Home /News /astrology /

राशीभविष्य : कर्क राशीला आर्थिक लाभ, इतर राशींच्या नशीबात आहे का अर्थलाभ?

राशीभविष्य : कर्क राशीला आर्थिक लाभ, इतर राशींच्या नशीबात आहे का अर्थलाभ?

आज रविवार दिनांक 12 सप्टेंबर 2021. तिथी भाद्रपद शुक्ल षष्ठी. गौरी आवाहन. चंद्र आज वृश्चिक राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य

आज रविवार दिनांक 12 सप्टेंबर 2021. तिथी भाद्रपद शुक्ल षष्ठी. गौरी आवाहन. चंद्र आज वृश्चिक राशीतून भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य मेष हळूहळू तणाव वाढणार आहे. षष्ठ ग्रह आहेत. आरोग्याला प्राधान्य द्यावे लागेल. खर्च बेताने करा. अध्ययन, ईश्वर उपासना करावी, जोडीदारासाठी अनुकूल काळ. दिवस सामान्य आहे. वृषभ आज दिवस अनुकूल असून नित्य कर्म करण्यात यश देईल. काही विशेष पूजा इत्यादी घडेल. जोडीदाराला वेळ द्यावा लागेल. संततीसाठी दिवस शुभ. मिथुन आज जाणवणारा आळस अणि थकवा आता कमी होणार आहे. दिवस सर्व सामान्यपणे व्यतीत होईल. घरात शांतता मिळणे अवघड जाईल. शनि उपासना करावी. कर्क आर्थिक लाभाची अपेक्षा पूर्ण होईल. घरात शुभ कार्य घडतील. प्रवास योग येतील. मुलांच्या बाबतीत काही समाचार मिळतील. कुटुंबाला प्राथमिकता राहील. दिवस चांगला. सिंह राशीच्या धन स्थानातील ग्रह काहीतरी आर्थिक घडामोडी  सुरू ठेवतील. प्रवास सुखकर होतील. जोडीदारासाठी शुभ काळ असून नवीन कार्य ठरतिल.दिवस चांगला जाईल. कन्या घरात नवीन खर्च उभे राहतील. मंगळाचा जप करावा. व दान करावे.भावंडांची भेट, फोन होतील. प्रकृती कडे लक्ष असू द्यावे. काही मोठ्या कार्यक्रमाची तयारी कराल. दिवस मध्यम. तुला आर्थिक व्यवहार जपून करा. प्राप्तीचे मार्ग मिळतील. मुलाखतीतून यश मिळवून देणारा दिवस आहे. कुटुंब सुख उत्तम राहील. दिवस चांगला जाईल. वृश्चिक अनुराधा नक्षत्रातला चंद्र प्रकृतीचे त्रास दाखवित आहे. स्वभाव हट्टी होईल. आपले तेच खरे असे करू नका. दिवस अनुकूलता वाढवणारा आहे. लाभ घ्या. धनु आज खर्च, आणि दगदग होणार आहे. पण तुम्ही सांभाळून घेणार आहात. दिवस सामान्य असून रोजची कामे पार पडावीत. आर्थिक बाबी सांभाळून करा. मकर आज दिवस अनुकूल असून नैमित्तिक कामाशिवाय ईश्वरी उपासना करावी. मैत्रिणींना भेटणे शक्य होईल. धार्मिक कार्य घडेल. दिवस शुभ. कुंभ आज घर अणि ऑफिस मध्ये समन्वय साधावा लागेल. त्यासाठी जास्तीची काम करण्याचा प्रयत्न कराल. भाग्यात शुक्र  आनंदाचे वातावरण देईल. दिवस उत्तम जाईल. मीन आज दिवस भाग्यशाली असून संध्याकाळ पर्यंत काम उरकून घ्या. आर्थिक स्थिती उत्तम राहील. खाण्या पिण्याचे बंधन पाळा. आरोग्य थोडे संभाळावे. दिवस चांगला. शुभम भवतु!!
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya

पुढील बातम्या