Home /News /astrology /

Lucky Zodiac of June 2022: जून महिना या राशींसाठी ठरेल फलदायी, उत्पन्न वाढण्याची शक्यता 

Lucky Zodiac of June 2022: जून महिना या राशींसाठी ठरेल फलदायी, उत्पन्न वाढण्याची शक्यता 

वृश्चिक : वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृश्चिक राशीत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील पालकांचे म्हणणे संयमाने ऐका आणि त्यावर वादविवाद टाळा. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, हे टाळण्यासाठी योग किंवा ध्यान करा. वाहन जपून चालवा.

वृश्चिक : वर्षातील पहिले चंद्रग्रहण वृश्चिक राशीत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे. कुटुंबातील पालकांचे म्हणणे संयमाने ऐका आणि त्यावर वादविवाद टाळा. चंद्रग्रहणामुळे तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो, हे टाळण्यासाठी योग किंवा ध्यान करा. वाहन जपून चालवा.

12 पैकी 3 राशींसाठी हा कालावधी अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे.

    नवी दिल्ली, 28 मे : मानवी जीवनावर ग्रह, राशी आणि नक्षत्रांचा परिणाम होत असतो. ठरावीक कालावधीत होणाऱ्या ग्रहांच्या राशीपरिवर्तनामुळे (Transit) माणसाच्या जीवनात अनुकूल किंवा प्रतिकूल घटना घडतात, असं ज्योतिषशास्त्राचे (Jyotish shastra) अभ्यासक सांगतात. प्रत्येकाला आपलं भविष्य आणि भविष्यातल्या संभाव्य घटनांविषयी जाणून घेण्याची इच्छा असते. त्यामुळे काही व्यक्ती यासाठी ज्योतिष अभ्यासकांकडे जातात. आपल्याकडे ज्योतिषशास्त्र, हस्तसामुद्रिक शास्त्र, अंकशास्त्र आदींच्या माध्यमातून भविष्यकथन केलं जातं. ज्योतिष शास्त्रात ग्रह, राशी, नक्षत्र परिवर्तन आदींच्या मदतीने भविष्यातल्या संभाव्य घटनांविषयी भाष्य केलं जातं. लवकरच जून (June) महिना सुरू होत आहे. या महिन्यात 5 ग्रहांच्या स्थितीत मोठे बदल होत आहेत. न्यायाची देवता असलेले शनी (Saturn) महाराज जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वक्री होत आहेत. त्याशिवाय सूर्य, चंद्र, शुक्र आदी ग्रहदेखील राशिपरिवर्तन करणार आहेत. याचा निश्चितच परिणाम सर्व राशींवर (Zodiac Signs) पाहायला मिळणार आहे; मात्र 12 पैकी 3 राशींसाठी हा कालावधी अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. जून महिन्यात शनी, रवि, चंद्र आणि शुक्रासह अन्य काही ग्रह राशिपरिवर्तन करत आहेत. या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम राशींवर पाहायला मिळणार आहे. शनी ग्रह कुंभ या स्वराशीत वक्री होणार आहे. चंद्र दर अडीच दिवसांनी राशिपरिवर्तन करत असतो. रवीदेखील वृषभ राशीतून बुधाच्या मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. या प्रमुख ग्रहांच्या गोचराचा परिणाम मानवी जीवनावर पाहायला मिळू शकतो, असं ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मत आहे. 12 पैकी 3 राशींना ग्रहांचं गोचर विशेष फलदायी ठरणार आहे. मेष, वृषभ आणि मिथुन राशीच्या व्यक्तींना मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. मेष (Aries) : मेष राशीच्या व्यक्तींसाठी जून 2022 हा महिना अत्यंत चांगला ठरेल. एकीकडे, नोकरी करणाऱ्यांना करिअरमध्ये यश मिळेल, तर दुसरीकडे, विद्यार्थ्यांनादेखील या महिन्यात मोठं यश मिळू शकतं. त्यामुळे सकारात्मक विचार करत मेहनत सुरू ठेवा. काही जणांचं परदेशात नोकरी करण्याचं स्वप्नही पूर्ण होईल. धनलाभ होईल. आर्थिक स्थिती उत्तम होईल. व्यापारी वर्गाचा नफा वाढेल. खासगी आयुष्य आनंदी राहील. वृषभ (Taurus) : जून 2022 हा महिना वृषभ राशीच्या व्यक्तींना मोठा आर्थिक लाभ मिळवून देईल. अनेक मार्गांनी धनलाभ होऊ शकतो. उत्पन्न वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील. तुमच्या आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्यानंतर तुम्ही बचतही करू शकाल. नवीन नोकरी मिळू शकते. पदोन्नती होऊ शकते. कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीनं हा कालावधी उत्तम आहे. जीवनाचा आनंद घेता येईल. मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या व्यक्तींना जून महिना करिअरमध्ये चांगला फलदायी ठरेल. नोकरीत बदल कराल किंवा बदलीचे योग आहेत. काही व्यक्तींचं कामकाज किंवा जबाबदारीत बदल होण्याची शक्यता आहे. उत्पन्न वाढेल. प्रेमजीवन, वैवाहिक जीवन चांगलं राहील. आरोग्य चांगलं राहील; पण मानसिक चिंता सतावेल. त्या दृष्टीनं आवश्यक ती काळजी घेणं आवश्यक आहे.

    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

    पुढील बातम्या