मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /तुमचं पॅशन किंवा मिळालेली संधी सोडायची नसेल तर कामाला लागा; कुंभ राशीसाठी कसं असेल 2023 वर्ष?

तुमचं पॅशन किंवा मिळालेली संधी सोडायची नसेल तर कामाला लागा; कुंभ राशीसाठी कसं असेल 2023 वर्ष?

कुंभ राशीचं वार्षिक राशीभविष्य 2023

कुंभ राशीचं वार्षिक राशीभविष्य 2023

घरापासून दूर राहणाऱ्या व्यक्तींना काही काळ घराची आठवण येईल. नियमित व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर ते आता शक्य होईल. जवळच्या व्यक्तीचं अनियमित वागणं तुम्हाला त्रासदायक वाटेल.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई, 06 जानेवारी : सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून कुंभ राशीचं 2023 या वर्षासाठीचं महिनानिहाय भविष्य सांगितलं आहे.

  कुंभ (Aquarius) 

  जानेवारी :

  सर्वसाधारण :

  तुमच्या सभोवतालची ऊर्जा काहीशी गोंधळात टाकणारी असेल. त्यामुळे तुम्हाला जे साध्य करायचं आहे त्यामध्ये अडचणी येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीचं लक्ष वेधून घेण्यासाठी नवीन मार्ग शोधण्याची गरज आहे. आर्थिक व्यवहार क्षेत्रातल्या व्यक्तींनी गैरसमज टाळण्यासाठी स्पष्ट संवाद साधणं आवश्यक आहे. तुमची कौशल्यं वाढवण्याची तीव्र इच्छा होईल. यातूनच कदाचित बिझनेस आयडियादेखील मिळू शकतात.

  रिलेशनशिप :

  स्वतःला सिद्ध करण्याची आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या व्यक्तीच्या प्रेमात होतात तिच्याशी पुन्हा संपर्क साधाल. एखाद्या खास व्यक्तीला शोधण्यासाठी मित्रांची मदत होईल.

  करिअर :

  भूतकाळात दुसऱ्या कोणी तरी घातलेला गोंधळ निस्तरण्याची वेळ तुमच्यावर येईल. चौकशी होण्याची शक्यता आहे. तुमच्या नेतृत्व कौशल्याचं कौतुक होईल.

  लकी रंग : Ruby

  फेब्रुवारी :

  सर्वसाधारण :

  भूतकाळात तुमच्यावर इतरांकडून अन्याय झाला असेल, तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीती तयार कराल. तुमच्या भावना दाबून ठेवू नका, तुम्हाला काय वाटतं हे समोरच्याला सांगणंही गरजेचं आहे. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर चांगल्या संधी उपलब्ध होतील. नात्यांना प्राधान्य द्याल.

  रिलेशनशिप :

  आजूबाजूला नवीन पर्याय उपलब्ध असले तरी मनात शंका येऊ देऊ नका. तुम्ही शेवटी ज्या व्यक्तीबद्दल विचार केला होता तिच्यासोबतच नातं जुळू शकेल. तुम्हाला आवडत असलेल्या व्यक्तीसोबत संवाद साधण्यासाठी एखाद्या मित्र-मैत्रिणीची मदत होईल.

  करिअर :

  तुम्हाला तुमचा वेग कमी करण्याची ही वेळ आहे; मात्र याचसोबत डेडलाइन्सही पाळाव्या लागतील. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर कोणीतरी बारीक लक्ष ठेवून असू शकतं.

  लकी रंग : Mauve

  मार्च :

  सर्वसाधारण :

  तुमचं पॅशन किंवा मिळालेली संधी सोडायची नसेल, तर त्यासाठी मनापासून प्रयत्न आणि मेहनत करण्याची गरज आहे. येत्या काळामध्ये अधिक विश्वासार्ह तंत्राच्या मदतीने आपलं कार्य पूर्ण कराल. आत्मविश्वास वाढेल, तसंच मैत्रीपूर्ण वाटेल. गेल्या काही दिवसांपासून उद्भवत असणारी तब्येतीची समस्या पुढे जाणवणार नाही. जोडीदाराचा एखादा सल्ला विचार करण्यायोग्य असेल.

