Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : जोडीदारासोबत मतभेद, भावंडांशी वाद; या राशींच्या कुटुंबात कलह होणार

दैनंदिन राशिभविष्य : जोडीदारासोबत मतभेद, भावंडांशी वाद; या राशींच्या कुटुंबात कलह होणार

Horoscope 23 June 2022 : आज या राशींच्या व्यक्तींनी सांभाळूनच राहावं.

आज दिनांक 23 जून 2022. वार गुरुवार. आज ज्येष्ठ कृष्ण दशमी. आज चंद्र दिवसभर रेवती नक्षत्रात आहे. पाहूया आजचे राशी भविष्य. मेष राशीच्या व्यय स्थानात आलेला चंद्र गुरू अनेक इच्छा आकांक्षा जागृत करेल. त्यावर मेहनत करून यश प्राप्त होईल. शुक्र आज खरेदीचे योग आणणार आहे. बरा दिवस. वृषभ राशीच्या लाभ स्थानात आलेला मंगळ अती शुभ असून अनेक नव्या संधी प्राप्त करून देईल. व्यवसायात उत्तम प्राप्ती होईल. अनेक लाभ होतील. दिवस उत्तम. मिथुन चंद्रगुरू योग दशम स्थानात असून मन कार्य करण्यास उत्सुक होईल. प्रवास, भेटीगाठी होतील. आर्थिक व्यय होण्याचे संकेत आहेत. प्रकृती जपा. दिवस मध्यम. कर्क अष्टम स्थानात वक्री शनी सावध राहा असे संकेत देत आहे. चंद्र आज भाग्य स्थानात असून शुभ संकेत देत आहे. दिवस उत्तम आहे. सिंह राशीच्या व्यक्तींचा जोडीदारासोबत मतभेद होण्याचे संकेत आहेत. जपून रहा. मित्र मंडळीपासून अनेक लाभ होतील. दिवस मध्यम. कन्या सहावा शनी आणि सप्तम गुरू चंद्र एकूण शुभ फळ देण्यास सज्ज आहे. कार्यक्षेत्रात भरपूर संधी मिळतील. विजय तुमचाच होईल. दिवस शुभ. तूळ आज दिवस शुभ असून भाग्य उदय होईल. अचानक कुठून तरी चांगली बातमी मिळेल. उच्च शिक्षण आणि संततीसाठी शुभ दिवस आहे. वृश्चिक आज दिवस अतिशय जपून राहण्याचा आहे. गृह सौख्य, जोडीदार, संतती याबाबत सांभाळून राहा. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस मध्यम फळ देईल. धनु तृतीय स्थानात वक्री शनी भावंडांशी मतभेद घडवून आणेल. लांबचे प्रवास योग येतील. माहिती मिळेल. साहसी आणि कठोर स्वभाव होईल. जोडीदारासोबत दिवस घालवा. मकर आता जरा शांतता आणि स्थैर्य मिळेल. मंगळ मीन राशीत चंद्रासोबत असून आर्थिक ताण राहिल आणि कौटुंबिक कलह होतील. दिवस मध्यम. कुंभ राशी मध्ये वक्री शनी आहे. अचानक स्वभावात तेज येईल. कार्य करण्याची इच्छा होईल. संतती त्रास देऊ शकते. आर्थिक घडामोडी होतील. दिवस उत्तम आहे. मीन व्यय स्थानात शनी आणि राशीत गुरू चंद्र अशी ग्रहस्थिती खर्च आणि शारीरिक कष्ट दाखवत आहे. आज घरात शांत रहा. जास्तीची काम येतील. दिवस मध्यम. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या