• Home
 • »
 • News
 • »
 • astrology
 • »
 • Lunar Eclipse 2021: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कधी? जाणून घ्या कोणत्या राशीवर पडेल अधिक प्रभाव आणि काय घ्यावी काळजी

Lunar Eclipse 2021: वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण कधी? जाणून घ्या कोणत्या राशीवर पडेल अधिक प्रभाव आणि काय घ्यावी काळजी

Photo: Pixabay (File Photo)

Photo: Pixabay (File Photo)

Chandra Grahan 2021: आपल्या देशातील प्राचीन हिंदू संस्कृतीत खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा निकटचा संबध जोडला गेला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : सूर्य (Sun), चंद्र (Moon)आणि पृथ्वी (Earth) यांच्या भ्रमणामुळे घडणाऱ्या चंद्र ग्रहण (Moon Eclipse), सूर्यग्रहण (Sun Eclipse) या खगोलीय घटना आजही मानवी बुद्धी आणि मनाला भुरळ घालतात. आपल्या देशातील प्राचीन हिंदू संस्कृतीत खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यांचा निकटचा संबध जोडला गेला आहे. चंद्र तसंच अन्य ग्रहांनुसार ज्योतिषशास्त्रात मानवी राशी, जन्म कुंडली मांडली जाते. अनेक रूढी, रिती, परंपरांवर चंद्र, सूर्य, ग्रह, ताऱ्यांचा प्रभाव आहे. ग्रहण काळातील प्रथांवरून याची सहज प्रचिती येते. आपल्या देशात प्राचीनकाळापासून चंद्र किंवा सूर्यग्रहणाच्या काळात काही प्रथा, रितीरिवाज पाळले जात आहेत. आजही अनेक लोक या प्रथांचं पालन करतात. या वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण येत्या 19 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) 2021मध्ये एकूण दोन चंद्रग्रहणे आणि दोन सूर्यग्रहणे आहेत. त्यापैकी पहिले सूर्यग्रहण आणि पहिले चंद्रग्रहण झाले आहे. 2021 चे पहिले चंद्रग्रहण बुधवारी, 26 मे रोजी झाले, तर दुसरे चंद्रग्रहण आता शुक्रवारी, 19 नोव्हेंबर रोजी होणार आहे. यानंतर, वर्षातील शेवटचे ग्रहण आणि दुसरे सूर्यग्रहण 4 डिसेंबर रोजी होईल. वाचा : चक्क डोक्यावर ठेवली 735 अंडी; VIDEO पाहून तोंडात घालाल बोटं 19 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहण रात्री 11:34 वाजता सुरू होईल आणि पहाटे 5:33 वाजता संपेल. हे चंद्रग्रहण वृषभ आणि कृतिका नक्षत्रात होणार असून वृषभ राशीवर (Taurus) या चंद्रग्रहणाचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी सावध राहावे. हे चंद्रग्रहण त्यांच्यासाठी सर्वात अशुभ असेल, असा सल्ला ज्योतिषशास्त्रातील जाणकारांनी दिला आहे. या राशीच्या लोकांनी कोणाशीही वाद घालू नये. अकारण खर्च टाळावा. तसंच या राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणाच्या वेळी एकांतात राहून परमेश्वराचे नाम घ्यावे, असंही सुचवण्यात आलं आहे. हे चंद्रग्रहण खंडग्रास असल्याने त्याचा सुतक कालावधी वैध ठरणार नाही. तरीही, चंद्रग्रहणाच्या वेळी लोकांनी काहीही खाऊ किंवा पिऊ नये. देवाची उपासना करावी. शिजवलेल्या अन्नात तुळशीची पाने टाकावी ज्यामुळे ग्रहणाच्या अशुभतेचा परिणाम होणार नाही. ग्रहण काळात गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये, असा सल्लाही जाणकारांनी दिला आहे. (Disclaimer : या गोष्टींचं आम्ही समर्थन करत नाहीत. अनेकांच्या असलेल्या मान्यतांबाबत आम्ही केवळ वृत्तांकन करत आहोत.)
  First published: