Home /News /astrology /

Numerology : SSC Results चा महत्त्वाचा दिवस; तुमच्या जन्मतारखेनुसार आज 'या' वस्तूंचं दान जरूर करा

Numerology : SSC Results चा महत्त्वाचा दिवस; तुमच्या जन्मतारखेनुसार आज 'या' वस्तूंचं दान जरूर करा

Maharashtra SSC Results 2022 Numerology : तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्ही काय दान करायला हवं पाहा तुमचं अंकशास्त्र.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 17 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज इतरांच्या मदतीने भरपूर गोष्टी साध्य कराल. तुमच्याकडे कोणी मदत मागितल्यास अवश्य होकार द्या. तुमच्या बहुतांश अडचणी संपण्याच्या मार्गावर आहेत. आयुष्यात लवकरच एखादी नवी गोष्ट सुरू होईल. एखाद्या नव्या ठिकाणी जाल. नवं काम मिळेल, नवे मित्र मिळतील किंवा बिझनेसमध्ये नवी गुंतवणूक कराल. प्रॉपर्टी आणि पैशांचे व्यवहार वादाशिवाय पार पडतील. मेडिकल प्रॅक्टिस करणाऱ्या व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. शेती आणि शिक्षण व्यवसायात फायदा होईल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया आश्रमात अन्नदान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची निरागसता आणि मदत करण्याच्या सवयीचा आज कोणी फायदा घेऊ शकतं. तुम्हाला नाही म्हणायला शिकण्याची गरज आहे. आज सर्व बाबतींमध्ये खबरदारी बाळगा. एक्सपोर्ट-इम्पोर्ट, डॉक्टर, इंजिनीअर, ब्रोकर, ट्रॅव्हल एजन्सी, शेअर मार्केट आणि पार्टनरशिप फर्म या सर्व क्षेत्रांतल्या व्यक्तींना मोठा फायदा संभवतो. जोडीदाराकडून वा सहकाऱ्यांकडून दुखावलं जाण्याची शक्यता आहे. शुभ रंग : Blue शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया गायी-गुरांना पाणी पाजा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांच्या हेतूचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करा. क्रिएटिव्ह कल्पना आणि वाणी यामुळे बॉस आणि कुटुंबीयांवर छाप पाडाल. कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करण्याच्या तुमच्या स्वभावामुळे लवकरच यश मिळेल. पैशांचे व्यवहार करताना खबरदारी घ्या. क्रिएटिव्ह व्यक्ती आणि पब्लिक फिगर असणाऱ्या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. क्रीडा प्रशिक्षकांना आर्थिक फायदा होईल. बांधकाम आणि शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ आहे. दिवसाच्या सुरुवातीला कपाळावर चंदनाचा टिळा लावा. संध्याकाळी तुमच्या गुरूसमोर दिवा लावा. शुभ रंग : Orange and Blue शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया गरिबांना सूर्यफुलाचं तेल दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) बिझनेसमध्ये आज मोठा फायदा होईल. सरकारी नोकरी आणि राजकारण या क्षेत्रांमधल्या व्यक्तींनी आज सातत्याने कार्यरत राहणं उत्तम. दुपारनंतर त्यांना मोठा फायदा होईल. उच्चपदस्थ व्यक्तींना आणखी मोठ्या पदावर जाण्याची संधी मिळेल. आर्थिक योजनांसंबंधी कोणाशीही चर्चा करू नका. विद्यार्थ्यांनी सरकारी नोकरीसाठी अर्ज करावा, मनासारखा प्रतिसाद मिळेल. खेळाडूंचं कौतुक आणि आर्थिक फायदा होईल. आज कामाच्या व्यापात कुटुंबीयांना आणि मित्रांना वेळ देता येणार नाही, तेव्हा त्यांची बोलणी शांतपणे ऐकून घ्या. हिरव्या पालेभाज्या दान केल्याने फायदा होईल. शुभ रंग : Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना चपला दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही राजकीय क्षेत्रात सक्रिय असाल, तर यश मिळवण्यासाठी आज प्रामाणिकपणे मेहनत करावी लागेल. आजचा दिवस भाग्याचा आहे. रिस्क घेतल्यास उत्तम. मनातल्या भावना जोडीदारासमोर