Home /News /astrology /

Daily Horoscope : Labour Day 2022 ला चांगली बातमी मिळणार; पैशांसंबंधी प्रश्नही मार्गी लागणार

Daily Horoscope : Labour Day 2022 ला चांगली बातमी मिळणार; पैशांसंबंधी प्रश्नही मार्गी लागणार

कामगार दिनी तुमच्या राशीत काय आहे पाहा तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 1 मे 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) बऱ्याच गोष्टींची खरी बाजू तुम्हाला दिसू लागणार आहे, त्यामुळे कितीतरी गोष्टींबाबत तुमचं मत अधिक स्पष्ट होईल. एखादी संधी हातातून सुटते असं वाटू शकतं; मात्र प्रयत्न कायम ठेवल्यास नक्कीच ती संधी पुन्हा हातात येईल. कामासंबंधी मीटिंग किंवा एखाद्या गेट टुगेदरचं आमंत्रण येऊ शकतं. LUCKY SIGN – वडाचं झाड (Banyan tree) वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) एखाद्या वडिलधाऱ्या व्यक्तीने दिलेला सल्ला आत्ता तितका महत्वाचा वाटणार नाही; मात्र त्यावर नक्की विचार करा. त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करणं फायद्याचं ठरू शकतं. दिवसभर एखाद्या क्लिष्ट गोष्टीमध्ये मन गुंतून जाईल. दिवसाच्या शेवटी एखादी चांगली बातमी तुमच्यात पुन्हा उत्साह भरेल. आज स्वतःकडे जरा लक्ष द्या. त्यासाठी घरीच राहणं उत्तम. LUCKY SIGN – मेणबत्ती (Candles) मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) काय करू आणि काय नको, हे करू की ते, अशा द्विधा मनस्थितीमध्ये आज असाल; मात्र लवकरच याबाबत स्पष्टता मिळेल. तुमच्या जोडीदाराला प्रकृतीची समस्या जाणवू शकते. तुम्हाला त्यांची आणि स्वतःचीही काळजी घ्यावी लागेल. वीकेंडचा काही प्लॅन असेल, तर तो पुढे ढकलला जाऊ शकतो. करिअरमध्ये नवी संधी चालून येईल; मात्र त्यासाठी कदाचित दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होण्याचीदेखील गरज भासू शकते. LUCKY SIGN – रेल्वे (A train) कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) एखादी गोष्ट बोलण्यामागे तुमचा उद्देश चांगलाच असतो; मात्र इतरांच्या ते लक्षात येत नाही आणि त्यांचा गैरसमज होतो. हे तुमच्या बाबतीत भरपूर होत असेल, तर त्याला कारण तुमचे ग्रह आहेत. त्यामुळे सध्या तरी कमी बोलणंच तुमच्यासाठी फायद्याचं आहे. काही गोष्टींचं निराकरणही होऊ शकतं. मुलांमुळे काही प्रमाणात मानसिक अस्वस्थता जाणवेल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. व्यायाम सुरू करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. LUCKY SIGN – जॅकपॉट (Jackpot) सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) नाती सांभाळणं हे अगदी जिकिरीचं काम असतं. त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल मत व्यक्त करताना थोडी काळजी घ्या. विशेषतः आपल्या जवळच्या व्यक्तींबाबत तुम्ही व्यक्त केलेलं एखादं मत त्यांचं मन दुखावू शकतं. तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर हीच वेळ आहे. भूतकाळातल्या काही गोष्टी पुन्हा आयुष्यात येऊ शकतात. पैशांचे प्रश्न सुटतील. LUCKY SIGN – तारे (Stars) कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) नवीन करार करण्यासाठी, नवी पार्टनरशिप सुरू करण्यासाठी तुम्ही आतापर्यंत थांबला असाल, तर हीच योग्य वेळ आहे. आतापर्यंत केलेल्या कष्टाचं चीज आता होताना दिसून येईल. सुरू असलेला बिझनेस थोडा मंद वाटेल; मात्र भविष्यात चांगली स्थिरता येईल. घरगुती वाद उफाळून येतील. तसंच, तुम्हाला