• Home
  • »
  • News
  • »
  • astrology
  • »
  • नातेसंबंधांबाबत वारंवार चुका? तुमचा नाही तर राशीचा दोष, जाणून घ्या काय सांगते तुमची रास

नातेसंबंधांबाबत वारंवार चुका? तुमचा नाही तर राशीचा दोष, जाणून घ्या काय सांगते तुमची रास

सासूबरोबर वाद झाला तरी, पतीबरोबर त्या विषयावर चर्चा करत नाहीत. पती आपल्या आईचीच बाजू घेईल आणि पतीशी असलेल्या नात्यावर त्याचा परिणाम होईल हा विचार त्यांच्यामनात येत असतो.

सासूबरोबर वाद झाला तरी, पतीबरोबर त्या विषयावर चर्चा करत नाहीत. पती आपल्या आईचीच बाजू घेईल आणि पतीशी असलेल्या नात्यावर त्याचा परिणाम होईल हा विचार त्यांच्यामनात येत असतो.

अनेकदा चुका होणं आणि काहीवेळा तर अगदी सारख्याच पद्धतीने चुका होणं आपल्या नशिबात लिहिलेलं असतं; पण नातेसंबंधांतल्या आपल्याकडून घडणाऱ्या काही सर्वसाधारण चुकांसाठी आपण ग्रह-ताऱ्यांना जबाबदार धरू शकतो.

  • Share this:
नवी दिल्ली 01 जुलै : कोणाचीही पहिली भेट आणि मनात तयार झालेली पहिली प्रतिमा (First meetings and first impressions) यांचा प्रभाव मनावर पडतो. आपण याची कायमच काळजी घेतो, की आपल्या जोडीदाराला कायम आपल्यातली सर्वात चांगली बाजूच अनुभवायला मिळावी; मात्र दरवेळी ते शक्य नसतं. आपण सगळेच चुका करतो. चुका हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. त्यातूनच माणूस घडतो. अनेकदा चुका होणं आणि काहीवेळा तर अगदी सारख्याच पद्धतीने चुका होणं आपल्या नशिबात लिहिलेलं असतं; पण नातेसंबंधांतल्या आपल्याकडून घडणाऱ्या काही सर्वसाधारण चुकांसाठी आपण ग्रह-ताऱ्यांना जबाबदार धरू शकतो. मेष (Aries) : तुम्हाला आवडो किंवा न आवडो राशिचक्रातल्या पहिल्या राशीची माणसं कमालीची स्पष्टवक्ती आणि प्रामाणिक असतात. जीवनाच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास, मेष राशीची माणसं ही अगदी लहान मुलासारखी असतात. त्यांचा उत्साह त्यांना स्वस्थ बसू देत नाही. त्यांच्यावर मंगळाचा प्रभाव असल्याने त्यांची व्यक्तिमत्त्वं अक्षरशः धगधगती असतात आणि त्यांच्यात धैर्य असतं. त्यामुळे त्यांच्यात योद्ध्याचे गुणधर्म निसर्गतःच असतात. त्यांच्या रागाचा सामनाही आजूबाजूच्या अनेकांना करावा लागतो. रागाच्या भरात ते लोकांना काही बोलूही शकतात; मात्र नंतर त्यांना पश्चातापही होतो. मेष राशीची माणसं एकदा शांत झाली, की ते आधी ज्या परिस्थितीने त्यांना त्रास दिलेला असतो, त्या परिस्थितीवर पूर्ण मात करतात आणि पुढे जाण्यास सज्ज असतात. दुर्दैवाने, मेष राशीच्या शीघ्रकोपी व्यक्तिमत्त्वांना स्वीकारण्यास प्रत्येक जोडीदार तयार नसतो किंवा प्रत्येकाची तशी क्षमता नसते. राशीभविष्य: वृषभ, मिथुन, कर्केला दिवस लाभदायक; कुठल्या राशींनी सांभाळून राहायचं? वृषभ (Taurus) : उद्दिष्टपूर्ती करण्याबद्दल असलेल्या दृढ कटिबद्धतेमध्ये अनेकदा अडथळे येतात; मात्र वृषभ राशीच्या व्यक्तिमत्त्वांच्या हट्टी स्वभावामुळे त्यांना अनेकदा अडचणीत जावं लागतं. वृषभ ही स्थिर राशी आहे आणि बैल हे या राशीचं चिन्ह आहे. वृषभेचा हंगाम वसंत ऋतूच्या मध्यात असतो, सुरुवातीला किंवा शेवटी नसतो. वृषभ राशीच्या व्यक्ती यंत्रणांचं व्यवस्थापन करण्यात कुशल असतात. निष्ठा आणि सातत्य हे त्यांचे अभिमानाचे गुण असतात. त्यामुळे एखादा निर्णय घेतल्यानंतर कोणतीही परिस्थिती उद्धभवली, तरी ते त्यावर ठाम राहतात. वृषभेच्या व्यक्तींची निष्ठा कौतुकास्पद असली, तरी त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की आयुष्य हे नेहमीच काळं किंवा पांढरं नसतं. काही माहिती उपद्रवी असते, परिस्थिती बदलत असते. त्यामुळे कोणत्याही निरोगी नात्यामध्ये ठरावीक प्रमाणात लवचिकता असणं फायदेशीर असतं. वृषभेच्या व्यक्तींनी हे लक्षात ठेवायला हवं, की त्यांच्या कौतुकास्पद असलेल्या प्रामाणिकपणाचा त्यांना त्याग करावा लागणार नाही; मात्र लवचिकता नसणं या गुणामुळे कोणतंही नातं बिघडू शकतं. मिथुन (Gemini) : या राशीच्या व्यक्ती जिज्ञासू असतात, त्यांना दुसऱ्यांच्या खासगी गोष्टी जाणून घेण्यात रस असतो. कोणत्याही गोष्टींचा विस्तार कसा होईल याकडे त्यांचा कल असतो. अनेक छंद सांभाळणं, मित्रांचे कंपू बदलणं आणि एकाचवेळी अनेक कामं/नोकऱ्या करणं अशी लक्षणं यांच्यात दिसू शकतात. अनेक प्रकारचे व्याप सांभाळताना ते आनंदी असतात आणि त्यांचा दमवणारा व्याप ते सांभाळू शकतात. वेगाने धावणाऱ्या, धकाधकीच्या वातावरणात मिथुनेच्या व्यक्ती तगू शकतात. आजपासून बदलणार हे महत्त्वाचे आर्थिक नियम; LPG, बँकिंगसंदर्भात होणार असे बदल मिथुनेच्या व्यक्तींनी त्यांचे छंद, आवडत्या गोष्टी करण्यासाठी उत्तम यंत्रणा तयार केलेली असते, तरीही 'जॅक ऑफ ऑल ट्रेड्स' या प्रकारात मोडणारी ही मंडळी कोणत्याही एकाच गोष्टीवर खूप लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. जेव्हा एखादी व्यक्ती तुमचा जोडीदार बनण्याचा गांभीर्याने विचार करत तुमच्या आयुष्यात येते, तेव्हा साहजिकच ही चांगली गोष्ट असते असं नाही. दीर्घकालीन नातं निभावण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, समर्पणाची भावना लागते, बारकाईने लक्ष द्यावं लागतं. मिथुन राशीच्या व्यक्तींना ते कायमच शक्य होतं असं नाही. मिथुन राशीच्या व्यक्तींनी त्यांच्या नातेसंबंधांना प्राधान्य दिलंच पाहिजे. प्राधान्य न दिलेली नाती अडगळीतच जातात. कर्क (Cancer) : पाण्यातलं दैवी चिन्ह असलेली ही पहिली रास आहे. चंद्र हा या राशीचा स्वामी आहे. या राशीच्या व्यक्ती प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्वांसाठी ओळखल्या जातात; पण चंद्राच्या कलांप्रमाणेच कर्क राशीच्या माणसांचं व्यक्तिमत्त्व मूडी आणि चंचल असतं. खेकड्यांच्या कठीण, टणक कवचाच्या आत त्यांचं अत्यंत मृदू, संवेदनशील शरीर असतं. त्यामुळे त्यांना भीती वाटते, तेव्हा ते त्यांच्या चिलखती रूपात जातात. खेकड्यांच्या नख्यांप्रमाणेच कर्क राशीच्या व्यक्तीही जोरदार हल्ला करू शकतात. त्यांच्या