मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

आर्थिक लाभ होतील पण प्रकृतीला जपा; सविस्तर वाचा आजचं राशिभविष्य

आर्थिक लाभ होतील पण प्रकृतीला जपा; सविस्तर वाचा आजचं राशिभविष्य

राशिभविष्य.

राशिभविष्य.

आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

आज दिनांक 07 ऑक्टोबर 2022 वार. शुक्रवार. आज आश्विन शुक्ल द्वादशी. आज चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज लाभ स्थानातील चंद्र भ्रमण बरे असून काही ताण असेल तर विचलित होऊ नका. राहू धार्मिक आस्था निर्माण करील. वैवाहिक जीवन सुखद, आनंदी राहिल. घरात जास्तीची कामं निघतील. दिवस शुभ.

वृषभ

राशीच्या दशम स्थानातील चंद्र आज व्यावसायिक लाभ देईल. प्रकृती ठिक राहिल. भाग्य स्थानातील शनी अनुकूल असून व्यय राहू अनाठायी खर्च देईल. प्रवास सुखकर राहिल. शुभ दिवस.

मिथुन

आज भाग्य स्थानातील चंद्र संतती आणि सामाजिक जीवनात शुभ आहे. खर्च होतील. प्रकृतीची काळजी घ्या असं ग्रह सुचवत आहे. दिवस चांगला जाईल.

कर्क

चंद्र आज गृहक्षेत्रात विशेष घडामोडी घडवून आणेल. आर्थिक लाभ संभवतो. तुमच्यावर नवीन जबाबदारी येईल. सूर्य बुध तेज निर्माण करतील. शत्रूपासून जपा. दिवस मध्यम.

सिंह

आज दिवस अनेक घटना घडवणारा आहे. आज मन आनंदी राहिल. जोडीदार खूश होईल. दिवस आर्थिक उलाढाल घडवेल. शत्रू नाश होतील प्रवास घडतील. दिवस उत्तम.

कन्या

आज दिवस उत्तम असून प्रकृती ठिक असेल. घरामध्ये भरपूर काम कराल. नातेवाईक भेट होईल. आर्थिक प्राप्तीचे योग येतील. संततीची काळजी घ्या. दिवस बरा आहे.

तूळ

पंचम स्थानात चंद्र व्यावसायिक जीवनात आनंद निर्माण करेल. महत्त्वाची खरेदी कराल. आर्थिकदृष्ट्या कष्ट. घरात काही विशेष घटना घडतील. दिवस मध्यम आहे.

वृश्चिक

चंद्र भ्रमण प्रकृतीच्या तक्रारी निर्माण करेल. आर्थिक घडामोडी, अध्यात्मिक व्यक्तींची भेट घडवून आणेल. घरावर आणि स्वतःवर वेळ आणि पैसा खर्च कराल. अनपेक्षित अडचणी येतील. दिवस मध्यम.

धनु

चंद्र भ्रमण आज कौटुंबिक जीवनात कलह देईल. कार्यक्षेत्रात मंगळ मतभेद करील. तृतीय चंद्र प्रवासाचे संकेत देत आहे. भावंडांशी संपर्क होईल. दिवस मध्यम.

मकर

धन स्थानातील चंद्र भ्रमण व्यवसाय, कार्यक्षेत्रात अनपेक्षित काम आणेल. आर्थिक लाभ होईल. राहू खर्चाचे नवीन मार्ग तयार करील. तसंच प्रप्तीही वाढेल. दिवस चांगला आहे. .

कुंभ

चंद्र राशी स्थानात आहे. शनी व्यय स्थानात खर्चाचे मार्ग निर्माण होतील. मात्र आर्थिक लाभ देखील मिळतील. भाग्यदायक योग येतील. दिवस उत्तम जाईल.

मीन

कौटुंबिक ताण देणारा हा दिवस आहे. समारंभ होईल. पण थोडं तणाव पूर्ण वातावरण राहिल. वैवाहिक जीवन कष्टदायक राहिल. प्रकृती जपा. दिवस मध्यम आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs