मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Daily Horoscope : एक फोन कॉल आणि सर्वकाही बदलेल; सविस्तर वाचा तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope : एक फोन कॉल आणि सर्वकाही बदलेल; सविस्तर वाचा तुमचं राशिभविष्य

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

आज तुम्हाला आलेला एक फोन तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरेल. सूर्यराशीनुसार तुमच्यासोबत आज दिवसभर काय काय घडणार पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 10 ऑगस्ट 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) आज बऱ्याच दिवसांनंतर मनाची शांती लाभेल. एखाद्या नव्या योजनेवर काम सुरू कराल. रखडलेली कामं पूर्ण करण्याचा आजचा दिवस आहे. LUCKY SIGN – Old Favourite Shirt/Dress वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्या ऑफरबद्दल विचार करण्यात दिवसाचा बराचसा वेळ जाईल. भावनिक होणं टाळा. भूतकाळातल्या काही गोष्टींमध्ये सुधारणा करता येईल. LUCKY SIGN – A Classic Novel मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) एखादी नवीन कल्पना पुढचे काही महिने तुमच्या डोक्यात रेंगाळेल. त्यावर काम करणं योग्य ठरेल. तुम्ही एकांत शोधण्याचा प्रयत्न करा. तेलकट खाणं टाळा. LUCKY SIGN – An Unstable furniture कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) काही वेळा वरून दिसणारे संकेत तुमचे लक्ष वेधून घेण्याइतके स्पष्ट नसतात. आयुष्यात तुम्हाला असे कित्येक संकेत मिळत आहेत, त्यानुसार एखाद्या गोष्टीबाबत निर्णय पक्का करा. एखादी महिला मित्र वेळेवर चांगला सल्ला देऊ शकते. LUCKY SIGN – Colourful Pebbles सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आजचा दिवस साधारण वाटेल मात्र मोठ्या प्रमाणात प्रगती होईल. आज तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा गैरसमज वाढू शकतात. एखाद्या कामासाठी आधीपासून तयार राहणं उत्तम. LUCKY SIGN – Old Banyan Tree कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) बाहेरून तुम्ही शांत आहात; मात्र आतमध्ये भरपूर गोंधळाची परिस्थिती आहे. लहान लहान विजयदेखील तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. अधिक चांगले रिझल्ट मिळवण्यासाठी तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे ऑर्गनाइज्ड असणं गरजेचं आहे. लवकरच दूरचा कार प्रवास संभवतो. LUCKY SIGN – A cup of Green tea तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) भूतकाळातल्या काही गोष्टींमधून बरेच धडे मिळाले आहेत. ते अंमलात आणणं गरजेचं आहे. तुमचे कुटुंबीय तुमच्याकडून स्पष्टता अपेक्षित करत आहेत. लवकरच हालचाल होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN – A Red Pen वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) काही नवीन घडामोडींमुळे तुमची रात्रीची झोप उडाली आहे; मात्र, सर्व काही शांत होण्यासाठी थोडा वेळ द्या. एखाद्या जवळच्या मित्राचा फोन तुम्हाला आयुष्यातला नवीन धडा शिकवून जाईल. सामाजिक काम करण्याची इच्छा होईल. LUCKY SIGN – A Tool Kit धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) उच्च शिक्षण किंवा आणखी ज्ञानार्जन करण्याचा विचार आज डोक्यात येत राहील. नुकत्याच भेटलेल्या एखाद्या व्यक्तीबाबत मनात नवीन भावना निर्माण होतील. धनलाभ होईल. LUCKY SIGN – A Spare Wallet मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखाद्या ठिकाणी प्रवेश मिळवण्यासाठी आता तुम्ही पात्र ठराल. एखाद्या महत्त्वाच्या कागदपत्रासंबंधी, किंवा हरवलेल्या व्यक्तीसंबंधी सकारात्मक बातमी कळेल. दैनंदिन जीवनातून एक ब्रेक घेणं चांगलं ठरेल. LUCKY SIGN – A Copper Article कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) एखाद्या नव्या खेळाकडे आकर्षित व्हाल. लोकांना भेटण्यासाठी चांगला दिवस आहे. एखादी वैद्यकीय मदत लागू शकते. दिवसभराचं नियोजन एखाद्या फोन कॉलमुळे बदलेल. LUCKY SIGN – A golden Watch मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखादं सरप्राइज तुम्हाला आवडणार नाही. जुनी मैत्री संपुष्टात येण्याची शक्यता आहे. स्वतःबद्दल एखाद्या बाबतीत शंका असल्यास तुम्हाला मार्गदर्शन करू शकणाऱ्या व्यक्तीचा सल्ला घ्या. गोडधोड खाण्याची इच्छा होईल. LUCKY SIGN – A rare clear sky
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या