  रिलेशनशिप :

  विवाहाचा निर्णय चुकल्यामुळे गोंधळ जाणवेल. याबाबत काही तरी करण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या मित्रपरिवारातल्या एखाद्या व्यक्तीला गैरसमज झालेला असू शकतो.

  करिअर :

  काही गोष्टी साध्या आणि सरळ ठेवल्यास त्यावर वेगाने काम होऊ शकतं हे लक्षात घ्या. तब्येतीची समस्या जाणवत असेल तर ब्रेक घेण्याची गरज आहे.

  लकी रंग : Crimson

  एप्रिल :

  सर्वसाधारण :

  मनात वेगवेगळे नवीन विचार येतील; मात्र त्यांना ठरावीक दिशा नसेल. तुमच्या क्षेत्रातल्या एखाद्या दिग्गज व्यक्तीची भेट होईल. या व्यक्तीने दिलेला सल्ला मोलाचा ठरेल. एखादी छोटीशी सहलदेखील तुम्हाला ताजंतवानं करेल. एखाद्या गोष्टीच्या मागे लागून कंटाळला असाल, तर तुमचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

  रिलेशनशिप :

  रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला काय हवं आहे हे बोलून दाखवा. जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल काही मतं आहेत, ज्यांचं निराकरण करणं गरजेचं आहे. आपल्या भावना व्यक्त न केल्यास जोडीदारासोबत वाद संभवतात.

  करिअर :

  एखादी मोठी व्यक्ती तुमच्या कामाची दखल घेईल. याची परिणती सकारात्मक शिफारशीतही होऊ शकते. ऑनलाइन एखादी आकर्षक व्यक्ती भेटू शकते, जिला काही काळ डेट कराल.

  लकी रंग : Brown

  मे :

  सर्वसाधारण :

  कामाच्या ठिकाणी तुमची पहिली छाप ही आतापर्यंत ओळखीची झाली असेल. तुमचा हेतू सकारात्मक असला तरी तुमच्या वागण्याचा सभोवतालच्या काही व्यक्तींना त्रास होऊ शकतो. तुमची संवाद साधण्याची पद्धत बदलण्याची गरज आहे. एखाद्या अधिकारपदावर असाल, तर Receiving End ला असाल.

  रिलेशनशिप :

  तुमचा जोडीदार आपल्या कामात व्यग्र असल्यामुळे एकटेपणा जाणवेल. तुमच्या बाजूने दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची नक्कल करण्याचा प्रयत्न कामी येणार नाही. वाद झाल्यास एकमेकांसाठी थोडा वेळ काढा.

  करिअर :

  गेल्या काही महिन्यांपासून धोक्यात आलेल्या व्यवसायात सुधारणा दिसून येईल. शिक्षण क्षेत्रातल्या व्यक्तींना चांगली प्रगती दिसेल. नवउद्योजकांना किंवा नवीन नोकरी करणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागेल.

  लकी रंग : Turkish Blue

  जून :

  सर्वसाधारण :

  भूतकाळातला तुमच्याबद्दलचा एक मजबूत ठसा अजूनही नवीन गोष्टींवर परिणाम करेल. भविष्यातल्या योजना आखण्यासाठी एखाद्या व्यक्तीची मदत घ्याल. आर्थिक प्रगती चांगली असल्यामुळे गाडी रुळावर येण्यास मदत होईल. एखाद्या सहलीचा विचार करत असाल, तर त्यासाठी चांगली वेळ आहे. आयुष्यात समतोल साधल्याचं जाणवेल.

  रिलेशनशिप :

  काही गैरसमज निर्माण झाल्यामुळे तणाव वाढण्याची शक्यता आहे. हे सोडल्यास बाकी महिना स्थिर वाटतो. कधी कधी मनःशांती आणि स्पष्टता मिळवण्यासाठी इतरांपासून थोडं दूर राहणं फायद्याचं ठरतं, हे लक्षात घ्या.

