Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आज 'गुरू'ची कृपा; तुमच्या राशीनुसार तुम्हाला काय फळ मिळणार पाहा

दैनंदिन राशिभविष्य : आज 'गुरू'ची कृपा; तुमच्या राशीनुसार तुम्हाला काय फळ मिळणार पाहा

Horoscope 04 May 2022 : आज राशीतील गुरूचा कुणावर काय परिणाम होणार पाहा.

आज दिनांक 04 मे 2022 .वार बुधवार. आज वैशाख कृष्ण चतुर्थी. चंद्राचे भ्रमण वृषभ राशीतून होणार असून पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य. मेष लाभात गुरू आणि द्वितीय चंद्र अध्यात्मिक उन्नती, शैक्षणिक लाभ दाखवत आहे. परदेशसंबंधी शुभ समाचार मिळतील. दिवस उत्तम. वृषभ लाभ स्थानात आलेला गुरू अतिशय शुभ असून संतती प्राप्तीसाठी अनुकूल फळ देईल. घरामध्ये शुभ कार्य घडेल. मातृ-पितृ सुख लाभेल. राशीतील चंद्र मनस्वास्थ्य देईल. दिवस शुभ. मिथुन राशीच्या कर्म स्थानात येणारा गुरू घर आणि कार्यक्षेत्रात यश देईल. आईवडिलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. आर्थिक व्यय, वाहन दुरुस्ती होण्याची शक्यता आहे. दिवस उत्तम. कर्क भाग्यस्थानातील गुरू-शुक्र अचानक सगळ्या क्षेत्रात यश, लाभ मिळवून देईल. अनेक दिवसापासून अडकलेली काम मार्गी लागतील. आर्थिक हानीपासून जपावं. प्रकृतीत सुधार होईल. दिवस बरा. सिंह अष्टम गुरू प्रकृतीची चिंता निर्माण करेल. दशम स्थानातील चंद्र कार्यालयात उलाढाल दाखवत आहे. दिवस शांतपणे व्यतीत करा. कन्या राशीच्या जातकांचे जोडीदारासोबत असलेले संबंध मधुर होतील. अविवाहित व्यक्तींना साथीदार मिळेल. नवीन पर्वाची सुरुवात होईल. भाग्यात चंद्र मन आनंदी ठेवेल. दिवस उत्तम आहे. तूळ राशीच्या षष्ठ स्थानात आलेला गुरू नोकरी, आर्थिक व्यवहार, कर्जमुक्ती यासाठी शुभ असून चंद्र मानसिक ताण देणार आहे. दिवस उत्तम. वृश्चिक संततीसाठी अतिशय शुभ फल देणारा गुरू उच्च शिक्षणात देखील मदत करेल. कार्यक्षेत्रात लाभ होतील. नवीन जबाबदारी येईल. दिवस शुभ. धनु चतुर्थ स्थानात येणारा गुरू-शुक्र गृहसौख्य, नवीन वास्तू, वाहन मिळवुन देईल. भाग्यकारक घटना घडतील. शुभ आणि अध्यात्मिक अनुभव येतील. दिवस शुभ. मकर देश विदेशचे प्रवास, भावंडांशी भरभराट असा हा काळ आहे. वाणी तेजस्वी होईल. चंद्रभ्रमण संततीला जपून राहण्याचे संकेत देत आहे. कुंभ राशीच्या धन स्थानात येणारा गुरू कौटुंबिक, आर्थिक सुखात वाढ करेल. गृहसौख्य मिळेल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस उच्च प्रतीचे अनुभव देईल. मीन राशीमध्ये आलेला गुरू परीपक्व आणि स्थिर व्यक्तिमत्व देईल. विचार सुधारतील. तेजस्वी व्यक्तिमत्व होईल. चंद्र भ्रमण प्रवासात काळजी घ्या असं सुचवत आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या