Home /News /astrology /

Mangal Gochar 2022: मंगळ करणार मेष राशीमध्ये प्रवेश; वाचा कोणत्या राशींना होणार फायदा

Mangal Gochar 2022: मंगळ करणार मेष राशीमध्ये प्रवेश; वाचा कोणत्या राशींना होणार फायदा

आजपासून (27 जून) मंगळ ग्रह हा मेष राशीमध्ये प्रवेश (Mangal Gochar 2022) करणार आहे. याचा फायदा (Mangal Gochar Benefits) केवळ मेष राशीच्याच नाही, तर अन्य काही राशीच्या व्यक्तींनाही होणार आहे.

 मुंबई, 27 जून:  ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology) प्रत्येक ग्रह हा नेहमी भ्रमण करत असतो. असं करताना तो एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये जात असतो. या प्रक्रियेला गोचर, किंवा संक्रमण म्हणतात. हे ग्रह विविध राशींमध्ये ठराविक काळ राहतात. एखाद्या राशीचा स्वामी ग्रह त्या राशीमध्ये आल्यास, ती रास असणाऱ्या व्यक्तींची भरभराट ही ठरलेली असते. आजपासून (27 जून) मंगळ ग्रह हा मेष राशीमध्ये प्रवेश (Mangal Gochar 2022) करणार आहे. याचा फायदा (Mangal Gochar Benefits) केवळ मेष राशीच्याच नाही, तर अन्य काही राशीच्या व्यक्तींनाही होणार आहे. मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती समजलं जातं. भूमी, युद्ध, साहस आणि पराक्रम याचं प्रतीक असलेला हा ग्रह आहे. मंगळ ग्रहाच्या गोचर (Mangal Gochar) कालावधीमध्ये सिंह, कन्या आणि वृश्चिक या तीन राशींच्या व्यक्तींना भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कोणत्या राशीला नेमका काय फायदा होईल, जाणून घेऊयात. हेही वाचा - आज चंद्राचा शनीशी प्रतियोग; तुमच्या राशीवर काय परिणाम होणार पाहा राशिभविष्य सिंह रास मंगल गोचर कालावधी सिंह (Mangal Gochar benefits for Leo) राशीच्या व्यक्तींसाठी फायद्याचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी प्रमोशन, मोठं पद मिळण्याची शक्यता आहे. राहाण्याची जागादेखील बदलण्याची शक्यता आहे. समाजात आणि कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढेल. धनलाभ होईल. ऑफिसमध्ये सर्वांशी चांगली वागणूक ठेवणं फायद्याचं ठरेल. कन्या रास मंगळ ग्रहाच्या मेष राशीतील संक्रमणामुळे कन्या (Mangal Gochar benefits for Virgo) राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ संभवतो. या व्यक्तींची आर्थिक स्थिती आधीपेक्षा चांगली होईल. एखादं बऱ्याच दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागेल. संपत्ती खरेदी करण्याचा योग येईल. वैवाहिक आयुष्यात सुख-समृद्धी लाभेल. जोडप्यांमध्ये प्रेम वाढेल. एक ना अनेक प्रकारे लाभ होईल. वृश्चिक रास आजपासून सुरू होत असलेलं मंगळ गोचर हे वृश्चिक (Mangal Gochar benefits for Scorpio) राशीच्या व्यक्तींनादेखील फायद्याचं ठरेल. या राशीच्या व्यक्तींना गोचर कालावधीमध्ये अचानक धनलाभ संभवतो. हातात भरपूर पैसा येईल, ज्यामुळे भरपूर आनंद आणि समाधान मिळेल. दीर्घकाळापासून थांबलेली कामं पूर्ण होतील. व्यापाऱ्यांसाठी हा काळ विशेष फायद्याचा ठरणार आहे. घर बांधण्याचा विचार करत असाल, तर हा काळ काम सुरू करण्यासाठी सर्वोत्तम आहे. अशाप्रकारे आजपासून सुरू होणारं मंगळाचं गोचर हे सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीसाठी भरपूर आर्थिक सुबत्ता आणणारं ठरणार आहे.
First published:

Tags: Astrology and horoscope

पुढील बातम्या