स्व-संरक्षणाच्या कृती आक्रमक असू शकतात. नातेसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झालं, तर कर्क राशीच्या व्यक्तींनी हे लक्षात ठेवलंच पाहिजे, की गैरसमज आणि मिसकम्युनिकेशन्स या गोष्टी घडतच असतात. छोट्या वादांमुळे, मतभेदांमुळे तुमचा जोडीदार लगेच तुमचा शत्रू होत नाही. इथे रक्ताळला समुद्र! शेकडो व्हेल माशांची निर्घृण कत्तल; कारण ऐकून व्हाल हैराण सिंह (Leo) : सिंह राशीच्या व्यक्ती प्रेमळ, दयाळू आणि सहानुभूती असलेल्या व्यक्ती असतात. जोडीदाराबरोबरच्या उत्तम दिवसांमध्ये ते जोडीदारांकडे सातत्याने सकारात्मक ऊर्जा उत्प्रेरित करत असतात. आपल्यावरचा स्पॉटलाइट धोक्यात आहे असं त्यांना वाटलं, तर मात्र सिंह राशीच्या व्यक्तींच्या आचरणात नाट्यमय बदल होतात. सिंह राशीच्या व्यक्तींना इगो असतो. त्यांना कमी महत्त्व दिलं जातंय, असं त्यांना वाटलं, तर सिंह राशीच्या व्यक्ती ज्वेलस, पझेसिव्ह आणि डॉमिनेटिंगही होऊ शकतात. नातं हे परस्परांवर अवलंबून असतं. सिंह राशीच्या व्यक्तींनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की त्यांच्या जोडीदारांनाही चमकण्याचा, आपलं कौतुक करून घेण्याचा अधिकार आहे. जोडीदाराला समान संधी देण्याबद्दल सिंह राशीच्या व्यक्ती जागरूक नसल्या, तर जोडीदार आणि नातं उद्ध्वस्त होऊ शकतं. कन्या (Virgo) : कन्या राशीच्या व्यक्ती कुशाग्र बुद्धिमत्तेच्या असतात. त्यांची निरीक्षणशक्ती अफाट असते. सुसूत्र आणि तार्किक यंत्रणा तयार करणं या व्यक्तींना आवडतं. (या व्यक्ती उत्तम संपादक होऊ शकतात. कारण अगदी छोट्याश्या चुकाही त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत.) या राशीच्या व्यक्तिमत्त्वांचे गुणधर्म चांगले असले, तरी त्यांमुळे नातेसंबंधांत अडचणी निर्माण होऊ शकतात. सर्वांत आनंदी नात्यांमध्येही भांडणं होतातच. त्यामुळे वेळोवेळी असं काही घडू शकतं याची मनाशी खूणगाठ बांधायला हवी. कन्या राशीच्या व्यक्तींना हे सत्य स्वीकारणं खूप अवघड जातं. सगळं काही सुरळीत, विनाअडथळा असावं, असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे गोष्टी तशा होत नाहीत, तेव्हा कन्या राशीच्या व्यक्ती ते नीट होण्यावरच अडून बसतात. आपल्या नातेसंबंधांचं कायम विश्लेषण करत राहणं लाभदायक नसतं. कारण भिंगही योग्य कोनात धरलं नाही, तर गोष्टी मोठ्या करून दाखवण्यापेक्षा मोठी जखम करू शकतं. तूळ (Libra) : सर्वांत आनंदी नात्यांमध्येही भांडणं होतातच. त्यामुळे वेळोवेळी असं काही घडू शकतं याची मनाशी खूणगाठ बांधायला हवी. तूळ राशीच्या व्यक्तींना हे सत्य स्वीकारणं खूप अवघड जातं. सगळं काही सुरळीत, विनाअडथळा असावं, असं त्यांना वाटत असतं. त्यामुळे गोष्टी तशा होत नाहीत, तेव्हा तूळ राशीच्या व्यक्ती ते नीट होण्यावरच अडून बसतात. आपल्या नातेसंबंधांचं कायम विश्लेषण करत राहणं लाभदायक नसतं. कारण भिंगही योग्य कोनात धरलं नाही, तर गोष्टी मोठ्या करून दाखवण्यापेक्षा मोठी जखम करू शकतं.

