मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

सुख-समृद्धीसाठी मार्गशीर्ष अमावास्येला ऐकावी 'ही' कथा

सुख-समृद्धीसाठी मार्गशीर्ष अमावास्येला ऐकावी 'ही' कथा

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पूजेवेळी अमावास्या व्रताची कथा ऐकल्यास अखंड सौभाग्य आणि सुखप्राप्ती होते असं म्हणतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई २२ नोव्हेंबर : देशात कालगणनेसाठी उत्तर आणि दक्षिण भारतात वेगवेगळ्या हिंदू पंचांगांचा वापर केला जातो. उत्तरेकडील राज्यांमध्ये उत्तर भारतीय पंचांग वापरतात. या पंचांगानुसार, मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्या बुधवारी (23 नोव्हेंबर) आहे. दक्षिण भारतीय पंचांगानुसार ही कार्तिक अमावास्या मानली जाते. मार्गशीर्ष अमावस्येला स्नान, दान, व्रत आणि पूजा-विधी केल्याने पुण्य प्राप्त होतं. पूजेवेळी अमावास्या व्रताची कथा ऐकल्यास अखंड सौभाग्य आणि सुखप्राप्ती होते. अमावस्येच्या कथेविषयी माहिती तिरुपतीचे ज्योतिषाचार्य डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून जाणून घेऊया.

अशी आहे अमावास्येची कथा

एका गावात एक गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते. या कुटुंबात एक सुंदर मुलगी होती. पण तिचा विवाह होत नव्हता. एकेदिवशी एक साधू या ब्राह्मणाच्या घरी आला. या मुलीच्या सेवेमुळे तो प्रसन्न झाला आणि त्याने तिचा हात पाहिला. या मुलीच्या हातावर विवाह रेषा नसल्याचं या साधुनं सांगितलं.

साधु म्हणाला की, एका गावात सोना धोबीण आहे. जर या मुलीनं तिची सेवा केली आणि तिनं हिच्या विवाहावेळी आपल्या भांगेतील सिंदूर (कुंकू) या मुलीच्या कपाळावर लावलं तर हिच्या नशीबातील वैधव्य योग दूर होईल. तेव्हा ब्राह्मण पित्याने आपल्या मुलीला सोना धोबीणीची सेवा करण्यास सांगितलं. वडिलांच्या सांगण्यानुसार, ही मुलगी रोज सकाळी सोना धोबीणीच्या घरी जात असे आणि तिच्या घराची स्वच्छता तसंच अन्य कामं करून घरी परतत असे.

आजकाल तू घरातील सर्व कामं फार लवकर उरकतेस. कामं कधी पूर्ण होतात कळतही नाही, असं एक दिवशी सोना धोबीण तिच्या सुनेला म्हणते. यावर सून तिला सांगते की मी घरातली कामं करत नाही. घरातली सगळी कामं कोण करतं मलाही माहिती नाही. यावर दुसऱ्या दिवशी सून आणि सासू घराकडे लक्ष ठेवण्यास सुरुवात करते.

बरेच दिवस गेल्यानंतर एकेदिवशी सोना धोबीण त्या मुलीलीापकडते आणि तू इतके दिवस माझ्या घरातली सर्व कामं का करत आहेस? असं विचारते. तेव्हा ती मुलगी सोना धोबीणीला संपूर्ण गोष्ट सांगते.

ज्यादिवशी सोना धोबीण त्या मुलीच्या कपाळावर आपलं कुंकू लावते, त्याचवेळी तिच्या दीर्घकाळ आजारी असलेल्या पतीचा मृत्यू होतो. ब्राह्मण कुटुंबाच्या घरून परतत असताना सोना धोबीण वाटेत पिंपळाच्या झाडाला 108 विटांचे तुकडे अर्पण करत 108 प्रदक्षिणा घालते. त्यानंतर पाणी पिते. त्या दिवशी तिला निरंकार उपवास घडलेला असतो.

अशातच पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताच तिचा पती पुन्हा जीवित होतो. त्या दिवशी सोमवती अमावास्या असते. धर्मशास्त्रानुसार, जी महिला सोमवती अमावस्येपासून प्रदक्षिणा घालण्याचे व्रत सुरू करते आणि प्रत्येक अमावस्येला प्रदक्षिणा घालते तेव्हा तिच्या सुख आणि सौभाग्यात वृद्धी होते.

First published:

Tags: Marathi news, Rashibhavishya