ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 9 साठी कसं असेल, जाणून घ्या.
#नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
#नंबर 9 हा मंगळाचं प्रतिनिधित्व करतो.
9 जन्मांकाच्या व्यक्ती अतिशय प्रतिभावान, मोहक, ज्ञानी, शिकण्याची वृत्ती असलेल्या, सर्जनशील आणि नवीन्यपूर्ण विचार करणाऱ्या असतात. या व्यक्ती उत्कृष्ट प्रशिक्षक आणि शिक्षक असतात. इतरांकडून काम कसं करून घ्यायचं हे कौशल्यदेखील त्यांच्याकडे असतं. ते क्रिएटिव्ह आर्ट्स, सायन्स, लॉ, फायनान्स, शिक्षण आणि विश्लेषण क्षेत्रांमध्ये चांगली कामगिरी करतात. ज्या व्यक्तींच्या संपूर्ण जन्मतारखेमध्ये दोनदा 9 असतं, त्या अधिक नशिबवान असतात.
या व्यक्तींकडे सभोवतालच्या लोकांचं निरीक्षण करण्याची फार चांगली क्षमता असते. पण, त्या आपल्या गोष्टी इतरांशी शेअर करण्यात कमी पडतात. त्यांना आपली सिक्रेट्स स्वतःकडेच ठेवायला आवडतात. त्यांची सोशल स्किल्स कमी आहेत आणि मोठ्या समूहापेक्षा त्या लहान गटात राहण्याला प्राधान्य देतात.
9 अंकाचा प्रभाव असलेल्या व्यक्तींसाठी 2023 हे सर्वोत्कृष्ट वर्ष असेल. अभिनय, ज्योतिष, वास्तु, उपचार, संशोधन, औषध किंवा शस्त्रक्रिया या क्षेत्रांमध्ये काम करणारा प्रत्येकजण यशस्वी होऊ शकेल. आपण आपल्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपल्या योजनांचं पालन केलं पाहिजे. परदेशात प्रवास करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना अचानक तशी संधी मिळेल. 2023 या वर्षात प्रसिद्धी आणि पैशांचा आनंद घेता येईल.
2023करिता #नंबर 9चं विश्लेषण
#नंबर 9 - करिअर आणि पैशांच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज
तुम्ही एक चांगली आर्थिक योजना बनवली पाहिजे. कारण, या वर्षी तुम्हाला भरपूर पैसे वाचवता येतील आणि बचत वाढेल. तुम्हाला वर्षभर खूप चांगले परिणाम मिळतील. जर तुम्ही तुमचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. विशेषत: ज्यांना शिक्षण आणि आयात-निर्यात व्यवसायामध्ये रस आहे त्यांना चांगलं यश मिळेल. 9 जन्मांक असल्यानं, तुमच्याकडे ज्ञानाचा खजिना आहे. तुम्ही नेहमी जास्तीत-जास्त जाणून घेण्यासाठी उत्सुक असता. व्यवसायातील लोकांना यश मिळेल आणि नोकरी करणाऱ्यांवर नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. बोलताना सौम्यपणा राखला पाहिजे. प्रगती आणि कौतुक टिकवून ठेवण्यासाठी ऑफिसमध्ये अनावश्यक नाटकं टाळा.
9 जन्मांकाच्या व्यक्तींनी 2023 मध्ये आपल्या नोकरीवर टिकून राहिलं पाहिजे. कारण त्यांना त्यातून ओळख मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी, मार्च, जुलै आणि नोव्हेंबर महिन्यांमध्ये मोठे निर्णय घेतले पाहिजेत. हे महिने सर्व क्षेत्रांमध्ये अनुकूल परिणाम देतील.
#नंबर 9 - प्रेम, रिलेशनशीप आणि लग्नाच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज
2023 हे वर्ष तुमच्या जोडीदाराकडून प्रेम आणि आदर मिळवण्याचं वर्ष आहे. त्यामुळे तक्रार करणं थांबवा आणि त्यांच्या मनात असलेल्या तुमच्याबद्दलच्या भावना ओळखा. कोणतेही गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही एकत्र वेळ घालवला पाहिजे. प्रेमात असलेल्यांनी स्वतःची आणि त्यांच्या जोडीदाराची चांगली काळजी घेतली पाहिजे. सर्व परिस्थिती काळजीपूर्वक हाताळली पाहिजे. नातेसंबंध तयार होण्यास वेळ लागतो त्यामुळे ते काळजीपूर्वक हाताळले पाहिजेत.
विवाहित लोक कौटुंबिक भेटी, नवीन घर, आलिशान कार, कौटुंबिक कार्यक्रम, विश्रांतीसाठी प्रवास आणि पार्ट्यांचे प्लॅन करू शकतात. एकंदरीत, 2023मध्ये सर्वकाही काळजीपूर्वक हाताळलं गेल्यास अजिबात निराशा मिळणार नाही आणि सर्व गोष्टी ठीक होतील. समाजात ओळख मिळवण्यासाठी तुम्ही इतरांशी अधिक संवाद साधला पाहिजे.
तुमचं सामाजिक जीवन तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आध्यात्मिक गोष्टींसाठी तुम्ही खूप उत्साह दाखवाल. 2023 हे वर्ष तुमच्यासाठी एक मजबूत वर्ष आहे. त्यामुळे तुम्ही अध्यात्म टिकवून ठेवल्यास सर्वकाही उत्तमप्रकारे पार पडेल. तुम्हाला सर्व ठिकाणी अनुकूल परिणाम मिळतील. 2023 या वर्षाचा सर्वोत्तम वापर करून जास्तीत जास्त प्रतिभा प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करा.
#नंबर 9 - 2023 या वर्षासाठी उपाय :
1. महिलांनी कुंकू लावावं आणि पुरुषांनी उजव्या मनगटात लाल दोरा बांधावा.
2. हनुमानाची पूजा करा आणि दिवसभर हनुमान चालिसाचं पठण करावं.
3. गरजूंना लाल फळं दान करावीत.
4. सकाळी गुरुमंत्राचा जप करावा.
5. घरात दक्षिणेकडील भिंतीवर लाल बल्ब लावा.
6. मांसाहार, मद्य, तंबाखू आणि लेदरचा वापर टाळा.
शुभ रंग - लाल
शुभ अंक - 9
शुभ दिशा - दक्षिण आणि पूर्व
शुभ दिवस - मंगळवार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Numerology