Home /News /astrology /

Yoga Day 2022 : आज योगा दिन; तुमचं राशिभविष्यही सांगतंय प्रकृतीकडे बिलकुल दुर्लक्ष नको

Yoga Day 2022 : आज योगा दिन; तुमचं राशिभविष्यही सांगतंय प्रकृतीकडे बिलकुल दुर्लक्ष नको

Yoga Day Horoscope : आज योगा दिन. सोबतच तुमचं राशिभविष्यही पाहा.

आज दिनांक 21 जून 2022. वार मंगळवार. आज आहे ज्येष्ठ कृष्ण अष्टमी. आज चंद्र उत्तराभाद्रपदा नक्षत्रात भ्रमण करेल. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य. मेष राशीच्या व्यय स्थानात चंद्रगुरू ही धार्मिक क्षेत्रात नवीन संधी आणेल. मित्रमैत्रिणीशी मतभेद होतील. धनस्थानात आलेला शुक्र शुभ घटनांची सुरुवात करेल. दिवस शुभ वृषभ दशम स्थानात आलेला वक्री शनी कार्यक्षेत्रात एखाद्या व्यक्तीमुळे मनस्ताप दाखवत आहे. एक प्रकारचा अडथळा प्रत्येक कामात येईल. प्रवास योग येतील. चंद्र गृहसौख्यात वाढ करेल. दिवस शुभ. मिथुन मिथुन लग्न आणि रास असलेल्या व्यक्तींनी दशम गुरू चंद्राचा उत्तम अनुभव घ्यावा. गुरू अनुकूल आहे. घरासाठी शुभ योग येतील. दिवस उत्तम. कर्क राशीच्या अष्टमात शनी आणि दशम राहू काळजी घ्या असं सुचवत आहे. प्रकृती सांभाळा. कामाची जबाबदारी वाढेल. भाग्य चंद्र आर्थिक, सामाजिक लाभ होतील. दिवस चांगला. सिंह आजचे चंद्र भ्रमण अष्टम स्थानात आहे. धार्मिक कार्यक्रमात जोडीने सहभाग घ्याल. काळ सावधगिरीने राहण्याचा आहे. घराकडे विशेष लक्ष द्या. मध्यम दिवस. कन्या राशीच्या सप्तम स्थानात येणारे चंद्र, गुरू भ्रमण आनंदी राहा असं सांगत आहे. प्रवास योग येतील. आर्थिक व्यय होईल. अष्टमात राहू आहे, स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी. दिवस मध्यम. तूळ गृह कलह, घरात मोठ्या दुरुस्त्या, खर्च असा हा काळ आहे. आर्थिक प्राप्ती होईल. जोडीदाराच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष नको. दिवस आनंदी राहिल. वृश्चिक संतती तुमच्यावर खुश होइल. त्यांना काही संधी येतील. प्रवासात त्रास, नुकसान संभवते. बोलण्यातून गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक लाभ होतील. दिवस मध्यम. धनु चतुर्थ चंद्र गुरू आज उत्तम फळ देईल. मात्र शनी आर्थिकदृष्ट्या सांभाळून राहावं असं सांगत आहे. कुटुंबात काही समस्या निर्माण होतील. सावध राहा. दिवस बरा. मकर सर्वार्थाने जपून राहण्याचा काळ आहे. मंगळ, चतुर्थ राहू कुठल्याही कामात अडथळे आणतील. भांडण तंटा होऊ नये म्हणून सावध रहा. घरामध्ये वेळ द्या. दिवस मध्यम. कुंभ राशीच्या धनस्थानात चंद्र म्हणजे कार्यक्षेत्रातील महत्त्वाच्या बाबी किंवा आर्थिक क्षेत्रात यश असे योग आणतील. तृतीय राहू महत्त्वाचे निरोप आणेल. दिवस उत्तम. मीन व्ययस्थानात शनी नुकसानीपासून सावध रहा असं सांगत आहे. संतान चिंता वाटेल. राशीतील गुरू चंद्र अचानक आर्थिक लाभ होतील. स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. दिवस चांगला. शुभम भवतू.!!
Published by:Priya Lad
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या