Home /News /astrology /

दैनंदिन राशिभविष्य : आज दिवसभर निश्चिंत राहा; बाराही राशीत फक्त 'आनंदी आनंद'

दैनंदिन राशिभविष्य : आज दिवसभर निश्चिंत राहा; बाराही राशीत फक्त 'आनंदी आनंद'

आज दिनांक 02 जून 2022. गुरुवार ज्येष्ठ शुक्ल तृतीया. चंद्राचे भ्रमण मिथुन राशीतून होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे राशीभविष्य. मेष गुरू आणि चंद्र अध्यात्मिक उन्नती, शैक्षणिक लाभ दाखवत आहे. परदेशसंबंधी शुभ समाचार मिळतील. आर्थिक लाभ, प्रवास संभवतात. दिवस उत्तम. वृषभ लाभ स्थानात आलेला गुरू अतिशय शुभ असून संतती प्राप्तीसाठी अनुकूल फळ देईल. घरामध्ये शुभ कार्य घडेल. मातृ पितृ सुख लाभेल. द्वितीय चंद्र मनस्वास्थ्य देईल. आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ. मिथुन राशीच्या कर्मस्थानात येणारा गुरू घर आणि कार्य क्षेत्रात यश देईल. आईवडिलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होईल. आर्थिक व्यय, वाहन दुरुस्ती होण्याची शक्यता आहे. दिवस उत्तम. कर्क भाग्य स्थानातील गुरू मंगळ अचानक सगळ्या क्षेत्रात यश, लाभ मिळवून देईल. अनेक दिवसापासून अडकलेली काम मार्गी लागतील. आर्थिक हानीपासून जपावं. प्रकृतीत सुधार होईल. दिवस बरा. सिंह अष्टम गुरू प्रकृतीची चिंता निर्माण करेल. लाभ स्थानातील चंद्र कार्यालयात उलाढाल दाखवत आहे. दिवस शांतपणे व्यतीत करा. कन्या राशीच्या जातकांचे जोडीदार सोबत असलेले संबंध मधुर होतील. अविवाहित व्यक्तींना साथीदार मिळेल. नवीन पर्वाची सर्वात होईल. मिथुन चंद्र मन आनंदी ठेवेल. दिवस उत्तम आहे.. तूळ भाग्यस्थानात आलेला चंद्र नोकरी, आर्थिक व्यवहार कर्जमुक्ती यासाठी शुभ असून मानसिक ताण कमी करणार आहे. दिवस उत्तम. वृश्चिक संततीसाठी अतिशय शुभ फल देणारा गुरू उच्च शिक्षणात देखील मदत करेल. कार्यक्षेत्रात लाभ होतील. नवीन जबाबदारी येईल. अष्टम चंद्र मानसिक ताण वाढवेल. दिवस मध्यम. धनु चतुर्थ स्थानात येणारा गुरू गृहसौख्य, नवीन वास्तू, वाहन मिळवून देईल. भाग्यकारक घटना घडतील. शुभ आणि अध्यात्मिक अनुभव येतील. दिवस शुभ. मकर देश-विदेशचे प्रवास, भावंडांची भरभराट असा हा काळ आहे. वाणी तेजस्वी होईल. चंद्र भ्रमण संततीला जपून राहण्याचे संकेत देत आहे. कुंभ राशीच्या धनस्थानात येणारा गुरू मंगळ कौटुंबिक, आर्थिक सुखात वाढ करेल. गृहसौख्य मिळेल. जोडीदाराला शुभ काळ. दिवस उच्च प्रतीचे अनुभव देईल. मीन राशीमध्ये आलेला गुरू विचारी आणि स्थिर व्यक्तिमत्व देईल. विचार सुधारतील. तेजस्वी व्यक्तिमत्व होईल. चंद्र भ्रमण गृहसौख्य मिळेल असं सुचवत आहे. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या