मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

दैनंदिन राशिभविष्य : आज फाल्गुन अमावस्या; जाणून घ्या सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस

दैनंदिन राशिभविष्य : आज फाल्गुन अमावस्या; जाणून घ्या सर्व राशींसाठी कसा असेल आजचा दिवस

Horoscope 31 March 2022 : दुपारी 12 नंतर फाल्गुन अमावस्या प्रारंभ होईल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

Horoscope 31 March 2022 : दुपारी 12 नंतर फाल्गुन अमावस्या प्रारंभ होईल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

Horoscope 31 March 2022 : दुपारी 12 नंतर फाल्गुन अमावस्या प्रारंभ होईल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 31 मार्च 2022. वार/गुरुवार. आज फाल्गुन कृष्ण चतुर्दशी. दुपारी 12 नंतर फाल्गुन अमावस्या प्रारंभ होईल. आज चंद्र मीन राशीत प्रवेश करेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष आज मानसिक आंदोलने होतील. कुटुंबियांच्या मताला किंमत द्या. कार्यक्षेत्रात परदेश संबंधी घटना घडतील. हातून विशेष पूजा घडेल. दिवस मध्यम. अमावस्या आर्थिक ताणाची जाईल. वृषभ आज दिवस लाभदायक असून महत्वाचे निरोप मिळतील. प्रवास योग येतील. पण काळजी घ्या. वडीलधारी व्यक्ती मदत करेल. अमावस्या काळात सावध रहा. दिवस शुभ. मिथुन काळजीपूर्वक राहण्याचा दिवस. आर्थिक लाभ होईल. मात्र खर्चदेखील भरपूर होईल. घरात काही तणावाची स्थिती राहील. महत्त्वाचे निर्णय टाळा. दिवस मध्यम. कर्क आज प्रकृती ठिक राहिल. व्यवसायात प्रगती होईल. जोडीदाराची काळजी घ्या. ईश्वराची उपासना सर्व संकटातून मार्ग काढेल. अमावस्या मानसिक ताण देईल. दिवस मध्यम. सिंह शत्रू डोकं वर काढण्याचा प्रयत्न करतील. पण शनी मंगल त्यांचा प्रयत्न हाणून पाडतील. चंद्र आर्थिक नुकसान दाखवत आहे. गुरू कृपा मार्ग दाखवेल. आरोग्य चिंता वाटेल. दिवस उत्तम. कन्या जोडीदाराला नवीन संधी प्राप्त होतील. मुलांची अनाठायी चिंता वाटेल. आर्थिक आणि शारीरिक चिंता कमी होतील. नाम जप आणि पूजन करा. दिवस उत्तम. तूळ गृह, नवीन वाहन याचे योग येतील. कुठेही अनावश्यक धाडस करू नये. कार्यक्षेत्रात विशेष घटना घडतील. आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचा निर्णय आज नको. दिवस बरा. वृश्चिक आज अचानक संतती संबंधी काही काळजी वाटेल. फिरायला जाणे होईल. पण मन अशांत राहिल. वादविवाद टाळा. दिवस मध्यम. धनु आज अनेक ठिकाणाहून जबाबदाऱ्या येतील. आर्थिक चिंता दूर झाली तरी खर्च जपून करा. कुटुंब सुख लाभेल. अमावस्या गृह चिंतेची. दिवस मध्यम. मकर राशीतील ग्रह अनेक संमिश्र फळ देणार आहेत. फार ताण घेऊ नका. डोकेदुखीचा त्रास होईल. जोडीदाराला शुभ काळ. आर्थिक प्राप्ती चांगली राहिल. दिवस उत्तम. कुंभ जपून रहा. फार महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करा. आर्थिक कामं पूर्ण होतील. धार्मिक कार्यात वेळ जाईल. देवदर्शन घडेल. दिवस मध्यम. मीन कुटुंबियांच्या समवेत दिवस जाईल. काही तरी विशेष करून दाखवाल. लोकांमध्ये तुमच्या नावाची चर्चा होईल. संततीला आर्थिकदृष्ट्या शुभ दिवस आहे. उपासना करा. अमावस्या हुरहूर लावणारी ठरेल. शुभम भवतु!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या