याचं ठरेल. खर्च होईल. प्रवास योग येईल. घरगुती कार्यक्रम होईल. आनंद आणि उत्साहात दिवस पार पडेल.

तूळ

आज चंद्र उत्तम प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. शिक्षण आणि कार्यक्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक लाभ होतील. संततीसाठी भाग्यदायक योग. दिवस चांगला.

वृश्चिक

जोडीदारासाठी काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. सामाजिक जीवनात यश मिळेल. भाग्य उदयास येईल. आर्थिक लाभ होतील. व्यावसायिक शिक्षणासाठी काही खर्च होईल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस.

धनु

आज कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. व्यय स्थानातील चंद्र घरगुती बाबीत खर्च देईल. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. वैवाहिक जीवनात विशेष काळजी घ्या. दिवस शुभ.

मकर

घरामध्ये काही नवीन घटना, महत्त्वाचे फोन असा हा दिवस आहे. आर्थिक व्यय होतील. संततीसोबत मजेत एकत्र दिवस घालवा. मार्गी शनी ताण देईल. दिवस मध्यम.

कुंभ

आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. चंद्र भ्रमण सर्व बाजूने मदत करेल. काही कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. संततीला वेळ द्या. कार्यक्षेत्रात यश. प्रकृती जपा. दिवस शुभ.

मीन

भाग्य स्थानातील चंद्र मन स्वास्थ्य देईल. शुभ घटना घडतील. मात्र दिवस एकूण खूप गडबडीत जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. उत्तम असा दिवस आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya