Home /News /astrology /

Daily Horoscope : Yoga सोबतच 'या' गोष्टीही करणं ठरेल फायद्याचं; पाहा 21 जूनचं तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope : Yoga सोबतच 'या' गोष्टीही करणं ठरेल फायद्याचं; पाहा 21 जूनचं तुमचं राशिभविष्य

Daily Horoscope 21 June 2022 : आज योगा करून दिवसाची सुरुवात कराच पण तुमचा संपूर्ण दिवस कसा जाणार तेसुद्धा पाहा.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 21 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) तुमच्या मूलभूत तत्त्वांना चिकटून राहणं फायद्याचं ठरेल. तुम्ही जी तत्त्वं पाळत आला आहात ती कायमच पाळण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. निर्णय घेणं काही काळासाठी पुढे ढकलावं. एखादी चांगली ऑफर मिळेल. LUCKY SIGN - A mirror image वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुम्ही काही तरी नवीन सुरू करण्याचा प्रयत्न करत असलात तर दिवस त्यासाठी चांगला आहे. नवं व्हेंचर, नवा प्रोजेक्ट किंवा नवी असाइनमेंट यांपैकी ते काहीही असू शकेल. तुम्ही स्वतःचं मूल्यमापन करता त्यापेक्षाही तुमची क्षमता खूप जास्त आहे. LUCKY SIGN - A silver candle मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) तुम्ही लपवलेल्या भावना आता अशा एखाद्या व्यक्तीला कळू शकतील जी तुम्हाला अंतर्बाह्य ओळखते. तुम्ही भावनिकदृष्ट्या दुसऱ्या कोणी तरी व्यक्तीवर खूपच जास्त अवलंबून आहात. त्याची गरज नाही. तुम्ही स्वतःला वेगळं करून स्वतंत्रपणे वाटचाल केली पाहिजे. LUCKY SIGN - A gemstone कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्ही कोणासोबत कोलॅबोरेशन करण्याचा विचार करत असाल तर आत्ताचा कालावधी योग्य आहे. तुमचा प्रत्येक प्लॅन किंवा प्रत्येक गोष्ट खूप जास्त जणांशी शेअर करू नये. विनाकारण जास्त ताण घेऊ नये. LUCKY SIGN - A yellow stone सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) तुम्ही ज्या व्यक्तीशी रिलेशनशिपमध्ये आहात ती व्यक्ती निघून जात असली तरी तुमची भावनांपासून लवकर सुटका होणार नाही. तुम्हाला एकमेकांबद्दल असलेलं प्रेम एकमेवाद्वितीय असं आहे. रोखीचे व्यवहार करताना अत्यंत काळजीपूर्वक करावेत कारण तुमच्यावर कोणी तरी बारकाईने लक्ष ठेवून आहे. LUCKY SIGN - A candle कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) गेला काही काळ तुमची ज्यांच्याशी भेट झालेली नाही अशा व्यक्तींकडून तुमचं चांगलं आगत-स्वागत होईल. ऐशोआरामाच्या गोष्टींमध्ये गुंतून पडावंसं वाटेल. तुमच्यापैकी काही जण सुट्टीसाठी परदेशी जाण्याचं नियोजन करतील. सध्यासाठी चालणं हा चांगला व्यायाम ठरेल. LUCKY SIGN - A buddha statue तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यपद्धतीला पूर्वी आक्षेप घेतलेल्या घेतलेल्या व्यक्ती आता त्याकडे नव्याने पाहतील. आर्थिक लाभ होतच राहतील. तुम्ही लवकरच एखाद्या नव्या प्रॉपर्टीसाठी करार कराल. LUCKY SIGN - An indoor plant वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्यातले नेतृत्वगुण आता वाढीला लागले आहेत. त्या नेतृत्वगुणांचं प्रदर्शन करण्यासाठी तुमचा गौरवही होईल. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बारीकसारीक आणि तपशीलाने विचार करता. तुम्ही त्या कौशल्याचा वापर करून घ्याल. कोणी तरी दुरूनच तुमचं कौतुक करील. LUCKY SIGN - A chamber धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) दिवस संमिश्र असेल. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता, ती व्यक्ती विश्वासू नाही. तुमच्याकडची माहिती तिच्याकडून दुसरीकडे जाते. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीवरचं अवलंबित्व कमी करू शकता. तुम्ही लवकरच एखाद्या रोड ट्रिपला जाण्याची शक्यता आहे. LUCKY SIGN - A climber मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) मर्यादित काळात तुम्ही तुमच्या मानसिक क्षमतेने आणि कार्यक्षमतेने चांगला प्रभाव तयार केला आहे. त्याचं कौतुक व्हायला हवं. तुम्ही नव्या बिझनेस आयडियाचा विचार करत असलात, तर ती कल्पना तुम्हाला अनुकूल ठरत असल्याचं लवकरच लक्षात येईल. LUCKY SIGN - A butterfly कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) तुम्हाला भूतकाळातल्या तुमच्या कृत्यांबद्दल सध्या अपराधी भावना वाटत आहे. तुमच्यासोबत त्यात सहभागी असलेली अन्य व्यक्तीही तुम्हाला त्याची सतत आठवण करून देत आहे. काळ तुम्हाला लवकरच आणखी एक संधी देईल, असे संकेत आहेत. LUCKY SIGN - Canvas मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) तुम्ही तुमचं प्रलंबित काम पूर्ण करण्यासाठी मोठे प्लॅन्स तयार करत असाल. त्यावर प्रयत्न करा आणि योग्य वेळेची वाट पाहा. कुटुंबीयांकडून किंवा जोडीदाराकडून मिळालेला सल्ला तुमच्यासाठी सध्या तरी योग्य वाटत नाही. LUCKY SIGN - Two feathers
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या