Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होतील पण 'या' राशीच्या व्यक्तींनी खर्च जपून करावा

दैनंदिन राशिभविष्य : आर्थिक लाभ होतील पण 'या' राशीच्या व्यक्तींनी खर्च जपून करावा

Daily Horoscope 03 June 2022 : आजचे बारा राशींचे राशिभविष्य.

आज दिनांक 04 जून 2022, शुक्रवार. आज ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी. चंद्र आज कर्क राशीत भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे राशिभविष्य. मेष चतुर्थ स्थानात चंद्र अत्यंत शुभ असून आईवडील भेट, घरात काही विशेष घटना असा हा दिवस आहे. पाहुणे येतील. कामाच्या ठिकाणी नाव मिळेल. दिवस उत्तम. वृषभ आज तृतीय चंद्र मानसिक आणि आर्थिक मजबुती देईल. कुटुंबात तुमच्या मनासारख्या घटना घडतील. प्रवास घडेल. मन आनंदी राहिल. दिवस उत्तम. मिथुन राशीच्या धनस्थानातील चंद्र भ्रमण लाभ देणारे कौटुंबिक सुखाचे राहिल. आर्थिक लाभ होतील. गुरू शुभ फळ देईल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस शुभ. कर्क आज राशी स्थानातून होणारे चंद्र भ्रमण गृहसौख्य देणारे आहे. अष्टम शनी कुरबुरी सुरू ठेवेल. रवी, बुध मात्र मार्ग दाखवतील. दिवस उत्तम आहे. सिंह राशीच्या व्यय स्थानातून होणारे चंद्र भ्रमण आर्थिक, मानसिक व्यय दाखवत आहे. त्रासदायक दिवस. प्रत्येक विषयात काही तरी अडचण निर्माण होईल. शांत रहा. दिवस मध्यम. कन्या आज लाभस्थानातील चंद्रभ्रमण उत्तम असून घरासाठी काही विशेष खरेदी होईल. जास्तीचे काम पडेल. वडिलांना काही त्रास होण्याचे संकेत. दिवस मध्यम आहे. तूळ कामाच्या ठिकाणी काही महत्त्वाच्या घटना घडतील. जास्त जबाबदारी घेऊ नका. घरामध्ये काही विषयात मतभेद असतील. दिवस बरा आहे. वृश्चिक भाग्यस्थानातील चंद्र मध्यम अनुभव देईल. फार दिवसांनी तुमची प्रकृती ठिक असेल. खर्च होईल पण आर्थिक लाभदेखील उत्तम राहिल. दिवस चांगला आहे. धनु आज चंद्र भ्रमण आणि तृतीय शनी सांभाळून राहण्याचे संकेत देत आहेत. वाहनापासून जपा. आर्थिकदृष्ट्या काळ बरा आहे. दिवस मध्यम. मकर आजचा दिवस कुटुंबीयासमवेत शांतपणे घालवा. त्यांना वेळ द्या. आर्थिक लाभ होतील. कार्यक्षेत्रात काळजी घ्या. खर्च जपून करा. दिवस मध्यम. कुंभ आज आरोग्यास त्रासदायक दिवस राहणार आहे. षष्ठ चंद्र, मंगळ धनस्थानात असून प्रकृती नाजूक, आर्थिकदृष्ट्या जपून राहण्याचा काळ आहे. दिवस मध्यम जाईल. मीन आज कौटुंबिक आयुष्य आणि संतती याला महत्त्व असेल. प्रवास योग येतील. गुरू धार्मिक कारणांसाठी खर्च करेल. आज दिवस मध्यम असून गुरूची उपासना करावी. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या