मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

आर्थिक लाभ होतील पण जपून राहा; काय घडेल आज वाचा राशिभविष्य

आर्थिक लाभ होतील पण जपून राहा; काय घडेल आज वाचा राशिभविष्य

राशिभविष्य (फोटो सौजन्य - Canva)

राशिभविष्य (फोटो सौजन्य - Canva)

मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी/ नवमी. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

आज दिनांक 01 डिसेंबर 2022 वार गुरूवार. मार्गशीर्ष शुक्ल अष्टमी/ नवमी. चंद्र कुंभ राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

लग्नेश मंगळ वक्री विनाकारण चिंता वाढवेल. अष्टम बुध सूर्य नकारात्मक घटना घडवतील. वक्री मंगळ आर्थिक काळजी घ्या असे संकेत देत आहे. शारीरिक, मानसिक ताण घेऊ नका. लाभ चंद्र उत्तम फळ देईल.

वृषभ

आज दशम स्थानात चंद्राचे भ्रमण शुभ फळ देईल. कुटुंबात महत्त्वाचे निर्णय होतील. आर्थिक लाभ होतील. व्यय राहू काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय उत्तम राहिल. दिवस शुभ आहे.

मिथुन

राशी स्वामी बुध सूर्य सोबत शष्ठ स्थानात आहे. सरकारी काम, कार्यालयीन कामकाज वाढेल. शुक्राचे भ्रमण मातुल घराण्याकडून लाभ घडवेल. भाग्य चंद्र आहे, शुभ कार्य होतील. दिवस चांगला.

कर्क

आज अष्टम स्थानात चंद्र असून काही संकेत मिळतील. भाग्य स्थानात गुरू धार्मिक आस्था वाढवेल. सप्तम शनी जपून रहा असं सुचवत आहे. खंबीर रहा. दिवस मध्यम आहे.

सिंह

आज चंद्र भ्रमण सप्तम स्थानात असून प्रकृती नरम गरम राहील. मन थोडे चिंतित राहील. पण काळजी नको. गुरूची उपासना करीत रहा. लवकरच शुभ संकेत मिळतील. दिवस चांगला.

कन्या

षष्ठ स्थानातील चंद्र आर्थिक, घरगुती कामात यश देईल. आज दिवस कार्यालयीन जीवनात काही विशेष घडेल असा आहे. संततीसाठी खरेदी कराल. हाताने शुभ काम होईल. दिवस उत्तम.

तूळ

चंद्राचे भ्रमण पंचम स्थानात आहे. खूप काम येईल असे संकेत आहेत. कुटुंबाशी मतभेद होऊ शकतात. संततीसाठी आर्थिक व्यवहार होतील. घराचे सुख लाभेल. शांततेत दिवस घालवा.

वृश्चिक

काही आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मन आनंदी राहील. घर ही तुमची प्राथमिकता राहील. प्रकृती जपा. वक्री मंगळ सावध राहा असा इशारा देत आहे. दिवस मध्यम आहे.

धनु

आज दिवस घरातल्या विशेष कामांसाठी खर्च होईल. काही जबाबदाऱ्या येतील तरी मध्यम दिवस आहे. वैवाहिक जीवनात कलह टाळा. आर्थिक दृष्ट्या कठीण. प्रवास होतील. पण जपून रहा.

मकर

द्वितीय चंद्र तुम्हाला व्यावसायिक खर्चाला समोर जायला लावेल. आर्थिक प्राप्ती होईल. सामाजिक जबाबदारी घेण्याचे योग आणेल. दिवस मध्यम.

कुंभ

आज विशेष घडामोडीचा दिवस आहे. अचानक होणारे लाभ प्रसन्न करतील. कायदा मोडू नका. अन्यथा कारवाईला समोर जावे लागेल. संततीला जपा. दिवस मध्यम.

मीन

राशीच्या व्यय स्थानातील चंद्र भरपूर काम देईल. जास्तीचे खर्च करावे लागतील. भटकंतीचे योग येतील. घरात पाहुणे येण्याची शक्यता आहे. प्रकृती नाजूक राहील. दिवस मध्यम आहे.

शुभम भवतू!!

First published:

Tags: Astrology and horoscope, Horoscope, Lifestyle, Rashibhavishya