मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

कौटुंबिक आयुष्यात बरंच काही घडणार; तुमच्या राशीनुसार आजचं भविष्य

कौटुंबिक आयुष्यात बरंच काही घडणार; तुमच्या राशीनुसार आजचं भविष्य

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज आहे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

आज दिनांक 24 सप्टेंबर 2022. वार, शनिवार. आज आहे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी. आज चंद्र सिंह राशीत भ्रमण करेल. उत्तर रात्री 3 वाजून 12 मिनिटानंतर अमावास्या प्रारंभ होईल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीच्या पंचम स्थानात चंद्र ही धार्मिक क्षेत्रात नवीन संधी आणेल. कुटुंबात मतभेद होतील. षष्ठ स्थानात आलेला शुक्र शुभ घटनांची सुरुवात करेल. कला प्रकारात रुची निर्माण होइल. दिवस शुभ. वृषभ नवम स्थानात आलेला शनी कार्य क्षेत्रात एखाद्या व्यक्ती मुळे मनस्ताप दाखवत आहे. एक प्रकारचा अडथळा प्रत्येक कामात येईल. प्रवास योग येतील. चंद्र गुरू गृहसौख्यात वाढ करेल. दिवस शुभ. मिथुन मिथुन लग्न आणि रास असलेल्या व्यक्तींनी दशम गुरूचा उत्तम अनुभव घ्यावा. गुरू अनुकूल आहे. घरासाठी शुभ योग येतील. शुक्र सौंदर्य दृष्टी देईल. भावंडाना उत्तम योग. दिवस उत्तम. कर्क राशीच्या सप्तमात शनी आणि दशम राहू काळजी घ्या असं सुचवत आहे. प्रकृती सांभाळा. कामाची जबाबदारी वाढेल. द्वितीय चंद्र आर्थिक, सामाजिक लाभ देईल. दिवस चांगला. सिंह आजचे चंद्र भ्रमण राशी स्थानात आहे. कार्यक्रमात सहभाग घ्याल. काळ सावधगिरीने राहण्याचा आहे. आर्थिक भरभराट होईल. घराकडे विशेष लक्ष द्या. मध्यम दिवस. कन्या व्ययस्थानात येणारे चंद्र भ्रमण आर्थिक नुकसान, प्रकृतीची कुरकुर असे संकेत देत आहे. अष्टमात राहू आहे, स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. राशीत येणारा शुक्र शुभ घटनांची सुरुवात करेल. दिवस मध्यम. तूळ गृहसौख्य, घरात मोठ्या दुरुस्त्या, खर्च असा हा काळ आहे. आर्थिक प्राप्ती होईल. जोडीदाराच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. व्यय शुक्र खर्च वाढ करेल. दिवस आनंदी राहिल. वृश्चिक संतती तुमच्यावर खुश होईल. त्यांना काही संधी येतील. प्रवासात त्रास, नुकसान संभवते. बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. दिवस मध्यम. धनु भाग्य चंद्र आज उत्कृष्ट फळ देईल. मात्र शनी आर्थिकदृष्ट्या सांभाळून राहावं असं सांगत आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग. कुटुंबात काही समस्या निर्माण होतील. सावध राहा. दिवस बरा. मकर सर्वार्थाने दक्ष राहण्याचा काळ आहे. मंगळ, चतुर्थ राहू कुठल्याही कामात अडथळे आणतील. भांडण तंटा होऊ नये म्हणून सावध रहा. प्रवास योग येतील. दिवस मध्यम. कुंभ राशीच्या सप्तम स्थानात चंद्र म्हणजे कुटुंबात महत्त्वाच्या घटना किंवा आर्थिक क्षेत्रात यश असे योग आणतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. तृतीय राहू महत्त्वाचे निरोप आणेल. दिवस उत्तम. मीन शनी नुकसानीपासून सावध रहा असं सांगत आहे. संतान चिंता वाटेल राशीतील गुरू अचानक आर्थिक लाभ देतील. मन धार्मिक क्षेत्राकडे झुकेल. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या