Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होईल पण शिक्षण, कार्यक्षेत्रात अडचणीचा काळ; प्रकृतीलाही जपा

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होईल पण शिक्षण, कार्यक्षेत्रात अडचणीचा काळ; प्रकृतीलाही जपा

पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य.

आज दिनांक 09 जून 2022. वार गुरुवार. तिथी ज्येष्ठ शुक्ल दशमी. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीतून असेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशी भविष्य. मेष षष्ठ चंद्र आणि लाभ स्थानातील शनी षडाष्टक मानसिक ताण निर्माण करतील. भाग्येश गुरू मंगळ व्यय स्थानात आहे. धार्मिक, कौटुंबिक कारणांसाठी खर्च होईल. दिवस मध्यम. वृषभ दशम स्थानातील शनी पितृ चिंता, कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण करेल. चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण संततीसुख प्रतिष्ठा दाखवत आहे. दिवस शुभ आहे. मिथुन राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्र आणि शनी परिस्थितीत अनुकूल बदल घडवून आणेल. प्रकृती ठिक राहिल. चंद्रभ्रमण गृहसौख्य देईल. दिवस बरा आहे. कर्क तृतीय स्थानात प्रवेश करणार चंद्र काही काळ बंधूची काळजी घेण्याचा इशारा देत आहे. प्रवास टाळा. नुकसान होण्याची शक्यता. दिवस मध्यम. सिंह सप्तम स्थानात शनी जोडीदाराची काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्र भ्रमण शुभ असून घरात काही धार्मिक पूजा इत्यादी कराल. दिवस शुभ. कन्या षष्ठ स्थानातील शनी शत्रूपासून सुटका देइल. तुमचाच विजय होईल. राशीतील चंद्र भ्रमण प्रवास घडवून आणेल.अष्टम राहू घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम. तूळ संतती चिंता, शिक्षणात अनपेक्षित अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. आर्थिक लाभ होतील पोटाची काळजी घ्या. चंद्र भ्रमण कुटुंबासोबत वेळ घालवा असं सुचवत आहे. वृश्चिक राशी स्वामी मंगळ गुरूसोबत पंचम स्थानात येत असून संतती किंवा शैक्षणिक क्षेत्रात जपण्याचे संकेत देत आहे. प्रकृती जपा. दिवस मध्यम. धनु चतुर्थ स्थानात गुरू मंगळ वाहन आणि वास्तू योग आणतील. आईवडिल भेटतील. त्यांना जपा. कार्यक्षेत्रात यश मिळेल. संततीसोबत काही वेळ घालवा. दिवस उत्तम. मकर राशीतून पुढे जाणारा शनी आणि तृतीय मंगळ हा एक मोठा बदल आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष काम निघेल. उत्तम दिवस. कुंभ राशीमध्ये वक्री शनी जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. काळजी घ्या. अष्टम चंद्र कार्यक्षेत्रात त्रास होण्याची शक्यता. दिवस मध्यम. मीन व्यय स्थानातील शनी आणि राशीत मंगळ जपून राहण्याचा संकेत देत आहे. आर्थिक लाभ संभवतो. प्रवास योग येतील. राशीतील गुरू शुभ फल देतील. दिवस उत्तम. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या