  करिअर :

  वेळीच केलेल्या एखाद्या कृतीमुळे मोठा गोंधळ टळेल. निर्णय घेण्यासाठी एखादी चांगली मार्गदर्शक व्यक्ती भेटेल. एखादी गोष्ट करण्यासाठी पूर्ण तयारी नसेल, तर त्याबाबत शिकून घेणं कधीही उत्तम.

  लकी रंग : Lemon Yellow

  जुलै :

  सर्वसाधारण :

  तुमच्या कौशल्याचं सर्व स्तरांतून कौतुक होईल. एरव्ही अगदी संथपणे चाललेली दिनचर्या बदलून काही आठवडे ताण वाढेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसून येईल. हा बदल आत्म-जाणिवेतून होईल, आणि तो तुमच्या चांगल्यासाठीच असेल.

  रिलेशनशिप :

  तुमच्या नात्याला आणखी एक संधी देण्याचं कारण मिळेल. याबाबत नक्कीच विचार करा. तुम्हाला आवडत असणारी परदेशातली एखादी व्यक्ती भेटण्याची योजना आखेल. एखादं कॅज्युअल नातं अचानकपणे संपुष्टात येईल.

  करिअर :

  तुमच्या आवडीशी जुळणारं करिअर करण्याची संधी तुम्ही शोधत असाल तर एखाद्या ओळखीची व्यक्ती चांगला पर्याय सुचवू शकेल. कामाच्या ठिकाणी छोटासा गैरसमज तुमच्या वैयक्तिक मतावर परिणाम करेल. आर्थिक स्थिती चांगली राहील.

  लकी रंग : Apple Red

  ऑगस्ट :

  सर्वसाधारण :

  भूतकाळातल्या काही निवडी खरोखरच योग्य होत्या याची आज ना उद्या जाणीव होईल. कधी कधी एखाद्या विशिष्ट मार्गावर चालणं हे आपल्या नशिबातच लिहिलेलं असतं. तुम्हाला तुमच्या निवडीबद्दल आत्मविश्वास वाटेल. शिवाय सोबतच्या व्यक्तीही त्याबाबत सहमत असतील. आता सरळ मार्गावर चालण्याची वेळ आली आहे.

  रिलेशनशिप :

  काही मित्र तुमच्या आवडीच्या व्यक्तीपासून दूर राहण्याचा सल्ला देऊ शकतात. तुम्ही स्वतः विचार करून निर्णय घय्. सिंगल असाल तर पार्टी वगैरे गोष्टींमध्ये मन रमवाल. सोबतच एखाद्या आकर्षक व्यक्तीची भेट होण्याची शक्यता आहे.

  करिअर :

  कामाच्या ठिकाणी काहीशी गोंधळाची परिस्थिती असेल. तुमचंच मन तुम्हाला वारंवार विचलित करील; मात्र त्याकडे दुर्लक्ष करा. काम आणि वैयक्तिक आयुष्य यांची रसमिसळ करू नका.

  लकी रंग : Rose

  सप्टेंबर :

  सर्वसाधारण :

  एखादं कायदेशीर प्रकरण सुरू असेल, तर सर्व पुरावे सांभाळून ठेवा. तुमच्याबाबतची गोपनीय माहिती एखादी जवळची व्यक्तीच बाहेर पुरवत असण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसोबत फिरायला जाण्याची योजना ठरेल; मात्र कामाच्या व्यापात ती यशस्वी होण्याची शक्यता धूसर आहे. एखादी बातमी तुमचं लक्ष वेधून घेईल, तसंच तुमच्या समस्येवर उपायही देऊन जाईल.

  रिलेशनशिप :

  तुमच्या रिलेशनशिपमध्ये भूतकाळात केलेल्या छोट्या छोट्या गोष्टीच सध्या तुमचं नातं टिकवून ठेवतील. कुटुंबीयांकडून कदाचित अजिबात पाठिंबा मिळणार नाही. तुम्हाला आवडत असलेल्या व्यक्तीला तुम्हीही आवडत असालच असं नाही.

  करिअर :

  कामाचा ताण वाढेल, मात्र तुम्ही निभावून न्याल. डेडलाइन पाळण्याच्या प्रयत्नात दमछाक होईल. विनाकारण होणारे वाद टाळा.

