Home /News /astrology /

Numerology : तुमची जन्मतारीख ही असेल तर आज वीकेंड असला तरी प्रवास टाळा

Numerology : तुमची जन्मतारीख ही असेल तर आज वीकेंड असला तरी प्रवास टाळा

Numerology 30 April 2022 : अंकशास्त्रात (Ank shastra) तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात (Ank shastra) तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 30 एप्रिल 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या (Ank jyotish). #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची ताकद तुमच्या ज्ञानात आहे आणि ती तुमच्या व्यक्तिमत्त्वात दिसते. कोणत्याही शंकेशिवाय ती ताकद वापरा आणि विजयी व्हा. आजचा दिवस खूप हेक्टिक असूनही तुमचं आज कौतुक होईल, दखल घेतली जाईल. कामाच्या ठिकाणच्या व्यक्ती, तसंच नात्यातल्या व्यक्तींनाही तुमच्याबद्दल खूप आदर आहे. आजचा दिवस तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा राजकीय पैलू दाखवण्याचा आहे. संगीत मैफलींना जाणं, इव्हेंट्स आयोजित करणं, इंटरव्ह्यूसाठी अर्ज करणं आदींसाठी दिवस उत्तम आहे. प्रॉपर्टी विकत घेणं आणि मालमत्तेची विक्री करणं, या दोन्हींमध्ये तडजोडी कराव्या लागतील. त्यामुळे या दोन्ही गोष्टी टाळाव्यात. तुमच्या चॉइसचा खरा पार्टनर मिळण्याची आज शक्यता आहे. शाळा, रेस्तराँ, कौन्सेलिंग, पुस्तकं, डिजिटल मार्केटिंग, धातू, क्रिएटिव्ह क्लासेस, क्रीडा प्रशिक्षण आदी व्यवसायांत उत्तम नफा कमावता येईल. मुलांना प्रचंड अभ्यास असेल. शुभ रंग : Orange & Blue शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3 दान : महिलेला नारिंगी रंगाचं कापड दान करावं. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही जबाबदार व्यक्ती आहात; मात्र अधिक जबाबदाऱ्यांमुळे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी येऊ शकतात. तुम्हाला बऱ्याच लायाबिलिटीज घेऊन चालल्यासारखं वाटत असेल. त्यामुळे आणखी गुंतवणूक करू नये. लीगल कमिटमेंट्स कोणत्याही तडजोडीशिवाय पूर्ण होतील. प्रेमाच्या नात्यात प्रिय व्यक्ती तुम्हाला डॉमिनेट करत असल्यासारखं आणि नियंत्रित करत असल्यासारखं वाटेल. महिलांनी आज वरिष्ठांकडून झालेल्या टीकेकडे दुर्लक्ष करावं. आजचा दिवस पैशांचा वापर करण्याचा आणि जबाबदाऱ्या वाटून देण्याचा आहे. एक्स्पोर्ट-इम्पोर्ट बिझनेस आणि राजकीय व्यक्ती नवी उंची गाठतील. विद्यार्थी, मॅन्युफॅक्चरर्स, रिटेलर्स, ब्रोकर्स, क्रीडापटू आदींना कामगिरीला उच्च रेटिंग मिळण्याकरिता दिवसभर वाट पाहावी लागेल. शुभ रंग : Aqua शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : अनाथाश्रमात दूध दान करावं. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमच्या कल्पनाशक्तीला आज बहर येईल. त्यामुळे लेखक आणि संगीतकारांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नव्या संधीच्या रूपाने नवी सुरुवात होण्याची शक्यता आहे. ही संधी तुम्हाला कामाच्या ठिकाणीच दिली जाण्याची शक्यता आहे. तुमच्या कृती आणि भाषणामुळे लोक प्रभावित होतील. आज घेतलेले सर्व निर्णय नजीकच्या भविष्यकाळात तुम्हाला अनुकूल ठरतील; मात्र आपले अर्थविषयक प्लॅन्स अन्य कोणाशी शेअर करू नका. स्टॉक्स आणि अन्य तत्सम प्रकारच्या गुंतवणुकीतून आज परतावा मंद अपेक्षित आहे. प्रेमात असलेल्यांना भाग्यवान असल्यासारखं वाटेल. त्यांनी आपल्या भावना गिफ्ट्सच्या देवाणघेवाणीतून व्यक्त कराव्यात. दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या गुरूचं नाव घ्यायला विसरू नका. शुभ रंग : Orange शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 1 दान : महिला मदतनीसाला केशर दान करावं. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) संपूर्ण समर्पण भावनेने कष्ट केल्यासच तुम्ही खूप पैसे मिळवू शकता. राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रात असलेल्यांना प्रवासासाठी चांगला दिवस आहे. बांधकाम व्यवसाय आणि वैद्यकीय क्षेत्रात वेगाने हालचाली होतील; मात्र स्टॉक्सच्या गुंतवणुकीमध्ये हळूहळू सकारात्मक बदल दिसतील. विद्यार्थ्यांनी ताण दूर करण्यासाठी ध्यानधारणा करावी. मार्केटिंग क्षेत्रामधल्या व्यक्तींनी हे लक्षात ठेवावं, की तुम्ही जेवढं जास्त फिराल, तेवढं तुमच्या उद्दिष्टपूर्तीचं आणि यशाचं प्रमाण जास्त असेल. आज मद्यपान आणि मांसाहार टाळा. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 9 दान : भिकाऱ्यांना हिरवे किंवा लाल कपडे दान करावेत. