मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Horoscope 2021 Leo: सिंह राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात जोडीदार मिळणार; पण भावनांच्या आहारी जाऊन निर्णय नको

Horoscope 2021 Leo: सिंह राशीच्या व्यक्तींना नव्या वर्षात जोडीदार मिळणार; पण भावनांच्या आहारी जाऊन निर्णय नको

New Year 2021 Rashifal: येणारं नवं वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींसाठी काही चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे आणि काही अडचणीही येणार आहेत. जाणून घेऊ या तुमच्यासाठी (LEO) कसं असेल हे वर्ष?

New Year 2021 Rashifal: येणारं नवं वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींसाठी काही चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे आणि काही अडचणीही येणार आहेत. जाणून घेऊ या तुमच्यासाठी (LEO) कसं असेल हे वर्ष?

New Year 2021 Rashifal: येणारं नवं वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींसाठी काही चांगल्या गोष्टी घेऊन येणार आहे आणि काही अडचणीही येणार आहेत. जाणून घेऊ या तुमच्यासाठी (LEO) कसं असेल हे वर्ष?

नवं वर्ष सुरू झालं, की प्रत्येकाच्या मनात नवी उमेद जागृत होते. नवं वर्ष (New Year) जुन्या वर्षापेक्षा चांगलं जाण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. 2021च्या बाबतीतही लोक हाच विचार करत असतील, की 2020पेक्षा हे वर्ष चांगलं जावं आणि यश मिळावं. तुमचं भविष्य उत्तम असावं, अशी आम्हीही इच्छा करतो. म्हणूनच 2021 या वर्षाचं राशिफल कसं असेल, यातली महत्त्वाची माहिती आम्ही लेखातून तुम्हाला देणार आहोत. यातून तुम्हाला तुमच्या भविष्याची झलक पाहायला मिळेल आणि त्याच्या साह्याने तुम्ही 2021 अधिक चांगलं जाण्यासाठी प्रयत्न करू शकाल. सिंह राशीच्या (Leo) व्यक्तींच्या जीवनात 2021मध्ये कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये परिवर्तन होणार आहे आणि कोणत्या क्षेत्रात चांगले परिणाम पाहायला मिळणार आहेत, हे पाहू या. करिअर आणि व्यवसाय सिंह राशीच्या व्यक्तींना यंदा करिअरच्या (Career) बाबतीत चांगले अनुभव येतील. खासकरून वर्षाच्या सुरुवातीला तुमची चतुराई आणि समज यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रात अनुकूल वातावरण दिसून येईल. या वर्षी तुम्ही तुमच्या बोलण्याचा प्रभाव पाडून लोकांकडून कामं करून घेऊ शकाल. वर्षाच्या मध्यात तुमच्या कार्यक्षेत्रात काही आव्हानं येतील; पण तुम्ही त्या आव्हानांना चांगल्या पद्धतीने तोंड देऊ शकाल. सिंह (Leo) राशीच्या व्यक्तींनी या वर्षी प्रत्येक काम विचारपूर्वक करावं, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नये. गुंतवणूक (Investment) करण्याआधी विश्वासार्ह माणसांचा सल्ला जरूर घ्या. आर्थिक आणि कौटुंबिक जीवन सिंह राशीच्या व्यक्तींची या वर्षी कमाई तर होईल; पण खर्चांतही वाढ होताना दिसेल. वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही थोडी-फार धनवृद्धी करू शकाल; पण वैवाहिक जीवनात काही खर्च होऊ शकतात. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कठीण परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे तुम्ही यंदा तुमचं बजेट व्यवस्थिपणे आखण्याची गरज आहे. सिंह राशीच्या व्यक्तींचं कौटुंबिक जीवन यंदा चांगलं जाईल. या वर्षी तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. छोटी-मोठी भांडणं होण्याची शक्यता आहे; पण तुमच्या समजूतदार वर्तनामुळे तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकाल. प्रेम आणि वैवाहिक जीवन या राशीच्या ज्या व्यक्ती प्रेमात पडल्या आहेत, त्यांच्या जीवनात यंदा सकारात्मक बदल दिसतील. प्रेमप्रकरणात काही रुसवे-फुगवे असले, तर ते यंदा दूर होऊ शकतील. जे लोक अजून सिंगल (Single) आहेत, त्यांच्या आयुष्यात कोणी खास व्यक्ती येऊ शकते. तुमच्या मित्रमंडळींमध्येच तुम्हाला तुमचा जोडीदार सापडू शकेल. सिंह राशीच्या विवाहित व्यक्तींसाठी वर्षाचे तीन-चार महिने चांगले असतील. एप्रिलनंतर मात्र त्यांना सावधानता बाळगायला हवी. या काळात वाचाळवीरता करू नये. शिक्षण आणि आरोग्य सिंह राशीच्या व्यक्तींना यंदा शैक्षणिक बाबतीत काही अडचणींना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. एकाग्रता साध्य करण्यासाठी अधिक कष्ट पडू शकतील. चुकीच्या व्यक्तींची संगत नको. विद्यार्थ्यांना पहिले चार महिने सर्वांत अनुकूल आहेत. आरोग्याच्या दृष्टीनेही या राशीच्या लोकांनी काळजी बाळगावी. मेदयुक्त (Fatty) पदार्थ अधिक खाणं टाळावं. ऋतुबदलाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. (साभार-AstroSage.com)
First published:

Tags: Rashibhavishya

पुढील बातम्या