मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /शतकातलं सगळ्यात मोठं चंद्रग्रहण 18-19 नोव्हेंबरला; भारतात दिसणार का नाही?

शतकातलं सगळ्यात मोठं चंद्रग्रहण 18-19 नोव्हेंबरला; भारतात दिसणार का नाही?

या शतकातलं सर्वांत मोठं म्हणजे सुमारे साडेतीन तास चालणारं खंडग्रास चंद्रग्रहण (lunar eclipse) हे 18-19 नोव्हेंबरला आहे. 580 वर्षांनंतर असं दीर्घ चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 28 मिनिट 23 सेकंद असणार आहे.

या शतकातलं सर्वांत मोठं म्हणजे सुमारे साडेतीन तास चालणारं खंडग्रास चंद्रग्रहण (lunar eclipse) हे 18-19 नोव्हेंबरला आहे. 580 वर्षांनंतर असं दीर्घ चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 28 मिनिट 23 सेकंद असणार आहे.

या शतकातलं सर्वांत मोठं म्हणजे सुमारे साडेतीन तास चालणारं खंडग्रास चंद्रग्रहण (lunar eclipse) हे 18-19 नोव्हेंबरला आहे. 580 वर्षांनंतर असं दीर्घ चंद्रग्रहण दिसणार आहे. या ग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 28 मिनिट 23 सेकंद असणार आहे.

    मुंबई, 12 नोव्हेंबर : या शतकातलं सर्वांत मोठं म्हणजे सुमारे साडेतीन तास चालणारं खंडग्रास चंद्रग्रहण (lunar eclipse) हे 18-19 नोव्हेंबर रोजी उत्तर अमेरिकेत दिसणार आहे. तब्बल 580 वर्षांनंतर असं दीर्घ चंद्रग्रहण दिसणार आहे, असं नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेने (NASA) म्हटलं आहे. अमेरिकेतल्या नागरिकांना हे चंद्रगहण पाहायला मिळणार आहे. या ग्रहणाचा कालावधी भारतीय प्रमाणवेळेनुसार दिवसा येत असल्याने ते भारतात दिसणार नाही. या चंद्रग्रहणाला मायक्रो बीव्हर मून (The Micro Beaver Moon) असं म्हटलं आहे. कारण, हे चंद्रग्रहण पृथ्वीपासून जास्त अंतरावर आहे. या काळात अमेरिकेत ऑटर (Beaver) प्राणी पकडले जातात. म्हणूनच याला असं म्हटलं जातं.

    अमेरिकेतल्या 50 राज्यांमध्ये हे चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्यांसबधी कोणतेही विधिनिषेध पाळण्याची गरज नाही. या ग्रहणाचा एकूण कालावधी 3 तास 28 मिनिट 23 सेकंद असणार आहे. त्यामुळे जगभरातले शास्त्रज्ञ या चंद्रग्रहणाचं अद्भुत दृश्य कॅमेऱ्यात टिपण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

    ऑस्ट्रेलिया, पश्चिम युरोप, न्यूझीलंड, उत्तर अमेरिका, पॅसिफिक बेटे आणि जपानच्या काही भागात चंद्रग्रहण दिसणार आहे. चंद्र उगवतेवेळी सुरुवातीला पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये थोडेसं ग्रहण दिसेल. दक्षिण अमेरिका आणि पश्चिम युरोपमधले नागरिक चंद्रग्रहणाचं उत्तम दर्शन घेऊ शकतील. तब्बल 580 वर्षांनंतर होणारं हे दीर्घ ग्रहण आफ्रिका, मध्य पूर्व आणि पश्चिम आशियामधल्या नागरिकांना दिसणार नाही.

    इंडियाना इथल्या बटलर विद्यापीठातल्या हॉलकॉम्ब वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, पृथ्वीची सावली चंद्राचा 97 टक्के भाग व्यापते. त्याला खंडग्रास चंद्रग्रहण (Partial Lunar Eclipse) म्हणतात. हे या शतकातलं हे सर्वांत मोठे खंडग्रास चंद्रग्रहण असणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये एक तास 43 मिनिटांचं चंद्रग्रहण झालं होतं. त्यानंतर पुन्हा 15-16 मे 2022 रोजी चंद्रग्रहण दिसलं. त्यानंतर 7-8 नोव्हेंबरला आणखी एक खग्रास चंद्रग्रहण होणार आहे. हे चंद्रग्रहण अनेक देशांत दिसू शकेल.

    सूर्य व चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. पृथ्वीची सावली संपूर्ण चंद्र व्यापू शकते. चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पूर्णपणे गडद होतो. त्यामुळे चंद्र लाल रंगात दिसतो. चंद्रग्रहणाच्या प्रत्येक तपशीलावर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातल्या खगोलतज्ज्ञांनी विशेष तयारी केली आहे.

    First published:
    top videos