Home /News /astrology /

Daily Horoscope : बँकेची कामं करताना सावध राहा; ओळखीची व्यक्ती करू शकते विश्वासघात

Daily Horoscope : बँकेची कामं करताना सावध राहा; ओळखीची व्यक्ती करू शकते विश्वासघात

दैनंदिन राशिभविष्य

दैनंदिन राशिभविष्य

Horoscope 31 May 2022 : 31 मे 2022 रोजी तुमच्या राशीत काय आहे पाहा तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 31 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमच्या व्यस्त वेळापत्रकात एखादी सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या नेटवर्कला तुमच्याकडून अधिक अ‍ॅक्सेसिबिलिटी मिळण्याची गरज आहे. घरगुती पातळीवरच्या गोष्टींचं व्यवस्थापन करण्यात तुमची ऊर्जा खर्च होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A neon sign वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुमचा दृष्टिकोन आता अनेक व्यक्तींना समजायला सुरुवात होईल. बिझनेसमन तसंच स्टार्टअप असलेल्या व्यक्तींचा दिवस प्रॉडक्टिव्ह ठरेल आणि पुढचा आठवडा उत्तम असेल. साधा-सरळ दृष्टिकोन उपयुक्त ठरेल. LUCKY SIGN - A ruby मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमचे प्लॅन्स काम करत नाहीत असं वाटलं तरी काळजी करू नका. तुम्हाला लवकरच यश मिळेल. आणीबाणीची वेळ असल्यास तातडीचे उपाय योजावे लागतात. ऊर्जेवर तुमच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रभाव असेल. LUCKY SIGN - A blue sapphire कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) इतरांना मदत करण्याच्या छोट्या कृतीमुळेही तुम्हाला खरा आनंद अनुभवता येईल. एखादी ओळखीची व्यक्ती विश्वासघात करील आणि तुम्हाला तिच्याबद्दल बाहेरून कळेल. छोटे वादविवाद मोठे करण्याची अजिबात गरज नाही. LUCKY SIGN - A yellow crystal सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) गैरसमजामुळे भविष्यात चुकीचं इम्प्रेशन पडू शकतं. जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत गोष्टींचं स्पष्टीकरण द्या. पार्टनरला तुमच्याबद्दल पझेसिव्ह वाटेल. दिवसाच्या उत्तरार्धात तुम्हाला कदाचित त्रासदायक वाटू शकेल. तुमच्या आई-वडिलांना तुमची मदत आणि तुमच्या काही वेळाची गरज असेल. LUCKY SIGN - A black tourmaline कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्हाला अलीकडेच मिळालेल्या यशाबद्दल तुमचं कौतुक होऊ शकेल. तुमच्याकडे जी काही ऊर्जा असेल त्यावर पुढचा आठवडा कसा जाईल हे ठरेल. तुमच्या टीमसाठी आणि कामाच्या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांसाठी नव्या संधी तयार करा. एकट्यासाठी थोडा वेळ काढा. LUCKY SIGN - A tower तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) तुमची सगळी भीती दूर ठेवा. दिवस जिंकण्याचा आहे. परवाबद्दलचं प्लॅनिंग सुरू करा. तुमच्या जवळच्या मित्राला द्वेष वाटेल. तुमचे महत्त्वाचे प्लॅन्स उघड करू नका. उघड केल्यास त्यातली सुरुवातीची ऊर्जा कमी होण्याची शक्यता आहे. हलकं खा. LUCKY SIGN - Signature tune वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुम्हाला तुमच्या कल्पना मांडण्याची संधी मिळेल. परदेशातली कोणी तरी व्यक्ती तुमच्या प्रयत्नांची दखल घेईल आणि कौतुक करील. कोणाला तरी सरप्राइज देण्याचा तुमचा प्लॅन यशस्वी होईल. अचानक एखादी मीटिंग होण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A guitar धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुमचं कुटुंब हा तुमच्या आयुष्यातला खरा खजिना, खरी संपत्ती आहे. तुम्हाला कुटुंबीयांचा पाठिंबा कोणत्याही अटी-शर्तीविना मिळेल. प्रकृतीच्या काही किरकोळ अडचणी असतील. कामाच्या ठिकाणच्या गोंधळापासून दूर राहा. बँकेच्या कामाबद्दल सावधगिरी बाळगा. LUCKY SIGN - A new car मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) कुटुंबात गैरसमज होणं सुदैवाने टळेल. तुमची भावनिक बाजू ही काही वेळा काळजीचं कारण बनते. बाहेर फिरायला जाण्याचं नियोजन होऊ शकतं. तुमचे आई-वडील प्रवासाचं नियोजन करू शकतात. त्यांचा हा प्लॅन बराच काळ प्रलंबित होता. LUCKY SIGN - A milestone कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) आल्हाददायक नैसर्गिक वातावरणात किंवा संगीताच्या साह्याने स्वतःला रिलॅक्स करा. काम कमी असेल; मात्र तुम्हाला गुंतवून ठेवील. काही जणांना पोटाचे विकार त्रास देतील. शिक्षणतज्ज्ञांचा दिवस समाधानाचा जाईल. LUCKY SIGN - An indoor plant मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुमच्या मनाचे खेळ तुम्हाला पाहायला मिळतील. शांत व्हा आणि तुमच्या आतल्या आवाजाचं ऐका. काही मित्र तुम्हाला फोनकॉल करतील आणि तुमचं सविस्तर संभाषण होईल. परदेशातल्या नातेवाईकाकडे तुम्हाला सांगण्यासारखी एखादी गुड न्यूज असेल. LUCKY SIGN - A lampshade
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या