गुरूच्या वक्रदृष्टीचे परिणाम; सिंह, कन्या, तूळ आणि वृश्चिकेला होणार त्रास

 वृश्चिक (Scorpio) : जलतत्त्वाचं आणि काळोख्या जागेत राहण्याची सवय असलेल्या प्राण्याचं चिन्ह असलेली ही रास आहे. भावना गोपनीय ठेवणं वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आवडतं. त्यामुळे कोणालाही आपल्या हृदयात प्रवेश करू देणं हे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी सोपं नसतं. जेव्हा वृश्चिक व्यक्तीचं मनापासून एखाद्याशी नातं तयार होतं, तेव्हा त्यांचा प्रेमिक कदाचित आयुष्यभरासाठी अडकलेला असतो. प्लूटो हा या राशीचा स्वामी आहे. रोमन साम्राज्याच्या 'अंडरवर्ल्ड'च्या राजावरून या गूढ ग्रहाला प्लूटो हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे सत्ता आणि नियंत्रण आपल्या हातात राखण्यावर वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा भर असतो.
नातेसंबंधांबद्दल आपला जोडीदार आपल्याइतकाच गुंतलेला नसेल, तर ते नर्व्हस आणि पझेसिव्ह होऊ शकतात. आपल्या जोडीदाराची निष्ठा तपासण्यासाठी ते मतभेदांना प्रोत्साहन देऊ शकतात; पण ही बाब अनेकदा उलटते. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की प्रत्येक माणसाला त्याचं स्वतंत्र अस्तित्व आणि भावनिक स्वातंत्र्य प्रिय असतं. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी काळजी घेतली नाही, तर त्यांच्या कडक पकडीमुळे प्रेमाचा शेवट होऊ शकतो. धनू (Sagittarius) : धनू राशीच्या व्यक्तिमत्त्वांच्या ऊर्जेत वणव्याचा गुणधर्म असतो. धनुर्धराचं चिन्ह असलेल्या या राशीची माणसं आपलं जिज्ञासू हृदय प्रवास, तत्त्वज्ञान, थ्रिल शोधण्याचा गुणधर्म आदी गोष्टींनी व्यापून टाकतात. स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असण्याचा गुणधर्म यांच्यात प्रकर्षाने असतो; पण जेव्हा धनू राशीच्या दोन व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा काहीच बदलत नाही. भटकायला जाताना, धाडसी कृती करायला जाताना धनू राशीच्या व्यक्तींना त्यांच्या जोडीदारानेही त्यात कुतुहलाने सहभागी व्हावं असं वाटत असतं. अॅमेझॉन नदीतून जोडीदाराबरोबर प्रवास करणं हे चांगलं आहे; पण आपल्यापैकी अनेकांना अशा वेळी कायमच इंडियाना जोन्ससारखं जगायला आवडणार नाही. कमिटेड रिलेशनशिप्समध्येही दैनंदिन आयुष्यातल्या सत्य परिस्थितीला दोघांनी मिळून तोंड देणं अपेक्षित असतं. धनू राशीच्या व्यक्तिमत्त्वांना कायम कमिटमेंटपेक्षा एक्साइटमेंटला जास्त महत्त्व द्यायचं असेल, तर त्यांच्या धाडसांच्या कृती 'सोलो' (अर्थात एकट्याने केलेल्या) ठरतात. मकर (Capricorn) : वेळ आणि कर्म या दोन्हींवर सत्ता गाजवणारा शनी हा या राशीचा स्वामी आहे. आपल्या उद्दिष्टांना साह्य करणारे दीर्घकालीन नातेसंबंध विकसित करण्यात या राशीच्या व्यक्तींना रस असतो. या राशीच्या व्यक्ती फोकस्ड असतात. या राशीच्या व्यक्तिमत्त्वांना काही वेळा वर्कोहोलिक असंही संबोधलं जातं. जेव्हा ते कोणाशी रिलेशनशिपमध्ये असतात, तेव्हा त्यांच्या जोडीदारानेही तसंच असावं, अशी त्यांची इच्छा असते. 