तुमचा आजचा दिवस कसा असेल? आलेल्या संकटांना कसे सामोरे जाल, याबाबत जाणून घ्या. वाचा तुमच्या राशीत आज काय आहे महत्त्वाचं. आज सोमवार दिनांक 14 जून 2021 तिथी ज्येष्ठ शुद्ध चतुर्थी. आज चंद्र कर्क राशीतून भ्रमण करणार आहे.
आजचे बारा राशींचे राशी भविष्य..
मेष
या राशीच्या व्यक्ती साठी आजचा दिवस उत्तम असुन घरांमधे काही विशेष काम निघू शकते. सुट्टी घेऊन आराम करावा अशी इच्छा होईल.
आईशी मतभेद टाळावे. आणि गणरायाची आराधना करावी.
वृषभ
राशीच्या तृतीय स्थानातून चंद्र भ्रमण होत आहे.
भावंडाची गाठभेट. वाद टाळा. मृदू भाषा वापरा. छोटे प्रवास संभवतात. दिवस आनंदाने व्यतीत होईल.
मिथुन
राशीच्या धन स्थानी असलेला चंद्र मंगळ योग आर्थिक बाजु सांभाळेल. आनंदात दिवस घालवा. खर्च होईल. पण समाधानकारक दिवस.
कर्क
राशीला आज राशिस्थानी चंद्र, राशीतील मंगळ भ्रमण तुम्हाला आग्रही बनवेल. पैसा खर्च होईल.
दिवस काळजीपूर्वक घालवा. शनी जप करणे फायद्याचे ठरेल.
सिंह
राशीच्या व्ययस्थानातील मंगळ चंद्र. काही ताण, खर्च दर्शवतात.
आजचा दिवस मध्यम आहे. मित्र-मैत्रिणी सोबत दिवस आनंदात घालवा. पण कायदा व सुव्यवस्था सांभाळुन रहा. गुरूची शुभ दृष्टी फायद्याची.
कन्या
राशीच्या लाभ स्थानातील चंद्र मंगळ शुभ असुन नवीन मार्ग निघेल.
अचानक मित्रांचे फोन येतील. गाठीभेटी होतील. मौजमजा करण्याचा दिवस. काळजी नको.
तुला
आज दिवस कार्यालयीन कामकाज करण्यात घालवा. मानसिक ताण कमी होईल.
थोडा वेळ स्वतः साठी ठेवावा. घराकडे लक्ष द्यावे. दिवस मध्यम आहे.
वृश्चिक
कर्क राशीतील, चंद्र मंगळ, आध्यात्मिक कल वाढवतो. सुर्य राहु सप्तमात, मंगळ व चंद्र हे भाग्यात अशी ग्रह स्थिती शुभ आहे. गुरुकृपा आहे. शुभ दिवस.
धनु
आज धनु राशीच्या व्यक्तीनी काळजी घ्यावी. वाहन जपून चालवावे. त्रास होण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्याची. तयारी ठेवा. गणेश उपासना करा.
मकर
राशीच्या समोरील चंद्रमंगळ, राशिस्थानी शनी पंचमात राहु बुध ही ग्रहस्थिती अचानक येणारे प्रश्न सुचवतात. मुलांच्या प्रकृतीला
सांभाळुन राहावे. सूर्याला अर्घ्य द्यावे. उपासना करत राहावी.
कुंभ
प्रकृतीकडे लक्ष द्या. राशीतील गुरू, चतुर्थात बुध राहू. ही ग्रह स्थिती आहे. बदल घडले तर बरे असे वाटेल. शत्रू वाटेला जाणार नाही. दिवस मध्यम आहे.
मीन
पंचमात चंद्र मंगळ संतती कडे लक्ष द्या असे सुचवतो. शनी देव साथ देतील. कुटुंबासोबत वेळ घालवावा. गुरूची उपासना करावी. दिवस चांगला आहे.
शुभम भवतु.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rashibhavishya