Home /News /astrology /

Daily Horoscope : कामाच्या ठिकाणी घडणार बऱ्याच घडामोडी; नोकरी करणाऱ्यांनी जरूर पाहा हे राशिभविष्य

Daily Horoscope : कामाच्या ठिकाणी घडणार बऱ्याच घडामोडी; नोकरी करणाऱ्यांनी जरूर पाहा हे राशिभविष्य

Horoscope 07 May 2022 : 7 मे 2022 रोजी तुमच्या राशीत काय आहे, पाहा तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 7 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमचं कौतुक होईल. कोणी तरी कामाच्या ठिकाणच्या तुमच्या कामगिरीबद्दल तुम्हाला निराश करणारे उद्गार काढले तरी दुर्लक्ष करा. तसंच कोणी तुम्हाला जज करत असेल तर त्याकडेही दुर्लक्ष करा. निसर्गात वेळ व्यतीत केला तर दिलासा मिळेल. LUCKY SIGN - Black tourmaline वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुमचे प्रवासाचे बेत या महिन्यातल्या नंतरच्या दिवसांसाठी राखून ठेवा. दिवस एका वेळी एकाच गोष्टीकडे लक्ष देण्याचा आणि एकाच गोष्टीचं नियोजन करण्याचा आहे. प्रगतिशील आध्यात्मिक संवेदनेसाठी चांगले संकेत आहेत. पैशांचा अडकलेला प्रवास सुरळीत होईल. LUCKY SIGN - Yellow sapphire मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) दिवसाचा जास्तीत जास्त सदुपयोग करा. कारण तुमचा उद्देश, हेतू याच्याशी ऊर्जा पूर्णपणे अनुकूल आहे. एखाद्या नातेवाईकाला आर्थिक मदत लागू शकेल. एखादी जवळची व्यक्ती बऱ्याच काळानंतर अचानक तुम्हाला भेटायला येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - An emerald कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) अचानक शॉपिंग किंवा आउटिंगमध्ये तुम्ही रमू लागाल. तुम्ही आधीच एखादं वचन दिलं असेल तर डेडलाइन अगदी काटेकोरपणे पाळायला हवी. घरगुती कामात आज मदतीचा अभाव जाणवेल. त्यामुळे दैनंदिन कामात अडथळे निर्माण होऊ शकतात. LUCKY SIGN - A carnelian सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) टीमवर्कमुळे बऱ्याच गोष्टी साध्य होऊ शकतात. एखाद्या नव्या व्यक्तीसोबत कोलॅबोरेशन करण्याची संधी मिळाली तर ती तुम्ही स्वीकारलीच पाहिजे. कामाच्या ठिकाणी झालेल्या मोठ्या वादावादीमुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकेल. LUCKY SIGN - Pyrite crystal कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुमचं काम अडकून बसलं असेल आणि ते पूर्ण होण्यासाठी तुम्हाला एखाद्याचा इगो कुरवाळावा लागणार असेल, तर तसं करावं. सध्याच्या काळात अल्पकालीन नियोजन उपयुक्त ठरू शकतं. पाहुण्याचं स्वागत करावं लागलं तर तुमच्या घरात पुरेशी तयारी आहे ना, याची खात्री करून ठेवा. LUCKY SIGN - Rose sandstone तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) दिवस कुटुंबीयांसमवेत प्रत्यक्ष घरात किंवा व्हर्च्युअली व्यतीत करण्यासाठी उत्तम आहे. काम वाढू शकेल आणि तुमचं योगदान किती आहे, याचा आढावा घ्यावा लागेल. चांगलं वर्कआउट केल्यास तुम्हाला आवश्यक तेवढी ऊर्जा पुन्हा मिळू शकेल. LUCKY SIGN - Yellow amber stone वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्हाला जुन्या छंदाची आठवण येईल. दिवसाची ऊर्जा प्रगतिशील आहे मात्र वेग संथ आहे. स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असलात तर अलीकडेच तुमचं जे काही नुकसान झालं आहे ते भरून निघू शकेल. LUCKY SIGN - Clear quartz धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) खूप दूरवरून किंवा परदेशातून आलेल्या एखाद्या कॉलमुळे तुमचा दिवस छान जाईल. तुम्हाला खास वाटेल. एखाद्या छोट्या ट्रिपचा प्लॅन यशस्वी होईल. तुमच्या सध्याच्या रिलेशनशिपमध्ये काही प्रश्नांची तातडीने उत्तरं देणं आवश्यक आहे. LUCKY SIGN - A moonstone मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) नवं हेल्थ रूटीन सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे. एखादं पुस्तक किंवा लेख यांमुळे त्यासाठीची प्रेरणा मिळू शकेल. एखादी गोष्ट हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल, ती मिळू शकेल. LUCKY SIGN - A rainbow opal कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्ही विचार करत असलेल्या एखाद्या गोष्टीमध्ये प्रगती होत असल्याचे संकेत तुम्हाला मिळू शकतात. तुमच्या आतल्या आवाजाचं ऐका आणि तुमच्या नकारात्मक भावनांवर नियंत्रण ठेवा. दिवस संमिश्र निकालांचा असेल. LUCKY SIGN - A rose quartz मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखाद्या बाहेरच्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या सूचनेमुळे बराच महत्त्वाचा वेळ वाचेल. एखादा प्रलंबित राहिलेला निर्णय घेण्यासाठी आता तुम्हासा आत्मविश्वास वाटेल आणि निर्णय घेण्याची तुमची मानसिकताही होईल. मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांना प्राधान्य द्याल. LUCKY SIGN - A diamond
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या