मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

बुधाचा प्रभाव करतो अस्थिर; तरीही सभ्यपणा आणि जीभेवर साखर म्हटलं तर कन्या!

बुधाचा प्रभाव करतो अस्थिर; तरीही सभ्यपणा आणि जीभेवर साखर म्हटलं तर कन्या!

कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव

कन्या राशीच्या लोकांचा स्वभाव

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह मानला जातो. नऊ ग्रहांमध्ये बुधाला राजकुमाराची पदवी दिली गेली आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे कन्या राशीचे लोक स्वभावाने अस्थिर असतात.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Ramesh Patil

मुंबई, 23 नोव्हेंबर : ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जीवनात राशींची महत्त्वाची भूमिका असते. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीची एक राशी असतेच. जन्माच्या वेळी जन्मपत्रिकेत चंद्र ज्या राशी चिन्हात आहे. त्याला व्यक्तीची राशी म्हणतात. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या राशीशी संबंधित असतो. काही राशींमध्ये आत्मविश्वास जास्त असतो तर काहींमध्ये प्रामाणिकपणा. काही राशीचे लोक हट्टी असतात तर काही निश्चयी तर काही कठोर असतात, सर्व राशी वेगवेगळ्या घटकांशी संबंधित असतात. त्यामुळे राशीनुसार लोकांचा स्वभाव देखील वेगवेगळा असतो. आज कन्या राशीचे लोक कसे असतात, याविषयी भोपाळचे ज्योतिषी पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया.

- कन्या राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह मानला जातो. नऊ ग्रहांमध्ये बुधाला राजकुमाराची पदवी दिली गेली आहे. बुध ग्रहाच्या प्रभावामुळे कन्या राशीचे लोक स्वभावाने अस्थिर असतात. कन्या राशीचे लोक बहुतेक दुबळे असतात. या व्यतिरिक्त कन्या राशीमध्ये जन्मलेले लोक त्यांच्या मनातील गोष्टी दाबून ठेवतात आणि ते रहस्यमय स्वभावाचे असतात.

हे वाचा - उत्साही, हजरजबाबी तर असतातच! मिथुन राशीच्या लोकांचे हे गुण गर्दीतही वेगळे दिसतात

या राशीच्या लोकांनी काही काम करण्याचा निश्चय केला असेल तर ते पूर्ण करतात. कन्या राशीच्या लोकांना शिस्त आवडते. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात यश मिळते. कन्या राशीचे लोक स्वभावाने अतिशय सभ्य आणि गोड बोलणारे असतात.

हे वाचा - प्रामाणिकपणा म्हटलं की वृषभ राशीचे लोक; त्यांचे हे गुण चारचौघात वेगळी छाप सोडतात

वैवाहिक जीवन आणि व्यवसाय

बुध ग्रहाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांचे जीवन अस्थिरतेने भरलेले असते. या राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन सामान्य असते. याशिवाय या राशीचे लोक पत्रकार, वकील, शिक्षक, प्राध्यापक, लेखापाल, डॉक्टर, सावकार यांसारख्या वाक्-आधारित व्यवसायांशी संबंधित गोष्टींमध्ये काम करत असतात.

First published:

Tags: Rashibhavishya, Rashichark