'पॉवर कपल' बनणं हे कदाचित मनोरंजक वाटेल; पण जेव्हा एखादा जोडीदार दुसऱ्यालाही आपल्याबरोबर ओढतो, तेव्हा त्यातून राग आणि असंतोष तयार होऊ शकतो. मकर राशीच्या व्यक्तिमत्त्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की प्रत्येक जण आपापल्या वेगाने पुढे जात असतो आणि प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी असते. मकर राशीच्या व्यक्ती आपल्या जोडीदाराला सहायक समजू लागतात, तेव्हा त्यांचे नातेसंबंध बिघडतात. कुंभ (Aqarius) : वैयक्तिक नातेसंबंधांपेक्षा कुंभ राशीच्या व्यक्तिमत्त्वांना अनेकदा सामाजिक गोष्टींची काळजी जास्त असते. समानता, प्रामाणिकपणा, पारदर्शकता आदींवर विश्वास ठेवणारी ती मानवतावादी व्यक्तिमत्त्वं असतात. याचा तोटा असा, की कुंभ राशीच्या अनेक व्यक्ती वैयक्तिक नात्यांकडे दुर्लक्ष करून जग उत्तम कसं होईल, यावर लक्ष केंद्रित करतात. आपल्या जोडीदाराला काय हवंय, त्याच्या गरजा काय आहेत, यातून जगाचं कदाचित भलं होणार नाही; पण नात्याच्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचं आहे. त्यांनी आपल्या प्रेयसी/प्रियकराला आदराने वागवलं पाहिजे, त्यांच्याप्रति असलेली काळजी वर्तनातून दिसली पाहिजे. एखादा असंतुष्ट जोडीदार नात्यातून बाहेर पडला, तर कुंभ राशीच्या व्यक्तींना आश्चर्याचा धक्का बसतो. मीन (Pisces) : या राशीच्या व्यक्तींची रोमँटिक कलात्मकता आणि अतिप्रचंड संवेदनशीलता सर्वज्ञात आहे. मीन राशीच्या व्यक्तीशी कॅज्युअल डेटिंग करणं म्हणजे दुसऱ्या जगात प्रवेश करण्यासारखं, गूढ, थ्रिलिंग असतं; पण कमिटेड रिलेशनशिपमध्ये या लाटांवरून प्रवास करणं अवघड असतं. मीन राशीची व्यक्तिमत्त्व त्यांच्या स्वतःच्याच जगात रममाण असतात. त्यामुळे या राशीची व्यक्तिमत्त्वं काहीशी अविश्वासार्ह असू शकतात. त्याच वेळी त्यांच्या वर्तनाबद्दल मीन राशीच्या व्यक्तिमत्त्वांशी वाद घालणं प्रॅक्टिकली अशक्य असतं. कारण त्यांच्याकडे भावनिक अस्त्रांचा अभाव असतो. त्यांची पहिली भावना पळ काढण्याची असते. मीन राशीच्या व्यक्तिमत्त्वांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की त्यांच्या जोडीदाराची रिअॅलिटीबद्दल असलेली पर्सेप्शन्स (मतं, कल) हीदेखील स्वतःच्या मतांइतकीच चिंतनास पात्र असतात. त्याचा धिक्कार करायचा नसतो. मीन राशीच्या व्यक्तिमत्त्वांनी आणि त्यांच्या जोडीदारांनी नात्यात दुरावा न येण्यासाठी परस्परसंवाद ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे लक्षात घ्यावं.
Published by:Kiran Pharate
First published: