मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology: जन्मतारखेनुसार 20 जूनचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology: जन्मतारखेनुसार 20 जूनचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

 अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

मुंबई, 20 जून : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 20 जून 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) 1, 2 आणि 5 या अंकांचा सुरेख संगम आज पहायला मिळेल. यामुळे भाग्य, स्थैर्य, ज्ञान, कौशल्य अशा गोष्टींमध्ये वाढ दिसते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वा मुलाखतींसाठी उत्तम दिवस, मात्र कोणतीही योजना अंमलात आणताना इतरांची मदत अवश्य घ्या. कामाच्या ठिकाणी टार्गेट पूर्ण केल्यामुळे तुमचं भरपूर कौतुक होईल. नेतृत्व करण्याची संधी मिळाल्यास सोडू नका. तुमच्या कौतुकामुळे आणि यशामुळे काही लोकांना तुमचा मत्सर वाटेल. हे टाळण्यासाठी संध्याकाळी चंद्र देवाला दूध-पाणी अर्पण करा. वैयक्तिक आयुष्यात डिप्लोमॅटिक राहिल्यास दुखावले जाणार नाही. शुभ रंग : फिकट पांढरा आणि क्रीम (Off white and Crème) शुभ दिवस : रविवार शुभ अंक : 2 दान : कृपया आज गरिबांना सूर्यफुलाचं तेल दान करा. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज सकाळी दुधाच्या पाण्याने अंघोळ करून दिवसाची सुरूवात करा. आपल्या जोडीदारासोबत संवाद सुरू ठेवा अन्यथा वादाला तोंड फुटू शकतं. तसंच, आपल्या पार्टनरवर हक्क गाजवण्याचा प्रयत्न करू नका, यामुळे भविष्यात दुरावा वाढू शकतो. एखादं नवं कॉन्ट्रॅक्ट, अ‍ॅग्रीमेंट, टेंडर किंवा पार्टनरशिप सुरू करण्यासाठी उत्तम दिवस. वर्गात शिक्षकांसोबत, आणि मैदानावर प्रशिक्षकांसोबत वेळ व्यतीत केल्यास उत्तम. आज पांढरे कपडे घालणं भाग्याचं ठरेल. चंद्रदेवासाठी विशेष पूजा केल्यास उत्तम. मेडिकल उत्पादनं, हिरे, रबर, क्रीडा उत्पादनं, लिक्विड, साहित्य, स्टेशनरी आणि शाळा यांसंबंधी व्यवसायांत असणाऱ्या व्यक्तींना यश आणि आर्थिक फायदा संभवतो. शुभ रंग : पांढरा (White) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : कृपया भिक्षेकऱ्यांना किंवा वासरांना दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमचं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे मोठं यश आणि भरपूर प्रसिद्धी मिळेल. आज आजूबाजूच्या वातावरणातून शिकण्याचा दिवस आहे. लेखी संवादाच्या माध्यमातून स्वतःला व्यक्त कराल. भूतकाळातील वाद विसरून तुमच्या मनात काय आहे हे बोलून दाखवण्याचा आजचा दिवस आहे. मित्रमंडळींवर छाप पाडाल. शिक्षण, गायन, अकाउंटिंग, डान्सिंग, कुकिंग, डिझायनिंग, अभिनय किंवा ऑडिटिंग या क्षेत्रांमधील व्यक्तींना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. इनडोअर गेम्स खेळणारे खेळाडू, फायनान्स क्षेत्रातील आणि सरकारी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भाग्याचा दिवस. शुभ रंग : पीच (Peach) शुभ दिवस : गुरूवार शुभ अंक : 3 आणि 9 दान : कृपया मंदिरांमध्ये चंदन दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज दुपारपर्यंत दिवस अगदी निरर्थक वाटेल, मात्र दुपारच्या जेवणानंतर तुमचं भाग्य उजळण्यास सुरुवात होईल. क्लायंटसमोर केलेल्या प्रेझेंटेशनचं कौतुक होईल. आजचा बराचसा वेळ काउन्सिलिंग आणि मार्केटिंगमध्ये व्यतीत कराल. मशीन, बांधकाम, काउन्सिलिंग, अभिनय किंवा मीडिया क्षेत्रातील व्यक्तींनी लेखी संवादाबाबत खबरदारी घ्यावी. वैयक्तिक नातेसंबंध सुरळीत राहतील. आज लिंबूवर्गीय पदार्थ आणि केशरयुक्त मिठाई खाणं गरजेचं आहे. काही काळ निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत करा. शुभ रंग : आकाशी निळा (Sky Blue) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया गरिबांना हिरवे धान्य दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आर्थिक वाढीसाठी आणि नातेसंबंध वृद्धिंगत करण्यासाठी उत्तम दिवस. तुमच्या धाडसी स्वभावामुळे तुम्ही कित्येक वेळा रिस्क घेता, जी तुमच्या नशीबामुळे फायद्याची ठरते. आज केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. तसेच प्रॉपर्टीसंबंधी निर्णयही योग्य ठरतील. महत्त्वाच्या मीटिंग किंवा मुलाखतीला जाताना अ‍ॅक्वा किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घातल्यास उत्तम. प्रवास आवडत असल्यास आज छोटेखानी सहलीचा बेत करा. मात्र खाण्या-पिण्याच्या बाबतीत खबरदारी घेणं गरजेचं. कामाच्या ठिकाणी आपल्या सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचं आहे. त्यांची भविष्यात भरपूर मदत होऊ शकते. शुभ रंग : अ‍ॅक्वा (Aqua) शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : कृपया अनाथांना हिरव्या भाज्या दान करा. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची मॅग्नेटिक पर्सनॅलिटी इतरांवर छाप पाडण्यासाठी फायद्याची आहे. त्यामुळे आज मोठ्या पदासाठी मुलाखत द्या. आजचा दिवस अगदी ऐशोआरामाचा, नव्या संधी शोधण्याचा आणि दिलेली वचनं पूर्ण करण्याचा आहे. तुमच्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी उत्तम दिवस. कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा लाभेल. अभिनेते, डॉक्टर, ट्रेनर, तसेच कापड, एक्सपोर्ट इम्पोर्ट, रिअल इस्टेट, आणि महागड्या वस्तूंसंबंधी व्यवसायातील व्यक्तींना मोठा फायदा होईल. गाडी, घर, मशीन किंवा दागिने खरेदीसाठी उत्तम दिवस. शेअर मार्केटमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल. संध्याकाळी एखादी रोमँटिक डेट तुमचा संपूर्ण दिवस गोड करेल. शुभ रंग : अ‍ॅक्वा (Aqua) शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरिबांना दही दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) तुमची बिझनेस सिस्टिम तपासून, त्यातील त्रुटी शोधण्याची गरज आहे. बिझनेस व्यवहारांमध्ये आज तर्कशुद्ध विचार करून निर्णय घ्या. तुमच्या जोडीदारासोबत वा क्लायंटसोबत आज कसलीही तडजोड करू नका. एक्सपोर्ट इम्पोर्ट, शेअर मार्केट, ट्रॅव्हल एजन्सी, मीडिया एजन्सी आणि अभिनय क्षेत्रांतील व्यक्तींसाठी भाग्याचा दिवस. विरुद्धलिंगी व्यक्तीने दिलेला सल्ला फायद्याचा ठरेल. अकाउंट्ससंबंधी गोष्टींसाठी एखाद्या सीएचा सल्ला घ्या. विवाहाचे प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करा. गणपती मंदिरात अभिषेक केल्यास कुंडलीतील नेपच्युन ग्रहाचं स्थान बळकट होईल. याचा करिअरमध्ये फायदा होईल. शुभ रंग : समुद्री हिरवा (Sea Green) शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7 दान : कृपया मंदिरात एखादं तांब्याचं वा पितळ्याचं नाणं दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) मेडिकल, राजकारण, बेटिंग, सेल्स किंवा शेअर मार्केट क्षेत्रांतील व्यक्तींसाठी आज अगदी वेगाने घडामोडी घडणारा दिवस आहे. आज यश मिळवण्यासाठी तर्कशुद्ध विचार आणि मृदू वाणी हे तत्त्व अवलंबणं फायद्याचं. कायदेशीर प्रकरणं ओळखीने किंवा पैशांचा वापर करून सुटतील. बिझनेस डील पार पाडण्यासाठी मात्र तुमचे संवाद कौशल्य आणि कुटुंबाची ओळख कामी येईल. विद्यार्थ्यांनी परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा प्रयत्न करावा. यासाठी भरपूर फी असली, तरी भविष्यात होणारा त्याचा फायदा आणि आपली स्वप्नं यांचाही विचार करावा. आजचा बराचसा वेळ योजना तयार करण्यात जाईल. पैसा आणि समाधान यांचं योग्य संतुलन कसं राखता येईल याचा विचार कराल. प्रवासाचे बेत फायद्याचे ठरतील. गायींसाठी चारा दान करणं आवश्यक आहे. शुभ रंग : समुद्री निळा (Sea Blue) शुभ दिवस : शनिवार शुभ अंक : 6 दान : कृपया गरजूंना चपला दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुमच्या जोडीदारासमोर किंवा जवळच्या मित्रांसमोर तुमची विश्वासार्हता सिद्ध करून दाखवावी लागेल. एकमेकांप्रति असलेला विश्वास हेच आज यश मिळवण्यासाठीचे गमक राहील. प्रेमात असलेल्यांनी आपल्या जोडीदाराला प्रपोज करण्यासाठी उत्तम दिवस. तसेच, आपल्या जोडीदारासोबत असलेले वाद मिटवण्यासाठी संवाद साधावा. बिझनेस रिलेशन्स, कॉन्ट्रॅक्ट, कागदपत्रांवर सही करणे, इव्हेंट होस्ट करणे किंवा एखादे ऑपरेशन या गोष्टी पुढे ढकलल्या जातील. राजकारण, लिक्विड्स, औषध, डिझायनिंग, मीडिया, फायनान्स किंवा शिक्षण या क्षेत्रांमधील व्यक्तींना भरपूर प्रसिद्धी आणि यश मिळेल. खेळाडूंच्या पालकांना आपल्या पाल्यांचा अभिमान वाटेल. शुभ रंग : केशरी (Orange) शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : कृपया घरातील कामगाराला लाल रुमाल दान करा. 20 जून रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : राहुल खन्ना, आरजे बालाजी, सुषमा सेठ, विक्रम सेठ, नीतू चंद्रा, गना बाला
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या