व्यक्त करण्यासाठी उत्तम दिवस. मशीन खरेदी, प्रॉपर्टी विक्री, कागदपत्रांवर स्वाक्षरी करणं वा प्रवासासाठी चांगला दिवस आहे. न्यूज अँकर, अभिनेते, हस्तकला कलाकार, इंजिनीअर्स या व्यक्तींचं सर्व स्तरांतून कौतुक होईल. एखादी भेटवस्तू वा मोफत मिळालेली ऑफर टाळा, हा शत्रूचा तुमच्यासाठी रचलेला सापळा असू शकतो. तुमच्या नेतृत्वगुणामुळे आजूबाजूच्या व्यक्तींनाही फायदा होईल. क्रीडा प्रशिक्षकांनी नवी आव्हानं स्वीकारावीत. शुभ रंग : Teal शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथाश्रमातल्या मुलांना हिरवी फळं दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस अगदी ऐशोआरामाचा आणि भरपूर संधींचा आहे. सेल्स, फूड, मार्केटिंग, ट्रेडिंग, डिस्ट्रिब्युशन, डिफेन्स, एअरलाइन्स, ज्वेलरी, कॉस्मेटिक्स आणि होम डेकॉर या क्षेत्रांमधल्या व्यक्तींसाठी आनंदी दिवस. तुम्ही केलेली सर्व कामं तुमच्या फायद्याची ठरतील. त्यामुळे तुमची स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी उत्तम दिवस. कुटुंबीयांचं प्रेम आणि पाठिंबा मिळेल. डिझायनर, वकील, तंत्रज्ञान क्षेत्रातले कर्मचारी, राजकीय नेते आणि अभिनेत्यांना स्थैर्य आणि कौतुक लाभेल. शुभ रंग : Sky Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 आणि 9 दान : कृपया गरिबांना दही दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) जुन्या प्रॉपर्टीच्या मदतीने आज आर्थिक प्रगती संभवते. रिलेशनशिप, परफॉर्मन्स बळकट करण्याचे आणि आर्थिक फायदा मिळवण्याचे दिवस लवकरच येतील. आज बिझनेसमध्ये नातेवाईक आणि मित्रांपासून सावध राहा. खेळाडूंनी वाद टाळण्यासाठी आपल्या प्रतिस्पर्ध्यापासून दूरच राहणं उत्तम. विरुद्धलिंगी व्यक्तीमुळे तुमचं भाग्य उजळेल. भगवान शंकर आणि केतू यांची पूजा करणं फायद्याचं ठरेल. आज पाकिटात तांब्याचं नाणं ठेवल्यास फायदा होईल. शुभ रंग : Yellow शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया अनाथाश्रमात कपडे दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) अति विचार करणं टाळा आणि तुमचं मन अगदी शांत ठेवा. तुम्ही ज्या गोष्टींची चिंता करत आहात, त्या नीट पार पडतील. तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती तुमच्याशी प्रामाणिक आहेत. त्यामुळे नेतृत्व करणं सोपं जाईल. आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. तुमच्या कुटुंबीयांसोबत आणि नातेवाईकांसोबत वेळ व्यतीत करा. निसर्गाच्या सान्निध्यात काही वेळ व्यतीत करणं फायद्याचं ठरेल. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून बोलण्याची संधी मिळाल्यास ती सोडू नका. शुभ रंग : Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना छत्री दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस चॅटिंग, वाचन, प्लॅनिंग करणं, व्यायाम आणि हीलिंग, घरातली कामं, घरगुती जबाबदाऱ्या, पार्टी होस्ट करणं, सामाजिक कार्य, शेअर मार्केट ट्रेडिंग अशा गोष्टींमध्ये जाईल. अगदी उत्साहाचा आणि आनंदाचा असा आजचा दिवस आहे. हा सर्व उत्साह एकाच दिशेने वळवता आल्यास उत्तम. आर्थिक फायदे होतील आणि प्रॉपर्टीसंबंधी रजिस्ट्रेशन्स आरामात पार पडतील. रिलेशनशिप बळकट होईल. डरमॅटॉलॉजिस्ट, ऑडिटर, वैज्ञानिक, सर्जन, राजकारणी आणि खेळाडूंना भरपूर प्रसिद्धी आणि यश मिळेल. शुभ रंग : Red and Blue शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया घरातल्या महिला कामगाराला लाल रुमाल दान करा. 17 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : लिअँडर पेस, कैलाशनाथ काटजू, मजरूह सुलतानपुरी, लिसा हेडन, अमृता राव
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या