मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /

Numerology : जन्मतारखेनुसार 18 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

Numerology : जन्मतारखेनुसार 18 जुलैचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? अंकशास्त्रानुसार जाणून घ्या भविष्य

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 18 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 18 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 18 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.

ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 18 जुलै 2022 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. #नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) घरून काम करण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर काम करण्यासाठी चांगला दिवस. स्पर्धा जिंकू शकाल. गॅदरिंगला जायला हवं आणि माइकही हाती घ्यायला हवा. तुमच्या भाषणाची क्रिएटिव्ह शैली समोरच्यांवर चांगला प्रभाव पाडील. आज मास कम्युनिकेशन जितकं जास्त असेल, तितकी जास्त प्रगती होईल. कपल्स लव्ह रिलेशन्सचा आनंद लुटतील. सरकारी अधिकारी, डॉक्टर्स, संगीतकार आणि ग्लॅमर इंडस्ट्रीतल्या व्यक्ती लोकप्रियता मिळवतील. शुभ रंग : Orange शुभ दिवस : रविवार, मंगळवार शुभ अंक : 1, 9 दान : झाडांना हळदीचं पाणी घाला. #नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठांचं साह्य लागेल. भावनिकदृष्ट्या मजबूत व्हा. कारण कोणीही तुम्हाला सहज दुखावू शकतं. मॅनिप्युलेशन्स तुम्हाला जमणार नाहीत. त्यामुळे स्वतःला त्यापासून लांब ठेवा. तुमची मुलं आणि नातेवाईकांसोबत व्यतीत करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदाराच्या समोर भावनांवर नियंत्रण ठेवा. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करा, एक्स्पोर्ट बिझनेस डील्सही करा. तुम्ही अनइन्फ्लुएन्स्ड राहिलात, तर नात्यांतला रोमान्स वाढीला लागेल. शुभ रंग : Pink शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 2 दान : भिकाऱ्यांना दूध दान करा. #नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजच्या दिवसाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी क्रिएटिव्हिटी आणि हार्ड वर्क यांचं कॉम्बिनेशन करावं लागेल. आत्ता तुमच्या कष्टांना फळ मिळण्याचा कालावधी आहे. तुमचे प्लॅन्स अंमलबजावणीसाठी कागदावर तयार पाहिजेत. राजकीय नेते, वकिलांसाठी प्रभावी दिवस. कपडे किंवा डेकॉरच्या खरेदीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. डिझायनर्स, हॉटेलियर्स, अँकर्स, कोचेस, फायनान्सर्स, संगीतकार आज खास काही तरी प्राप्त करतील. आज दिवसाची सुरुवात पिवळा भात खाऊन करा. शुभ रंग : Red शुभ दिवस : गुरुवार शुभ अंक : 3, 9 दान : आश्रमात पुस्तकं दान करा. #नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज तुम्हाला जबाबदारीचं पद दिलं जाईल. तुम्ही सर्व जबाबदाऱ्या सहजपणे आणि आदराने पार पाडू शकाल. बिझनेस डील्स विनाविलंब क्रॅक होतील. आर्थिक विषयांत घेतलेले महत्त्वाचे निर्णय फायदेशीर ठरतील. नाट्यकलावंत, अभिनेते, अँकर्स, डान्सर्स आदींनी ऑडिशन्ससाठी जरूर अर्ज करावा. आज लाभ मिळण्याचे बरेच संकेत आहेत. मेटल मॅन्युफॅक्चरर्स, कपड्यांचे उत्पादक आदींना आज मोठा नफा होईल. आरोग्य संतुलित राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्या आहारात ठेवा. शुभ रंग : Purple शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : मुलांना रोपं दान करा. #नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आजचा