Home /News /astrology /

Maharashtra SSC Results 2022 : दहावीच्या रिझल्टचं टेन्शन; निकालाआधी जरूर पाहा तुमचं राशिभविष्य

Maharashtra SSC Results 2022 : दहावीच्या रिझल्टचं टेन्शन; निकालाआधी जरूर पाहा तुमचं राशिभविष्य

Maharashtra SSC Result Horoscope 17 June 2022 : आज दहावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. आज तुमच्या राशीत काय आहे जरूर पाहा तुमचं राशिभविष्य.

आज दिनांक 17 जून 2022. वार शुक्रवार. तिथी ज्येष्ठ कृष्ण तृतीया/चतुर्थी. संकष्टी चतुर्थी. सूर्याचा मिथुन राशीत प्रवेश झाला आहे. आज चंद्र मकर राशीत असेल. पाहुया आजचे बारा राशींचे भविष्य.
मेष धैर्याची परीक्षा घेणार दिवस आहे. दशम चंद्र कार्यालयात काही समस्या निर्माण करेल. मातृ चिंता सतावेल. घरात जबाबदारी वाढेल. मध्यम दिवस. वृषभ आज जवळपासचे प्रवास संभवतात काही महत्त्वाचे निर्णय होतील. प्रयत्न करा. धैर्य खचू देऊ नका. मकर चंद्र लाभ देईल. दिवस मध्यम. मिथुन आर्थिक लाभ झाला तरी खर्चाचे वाढते प्रमाण त्रास देईल. मंगळ अचानक आणि वेगाने घटना घडवेल. जपून रहा. गुरुबळ उत्तम आहे. दिवस शुभ. कर्क मकर चंद्र शुभ आहे. पण शनी सावध वागण्याचा संकेत देत आहे. जोडीदाराची काळजी घ्या. कलह टाळा. नवीन घडामोडी होतील. शुभ दिवस. सिंह षष्ठ चंद्र अधिक खर्च, दवाखान्याची फेरी असे परिणाम देईल. शुक्र जोडीदार निवडताना मदत करील. शत्रू पराजित होतील. मात्र प्रकृती जपा. दिवस मध्यम. कन्या मन काहीसे अस्वस्थ राहिल. जवळच्या व्यक्तीची किंवा जोडीदाराची चिंता सतावेल. घाबरू नका. थोड्या काळात सगळे ठीक होईल. संततीची काळजी घ्या. दिवस शुभ. तूळ खूप कामाच्या दबावाने कंटाळून जाल. कुठेतरी जवळपास जाण्याचे बेत ठरतील. आर्थिक स्थिती ठिक राहिल आईवडिलांच्या प्रकृतीची काळजी वाटेल. दिवस मध्यम. वृश्चिक तृतीय स्थानातील चंद्र उत्कृष्ट अनुभव देईल. स्वयंपूर्ण आणि आनंदी राहाल. धार्मिक कामात रस घ्याल. तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील. प्रवास, संपर्क असा हा दिवस उत्तम जाईल. धनु आज दिवस सांभाळून राहण्याचा आहे. तृतीय शनी आर्थिकदृष्ट्या कठीण असून शुक्राची पंचम स्थानातील उपस्थिती मदत करेल. प्रकृतीची काळजी घ्या. दिवस घरात शांततेत जाईल. मकर राशीच्या तृतीय स्थानातील गुरू आणि राशीतील चंद्र जीवनात काही घडामोडी घडवेल. धन स्थानातील शनी त्रासदायक परिणाम देईल. जोडीदार वेळ देईल. प्रवास योग येतील. दिवस मध्यम. कुंभ मंगळ गुरू शनीवर अंकुश ठेवतील. व्यय चंद्र दवाखान्याची भेट होऊ शकते. आईकडील व्यक्तीशी संपर्क होईल. आर्थिक लाभ संभवतात. दिवस उत्तम. मीन आज दिवस शैक्षणिकदृष्टया उत्तम आहे. सामाजिक जीवनात यशस्वी होणार आहात. संततीची काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या ठिक आहे. दिवस उत्तम. शुभम भवतू!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या