मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /Numerology: अंकशास्त्रानुसार #नंबर 5 साठी 2023 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या भविष्य

Numerology: अंकशास्त्रानुसार #नंबर 5 साठी 2023 हे वर्ष कसं असेल? जाणून घ्या भविष्य

5 अंक

5 अंक

5 जन्मांक असलेल्या व्यक्ती अष्टपैलू आणि अत्यंत नशीबवान असतात. अशा व्यक्तींकडे उत्कृष्ट व्यवस्थापन क्षमता असतात. अंकशास्त्रानुसार अशा व्यक्ती एकाच वेळी अनेक असाइनमेंट करू शकतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 29 डिसेंबर : ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही (Numerology) महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 2023 हे वर्ष #नंबर 5 साठी कसं असेल, जाणून घ्या.

#नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

#नंबर 5 हा बुधाचं प्रतिनिधित्व करतो.

5 जन्मांक असलेल्या व्यक्ती अष्टपैलू आणि अत्यंत नशीबवान असतात. अशा व्यक्तींकडे उत्कृष्ट व्यवस्थापन क्षमता असतात. अंकशास्त्रानुसार अशा व्यक्ती एकाच वेळी अनेक असाइनमेंट करू शकतात. अशा व्यक्तींच मन विश्लेषण करण्यात प्रवीण असतं. त्या करिअरवर लक्ष केंद्रित करणाऱ्या आणि व्यावहारिक असतात. एका वेळी एका व्यक्तीशी संभाषण करताना त्या आजूबाजूच्या अनेक लोकांचं सहज निरीक्षण करू शकतात. पाच अंकाचा प्रभाव असलेल्या व्यक्ती रोमँटिक व मनानं चिरतरुण असतात. त्या साधारणपणे प्रेमविवाहाला प्राधान्य देतात.

5 जन्मांक असलेल्या व्यक्ती अतिशय आकर्षक असतात आणि सर्व ठिकाणी त्या लोकांचं लक्ष आपल्याकडे केंद्रीत करून घेतात. त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीबाबत भरपूर ज्ञान आणि सल्ला उपलब्ध असतो. ज्यांना गरज आहे अशा लोकांना पाठिंबा देणं आणि मदत करण्यास त्या नेहमी तयार असतात. या व्यक्ती मनोरंजन करण्यात तत्पर असतात. एकूणच या व्यक्ती एकत्र आल्यानंतर सर्वांत जास्त आनंद घेताना दिसतात.

5 क्रमांकासाठी 2023 हे वर्ष यश आणि प्रशंसेच्या दृष्टीनं उत्कृष्ट ठरणार आहे. 2023 मध्ये, करिअर, प्रेम, सामाजिक जीवन, पैशांची बचत आणि आध्यात्मिक शिक्षण या क्षेत्रांमध्ये तुमची ब्रँड प्रतिमा वाढेल.

2023करिता #नंबर 5चं विश्लेषण

#नंबर 5 - करिअर आणि पैशांच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज

2023 ची एकूण बेरीज सात होते. त्यामुळे हे वर्ष क्रमांक 5 साठी बऱ्यापैकी अनुकूल आहे. पाच जन्मांक असलेल्या व्यक्तीला नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगली संधी मिळेल. इंडस्ट्रीतील दिग्गज व्यक्तींसोबतचे तुमचे संबंध भविष्यासाठी फायद्याचे आणि प्रभावी ठरतील. नोकरी करणाऱ्यांना 2023 मध्ये निःसंशयपणे पगारवाढीसह पदोन्नती दिली जाईल. परदेशात स्थायिक होणं आणि नोकरीतील पदोन्नती या गोष्टी मिळण्याची शक्यता आहे.

2023 मध्ये, लक्ष विचलित करण्यासाठी पुरेशी कारणं उपलब्ध असतील. त्याकडे दुर्लक्ष करून ध्येयाकडे लक्ष केंद्रित करा आणि महत्त्वाकांक्षी रहा. आपलं डोकं वर ठेवण्याचा प्रयत्न करा आणि पुढे बघत रहा. एप्रिल, मे, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि डिसेंबर हे महिने आर्थिक निर्णय घेण्यासाठी चांगले असतील. राजकारण, ग्लॅमर, क्रीडा, इव्हेंट्स, मार्केटिंग आणि मीडियामधील व्यक्ती वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत अंतिम उद्दिष्ट गाठण्याची शक्यता आहे. त्यासाठी विस्तृत नेटवर्क एक्सप्लोर केलं पाहिजे.

#नंबर 5 - प्रेम, कुटुंब आणि लग्नाच्या अनुषंगाने 2023 साठीचे अंदाज

2023 मध्ये, 5 क्रमांकाच्या व्यक्तींना उच्च निष्ठा आणि समृद्धीसह प्रेम व रिलेशनशीपचा आनंद घेता येईल. अविवाहित लोकांना जीवाभावाचा सोबती मिळण्याची शक्यता आहे. या वर्षी प्रेमविवाह करणं सहज शक्य आहे. पालक त्यासाठी पाठिंबा देतील. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले प्रेमसंबंधातील वाद मिटतील. कोणत्याही वादाशिवाय वैवाहिक जीवन यशस्वी होईल. या वर्षात तुम्ही आणि तुमचा जोडीदार यांच्यातील बंध मजबूत होतील. एकत्र प्रवासाची संधी मिळेल.

हे वाचा - शुक्राचे होणार राशी परिवर्तन; या 4 राशीच्या लोकांचे वाढणार इनकम सोर्स

शिवाय, 2023मध्ये तुम्हाला उत्साह आणि तुमच्या सर्व समवयस्कांचा पाठिंबा मिळेल. जर एखादं मूल जन्माला घालण्याचा विचार करत असाल तर अंकशास्त्राच्या दृष्टीनं हा निर्णय योग्य ठरेल.

2023 हे वर्ष सामाजिक स्थिती आणि कुटुंबासाठी विलक्षण असेल. तुमची मजबूत सामाजिक प्रतिमा नातेवाईकांचं लक्ष वेधून घेईल आणि त्यामुळे तुम्हाला अधिक विशेष वाटेल. फॅमिली गॅदरिंग्ज अपेक्षित आहेत. सर्व फॅमिली गॅदरिंग्जच्या जबाबदाऱ्या तुम्हीच सांभाळाल. तुम्ही प्रामाणिक आहात आणि प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करू शकाल. भावंडांचं विशेष सहकार्य मिळेल. तुम्ही तुमच्या सामाजिक जीवनात भरपूर दानधर्म करून चांगली सामाजिक प्रतिष्ठा मिळवली पाहिजे.

हे वाचा - नववर्षात सूर्यदेवांची स्वारी निघालीय या उच्च राशीत! कोणाचं पालटणार नशीब?

#नंबर 5 - 2023 या वर्षासाठी उपाय:

1. गणपतीचे पूजा विधी करा.

2. पक्षी आणि इतर प्राण्यांना अन्न-पाणी दिल्याने नशीबाची साथ आणि स्थिरता मिळेल.

शुभ रंग: हिरवा आणि पांढरा

शुभ रंग: 5

शुभ दिशा: उत्तर आणि पूर्व

शुभ दिवस: बुधवार

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya