Home /News /astrology /

Maharashtra SSC Result : दहावीच्या निकालाने धाकधूक वाढवली; काय होणार उद्या? पाहा तुमचं Horoscope

Maharashtra SSC Result : दहावीच्या निकालाने धाकधूक वाढवली; काय होणार उद्या? पाहा तुमचं Horoscope

फोटो सौजन्य - Shutterstock

फोटो सौजन्य - Shutterstock

Maharashtra SSC Result Horoscope 17 June 2022 : 17 जून 2022 रोजी दहावीचा निकाल लागणार आहे. या दिवशी तुमच्या राशीत काय आहे जरूर पाहा तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 17 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) नजीकच्या भूतकाळात अनेक घटना-घडामोडी तुम्हाला हव्या तशा घडल्या नसतील; मात्र आता तो पॅटर्न बदलण्याचे संकेत आहेत. तुम्हाला आता तुमचं अधिक नियंत्रण असल्यासारखं वाटेल. तुमच्याकडे कोणी मदत मागितली, तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकता. LUCKY SIGN - A streetlight वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्ही ज्यांना ओळखता त्यापैकी बहुतांश व्यक्ती गरजेला मदत करणाऱ्या नसू शकतात. तुम्ही तुमच्या क्षमतेचं मूल्यमापन करून त्यावर विश्वास ठेवायला हवा. एखादी आकर्षक ऑफर तुमच्यासमोर येऊ शकते. तिचा विचार करायला हवा. LUCKY SIGN - A neon sign मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुमचा एखादा जुना सहकारी तुमच्या प्रगतीवर अजूनही बारीक लक्ष ठेवून असण्याची शक्यता आहे. घरात काही वाद होण्याची शक्यता आहे. त्यातून काही विचित्र भावना तयार होतील. तुम्ही भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून आता काही लाभ मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A toad कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) साधेपणा नेहमीच उपयुक्त ठरतो. विनाकारण गुंतागुंत करणं टाळलं पाहिजे. प्रकृतीची एखादी समस्या उद्भवू शकते. कदाचित ती काळजी करण्यासारखी असेल. एखादा जुना मित्र आयुष्यात पुन्हा येण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A diamond सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) आजच्या दिवसात भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबाचा तुम्हाला अपेक्षित असेल तेवढा पाठिंबा मिळण्याची शक्यता नाही. भावनिक आणि मानसिकदृष्ट्या अनेक रिस्क्स घेऊ नका. LUCKY SIGN - A salt lamp कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) तुम्हाला आतून खूप संतुलित वाटेल; मात्र तरीही कशाची तरी चिंता सतावेल. खासकरून तुम्ही पत्रकारितेच्या क्षेत्रात असलात, तर काही नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या सामानाची काळजी घ्या. LUCKY SIGN - Neem tree तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) आपल्याला व्यवस्थापन जमणार नाही एवढ्या प्रमाणात काही उद्दिष्टं एका वेळी गाठण्याची इच्छा तुम्हाला दमवील. तुम्हाला काही गोष्टींचा लवकरच कंटाळा येईल. स्वतःला ताजंतवानं करण्यासाठी काही वेळ काढा आणि नंतर पुनरागमन करून मोठी झेप घ्या. LUCKY SIGN - A silicon mould वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्या स्वतःच्या अटींवर पैसे मिळवण्याचं तुमचं प्राथमिक उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य होण्याची शक्यता आहे. एखाद्या अज्ञात व्यक्तीकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे दिवस चांगला जाईल. सार्वजनिक ठिकाणी बोलण्याच्या तुमच्या कौशल्याची चाचणी घेतली जाईल. LUCKY SIGN - An indoor plant धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) एखाद्या महत्त्वाच्या विषयात तुमचं मत विचारात घेतलं जाऊ शकेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेची दखल घेतली जाईल. तुमच्याबद्दल खरोखरच काळजी वाटत असलेल्या व्यक्तीकडून तुम्हाला एखादं सरप्राइज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A silk scarf मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखाद्या किरकोळ विरोधाचं किंवा आक्षेपाचं रूपांतर मोठ्या गंभीर वादात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादविवाद टाळाच. एखाद्या वैयक्तिक पुढाकारापेक्षा तुम्हाला टीमवर्क अधिक लाभकारक ठरेल. लेखी संवाद साधताना पुन्हा पुन्हा तपासून पाहा. LUCKY SIGN - A rose bunch कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्ही आता तुमच्या मिशनच्या जवळ आहात आणि त्यामुळे निःश्वास सोडू शकता. आर्थिक व्यवहार सुरळीत पार पडतील, असे ग्रहयोग दिसत आहेत. तुम्हाला तुमची प्रेझेंटेशन स्किल्स सुधारावीशी वाटतील. LUCKY SIGN - A watch मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्हाला रोमँटिसाइज करायला आवडतं आणि त्यामुळे तुम्ही अनेकदा भरकटता. तुम्ही अधिक वास्तववादी राहायला हवं. तुमच्या अपेक्षा आणि कृती यांबाबतीत तुम्ही वस्तुनिष्ठ असायला हवं. शेवटच्या क्षणी आईने दिलेला सल्ला रेलेव्हंट आणि समयसूचक ठरेल. LUCKY SIGN - Golden chain
First published:

Tags: Astrology and horoscope, Career, Exam result, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या