  लकी रंग : Rust

  हे वाचा - अनेक गोष्टी सुरू असूनही असमाधानी वाटू शकतं; धनु राशीसाठी कसं असेल 2023 वर्ष

  ऑक्टोबर :

  सर्वसाधारण :

  आपण ज्या योजनेबद्दल विचार करत होतात, ती अमलात आणण्याची ही वेळ आहे. मनातली अस्पष्टता आणि गोंधळ पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. मित्रांसोबत अचानक झालेली भेट किंवा सहल थेरपीप्रमाणे काम करील.

  रिलेशनशिप :

  अरेंज मॅरेजचा निर्णय उपयुक्त ठरेल. काही दिवसांपूर्वीच भेट झालेल्या एखाद्या व्यक्तीसोबत चांगले संबंध जुळतील. जोडीदाराचे नवीन खुलासे तुम्हाला आश्चर्यचकित करतील.

  करिअर :

  बिझनेसमध्ये सुरुवातीला चांगले परिणाम दिसतील. भागीदारी केल्यामुळे तुमच्या बऱ्याच चिंता दूर होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

  लकी रंग : Tiger Orange

  नोव्हेंबर :

  सर्वसाधारण :

  घरापासून दूर राहणाऱ्या व्यक्तींना काही काळ घराची आठवण येईल. नियमित व्यायाम करण्याचा विचार करत असाल तर ते आता शक्य होईल. जवळच्या व्यक्तीचं अनियमित वागणं तुम्हाला त्रासदायक वाटेल. यामुळेच चिडचिड वाढण्याची शक्यता आहे. अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे रस्त्यावरून जाताना खबरदारी बाळगा.

  रिलेशनशिप :

  बऱ्याच काळापासून संपर्कात नसलेली एखादी व्यक्ती पुन्हा संवाद साधेल. एखाद्या व्यक्तीच्या दुःखद गोष्टी ऐकण्याचा कंटाळा येत असेल तर तिला तसं स्पष्टपणे सांगा. जोडीदाराची एखादी छोटीशी कृती भरपूर आनंद देऊन जाईल.

  करिअर :

  उच्च शिक्षणामध्ये काही काळापासून येत असलेले अडथळे दूर होतील. प्रगतीसाठी आता अनुकूल वेळ आहे. एखादी शिष्यवृत्ती, फेलोशिप किंवा ग्रँट मिळण्याची शक्यता आहे.

  लकी रंग : Navy Blue

  हे वाचा - सूर्य-शनिदेव एकत्र येण्याचा विचित्र योग! या 3 राशीच्या लोकांवर ओढावू शकतं संकट

  डिसेंबर :

  सर्वसाधारण :

  तुम्हाला दिलेल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं, तर इच्छित परिणाम दिसून येईल. अर्थात, सध्या बऱ्याच गोष्टींमुळे लक्ष विचलित होण्याची शक्यताही आहे. आजूबाजूला आलेल्या काही नवीन व्यक्तींचं तुमच्याबद्दल विशिष्ट मत तयार होईल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. एखादी छोटीशी सहल तुम्हाला आवश्यक तो ब्रेक देण्यासाठी योग्य ठरेल. या प्रवासातून तुम्हाला नवीन दृष्टिकोनही मिळेल.

  रिलेशनशिप :

  एखादी विचित्र वाटणारी कल्पनाही तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला अविस्मरणीय आनंद देऊन जाईल. तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या व्यक्तीला तुम्हीही तशाच प्रकारे आवडत असाल असं नाही. तुम्हाला समजून न घेणाऱ्या व्यक्तीसोबत असण्यापेक्षा सिंगल असलेलं कधीही उत्तम.

  करिअर :

  फॅमिली फ्रेंडकडून एखादी कामाची उत्तम संधी मिळू शकेल. एखाद्यावरचं तुमचं अवलंबित्व एखादी गोष्ट सिद्ध करू शकेल. पार्टनरशिपमध्ये बिझनेस करत असाल तर अकाउंट्स नियमित तपासले जात असल्याची खात्री करा.

  लकी रंग : Apricot

  First published:

  Tags: Astrology and horoscope, Horoscope, Rashibhavishya