एखादी बैठक घ्यावी लागेल. LUCKY SIGN – ग्लास टॉप (A Glass top) तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) येत्या काळात कशाचं तरी सेलिब्रेशन होणार आहे. पैशांचे प्रश्न सुटू शकतात, कामाच्या ठिकाणी चांगली काही तरी गोष्ट कळू शकते. तुमच्या एखाद्या वेगळ्या निर्णयातही कुटुंबीय तुम्हाला साथ देतील. कामाची नवी जागा तयार कराल. गेल्या वर्षी भेटलेल्या वा पाहिलेल्या एखाद्या व्यक्तीकडून प्रेरणा घ्याल. भूतकाळात केलेली गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. LUCKY SIGN – घोडा (A Horse) वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्या आजूबाजूचं वातावरण तुम्हाला आवडू लागेल. हा बदल तुमच्यातला असू शकतो किंवा मग वातावरणातला. कामाच्या ठिकाणी सीनियर मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल घडू शकतात. एखाद्या गोष्टीचा अतिविचार केल्यामुळे त्याबाबत गुंतागुंत आणखी वाढू शकते. त्यामुळे ओव्हरथिंकिंग टाळा. सोबतच, दुसऱ्या व्यक्ती काय बोलतात याकडे विनाकारण लक्ष देऊ नका. LUCKY SIGN – एका रांगेत पाच पक्षी (5 birds in a row) धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) आपल्या जोडीदाराला थोडी स्पेस देण्याचा विचार कराल. तुम्हाला पार्टनरबद्दल नेमकं काय वाटतं, हे तुम्हाला सांगता येणार नाही. कामासाठी एखादी छोटी ट्रिप होऊ शकते. ही ट्रिप चुकवू नका. यामुळे कंपनीमध्ये तुमची प्रतिमा चांगली होण्यास मदत होईल. भरपूर काम आणि कमी आराम असा काहीसा हा काळ आहे; मात्र याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल. LUCKY SIGN – बुद्धाचा पुतळा (Buddha Statue) मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) एखादी गोष्ट करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत. तुमचा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत एखाद्या कॅज्युअल मीटिंगमध्ये तुम्हाला नवीन कल्पना सुचू शकते. आई-वडिलांकडे थोडं लक्ष देण्याची गरज आहे. त्यांच्यासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. काम तर भरपूर असणार आहे; मात्र तुमचा मूड आळसाचा राहील. LUCKY SIGN – टोपाझ (A topaz) कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) आजूबाजूला झालेल्या वातावरणातल्या बदलामुळे अगदीच प्रेरणादायी वाटेल. स्वीकारार्हता येऊ शकते; मात्र त्यासाठी थोडा वेळ लागेल. तुम्ही आजूबाजूच्या सर्वांशी मैत्री ठेवण्याचा प्रयत्न करता; मात्र कित्येक वेळा तुम्हीच एकटे राहता. आयुष्य आणखी काही काळ असंच राहू शकतं. पैशांच्या बाबतीत एखादी चांगली बातमी मिळेल. घरगुती कौशल्यं लवकरच विकसित करावी लागणार आहेत. कोर्ट-कचेरीच्या बाबतीत कायदेशीर सल्ला काटेकोरपणे पाळा, अन्यथा केसची दिशा बदलू शकते. LUCKY SIGN – पांढरे गुलाब (White roses) मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) एखाद्या गोष्टीचा गांभीर्याने विचार करत असाल, तर त्याबाबत प्रत्येक बाजूने विचारही करून पहा. ओळखीच्या काही व्यक्तींकडून सल्ला घेण्याचा प्रयत्न कराल; मात्र बरोबर उत्तर मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सध्या ‘ऐकावे जनाचे करावे मनाचे’ असा काहीसा मार्ग अवलंबा. एखाद्या गोष्टीकडे भावनिकतेने नाही, तर प्रॅक्टिकल होऊन पाहा. कामाच्या गोष्टी घरी न आणणंच उत्तम. LUCKY SIGN – लोहचुंबक (Magnet)
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya, Zodiac signs

पुढील बातम्या