दिवस घडामोडींचा आहे. प्रवासाचा आनंद घ्या. दीर्घकालीन समस्या सोडवण्यासाठी कुटुंबीय आणि मित्रांचा पाठिंबा मिळेल. आर्थिक नफा मिळेल. एक्स्पोर्ट-इम्पोर्टमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर परतावा मिळेल. डोळे उघडून पाहा आणि तुमच्या जोडीदाराने दिलेलं प्रेम, आदर याची पोचपावती द्या. स्टॉक मार्केट, स्पोर्ट्स, इव्हेंट्स, स्पर्धा परीक्षा, इंटरव्ह्यू आदींमध्ये नशीब आजमावून पाहा. आज तुमचा जोडीदार तुम्हाला पूर्ण वेळ उपलब्ध असेल. शुभ रंग : Green & Orange शुभ दिवस : बुधवार शुभ अंक : 5 दान : पाळीव प्राण्यांना अन्न खाऊ घाला. # नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज खूप जास्त तास काम करावं लागेल. तरीही आजचा दिवस आरामदायी असेल, नवी संधी आणणारा असेल आणि आयुष्याला पूर्णत्वाची भावना देणारा असेल. जोडीदाराबरोबर असलेले वाद सोडवण्याचा आणि बाहेर शॉपिंगला जाण्याचा काळ. डिझायनर्स, इव्हेंट मॅनेजर्स, ब्रोकर्स, शेफ, विद्यार्थी आदींना नव्या असाइनमेंट्स मिळतील. त्यातून त्यांची प्रगती होईल. रोमँटिक रिलेशनशिपमुळे घरात आनंद परत येईल. शुभ रंग : Violet शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : पांढरा हातरुमाल दान करा. #नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) शंकानिरसनासाठी तुमच्या पूर्वानुभवाचा वापर करा. तुमची कर्जं वेळेआधी फेडा. आव्हान स्वीकारा. कारण तुमच्या शहाणपणामुळे तुम्ही जीवनाच्या सर्व बाजूंमध्ये जिंकू शकता. बाहू खुले करा आणि आई, बहीण किंवा पत्नीने दिलेल्या सूचनांचा स्वीकार करा. आज जी मोठी समस्या वाटते आहे, ती या आठवड्यात नक्की कमी होईल. पर्सोनेल किंवा बिझनेससंदर्भातलं प्रपोझल आल्यास ते स्वीकारलं पाहिजे. तुम्हाला भविष्यात ते फायद्याचं ठरेल. वकील, नाट्यकलावंत, सीए, सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या व्यक्तींना आज नशीब खास साथ देईल. शुभ रंग : Orange शुभ दिवस : सोमवार शुभ अंक : 7, 9 दान : गरिबांना मोहरीचं तेल दान करा. #नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) आज समस्येची तीव्रता कमी होईल. नव्या सपोर्ट सिस्टीम्स तुमच्याकडून स्वीकारलं जाण्याची वाट पाहत आहेत. कायदेशीर वाद निवळण्यासाठी बराच कालावधी लागेल. डॉक्टर्स, मॅन्युफॅक्चरर्सना अचीव्हमेंट्समुळे सन्मान प्राप्त केल्यासारखं वाटेल. जोडीदाराबरोबर वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोकं शांत ठेवा. आज धान्यदान करा आणि संत्री खा. शुभ रंग : Deep Purple शुभ दिवस : शुक्रवार शुभ अंक : 6 दान : गायींना किंवा, गरिबांना हिरव्या पालेभाज्या दान करा. #नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.) विवाहासाठी अनुरूप जोडीदार शोधत असलेल्यांसाठी चांगला दिवस आहे. वैयक्तिक समस्या सोडवण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. बिझनेस रिलेशन्स, डील्स नवी उंची गाठतील. ग्लॅमर इंडस्ट्री आणि मीडिया क्षेत्रातल्या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. राजकीय नेत्यांना मोठ्या संधी मिळतील. पब्लिक फिगर्सनी आजचा दिवस कोलॅबोरेशनमधून प्रगती साध्य करण्यासाठी वापरावा. ट्रेनर्स, डिझायनर्स, डॉक्टर्स, वकील, इंजिनीअर्स, अभिनेते आदी लोकप्रियतेचा आनंद लुटतील. शुभ रंग : Red शुभ दिवस : मंगळवार शुभ अंक : 9 दान : लाल मसूर दान करावेत. 18 जुलै रोजी जन्मलेले सेलेब्रिटीज : भूमी पेडणेकर, प्रियांका चोप्रा, सुखविंदर सिंग, स्मृती मंधाना, मेहदी हसन
First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology

पुढील बातम्या