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचा जोडीदार किंवा जवळच्या मित्राशी मनातल्या भावना शेअर करण्याचा दिवस. कामाच्या ठिकाणी फायदा होण्याच्या दृष्टीने तुम्ही पुरेसे शहाणे आहात. कर्जासारख्या गोष्टींच्या सापळ्यात अडकू नका. दिवसाच्या उत्तरार्धात नशीब त्याची खेळी खेळेल. त्यामुळे तोपर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. सेल्स आणि स्पोर्ट्स या क्षेत्रांत असलेल्यांना वेगवान हालचाली अनुकूल ठरतील. विद्यार्थ्यांना आज शैक्षणिक यशाची चव चाखता येईल. प्रेमात असलेल्या व्यक्तींचं लक्ष विचलित होण्यासारख्या अनेक घटना घडतील; मात्र प्रामाणिक राहणं गरजेचं आहे. शुभ रंग : Sea Green शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : हिरवी फळं, भाजीपाला दान करावा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज अनेक शंका दूर होण्याची शक्यता आहे. जोडीदार आणि मुलं यांच्यासोबत वेळ व्यतीत करण्यासाठी उत्तम दिवस. विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांनी शहाणपणाने नवी संधी स्वीकारावी. ती अनुकूल ठरेल. वैयक्तिक नातेसंबंधांत तुम्हाला असुरक्षितता आणि अस्वस्थ वाटेल. नवी फॅक्टरी उभारण्यासाठी ज्या व्यक्ती नव्या प्रॉपर्टीच्या शोधात आहेत, त्यांना चांगला पर्याय उपलब्ध होईल. प्रेझेंटेशन देण्यासाठी किंवा खेळाची मॅच खेळण्यासाठी बाहेर पडा. कारण तुम्ही भूतकाळातून बाहेर पडणं गरजेचं आहे. शुभ रंग : Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : आश्रमांना पांढरी मिठाई दान करावी. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) पब्लिक फिगर्स, राजकीय नेते, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर इंजिनीअर्स, बिल्डर्स, ज्योतिषी, मेकअप आर्टिस्ट्स, खेळाडू यांच्यासाठी आज चांगला दिवस. ते एखाद्या हिरोप्रमाणे जिंकतील. कायद्याच्या प्रकरणांमध्येही यश मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत वाद टाळा. कारण ब्रेकअपसारखी स्थिती उद्भवू शकते. वादांशिवाय रिलेशनशिप पुनरुज्जीवित होऊ शकते. शहाणपण जागृत राखा. त्यासाठी गुरूमंत्र वाचा, पठण करा. खेळाडूंना पुरस्कार मिळतील, त्यांची दखल घेतली जाईल. राजकीय नेते आणि अभिनेत्यांना सार्वजनिक सभांना उपस्थित राहण्यासाठी आणि पक्षश्रेष्ठींना प्रभावित करण्यासाठी चांगला दिवस. पैसे कर्जाऊ देणाऱ्या व्यक्ती, बँकर्स आदींना आज सावध राहावं. शुभ रंग : Teal शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : तांबं किंवा पितळ धातूचा तुकडा कोणत्याही स्वरूपात दान करावा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुम्ही कामं वेळेवर पूर्ण करू शकाल. त्यामुळे आर्थिक फायदा मोठा असेल. ज्या देवाने पैसा, प्रसिद्धी, शहाणपण, आदर, कुटुंबात आदर आदी गोष्टी मिळवून दिल्या, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवळात जरूर जावं. टार्गेट पूर्ण करण्यासाठी कामात व्यग्र राहावं लागेल; मात्र हा प्रवास सुखसोयींसह असेल. आयुष्य खूप गुंतागुंतीचं आणि बिझी असल्याचं जाणवेल; मात्र ही तात्पुरती स्थिती आहे. डॉक्टर्स, फायनान्सर्स आदींचं कौतुक होईल. रोमँटिक भावना सत्यात उतरवण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. शुभ रंग : Sea Blue शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : भिकाऱ्याला कलिंगड दान करावं. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) सेल्स आणि मार्केटिंग या क्षेत्रात असलेल्या व्यक्तींचं कौतुक होईल, प्रसिद्धी मिळेल. टेंडर्स आणि प्रॉपर्टीसाठी मध्यस्थांना गाठण्याकरिता उत्तम दिवस. खेळाडू, व्यावसायिक, शिक्षक, बँकर्स, संगीतकार, अभिनेते आणि विद्यार्थ्यांनी डॉक्युमेटेंशनमध्ये पुढाकार घ्यायला हवा. स्टॉक मार्केटमध्ये असलात, तर मोठ्या प्रमाणात स्टॉक्स घेण्याची शिफारस केली जात आहे. रेड अँड पर्पल अशा कॉम्बिनेशनचे कपडे घालणं नशीब आणि स्थिरता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरेल. आज डोळ्यांची काळजी घ्या. आज प्रवास टाळा आणि ऑनलाइन काम करण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 3 दान : घरगुती मदतनीसाला लाल मसूर दान करावेत. 30 एप्रिल रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : दादासाहेब फाळके, रोहित शर्मा, रजत शर्मा
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Numerology, Rashibhavishya

पुढील बातम्या