मुंबई, 30 डिसेंबर : सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून कर्क राशीचं 2023 या वर्षासाठीचं महिनानिहाय भविष्य सांगितलं आहे.
कर्क (Cancer )
जानेवारी :
सर्वसाधारण: तुम्ही जितके विनम्र असाल तितका तुम्ही इतरांचा आत्मविश्वास वाढवू शकाल. जर तुम्ही याचं अनुसरण करत असाल तर तुमच्या लक्षात येईल की, जास्त प्रतिकार न करता सहज गोष्टी घडतात. तुमची मुलं तुमच्या आनंदाचा प्राथमिक स्रोत असू शकतील. तुम्ही तुमच्या दिनचर्येमधून आता थोडा ब्रेक घेऊ शकता आणि इतर जबाबदाऱ्या पूर्ण करू शकता.
रिलेशनशिप: तुमचं मन मोठं आहे आणि तुम्ही भावनिकदेखील आहात त्यामुळे तुमचा वारंवार गैरफायदा घेतला जाऊ शकतो. सर्वकाही होल्डवर ठेवून सध्याच्या रिलेशनशिपमध्ये फार गुंतल्याची जाणीव तुम्हाला होऊ शकते. यामुळे तुम्ही विचलित होऊ शकता.
करिअर: आर्थिक आवक चांगली असेल आणि तणाव नियंत्रणात असेल. कामाशी संबंधित प्रवास पुढे ढकलला गेला असेल तर त्याचे योग आता आहेत. एखाद्या परिस्थितीबद्दल तुम्हाला तुमच्या वरिष्ठांशी स्पष्ट संवाद साधण्याची गरज भासेल.
लकी रंग : Mustard
फेब्रुवारी :
सर्वसाधारण: संसारिक जीवन कमी आव्हानात्मक वाटू शकतं आणि भरारी घेण्यासाठी तुम्हाला नवीन प्रेरणा मिळू शकते. एखादा माजी सहकारी काही वैयक्तिक कामासाठी तुमच्याशी संपर्क साधू शकतो. संधी मर्यादित आहेत पण, तुम्ही स्वतःसाठी एखादी संधी शोधू शकता. सध्याची वेळ समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी मिळवण्याची आहे आणि तुम्ही त्याचा पुरेपूर वापर करू शकता. मनात दडलेल्या भावना उघडपणे बाहेर पडू शकतात. त्यामुळे लक्ष विचलित होईल.
रिलेशनशिप: तुम्ही पूर्वी डेट केलेल्या व्यक्तीच्या मनात अजूनही तुमच्याबद्दल भावना असू शकतात. कदाचित तुमचा जोडीदार एखादी महत्त्वाची गोष्ट लपवत असेल. तुमच्या संवादामुळे नातं टिकण्यास मदत होईल.
करिअर: भूतकाळात झालेली आर्थिक प्रगती काही काळासाठी स्थिर राहील. एखाद्या प्रासंगिक संधीमुळे कदाचित भूतकाळातील घटनांचा विचार करावा लागेल. स्पर्धा परीक्षेला बसत असल्यास, तुम्ही एकाचवेळी अनेक साधनांचा गैरफायदा घेणार नाही याची खात्री करा.
लकी रंग : Red
मार्च :
सर्वसाधारण: ब्रह्मांडातील सर्व शक्ती सध्या तुमच्या गरजा आणि इच्छांच्याआधारे योग्य स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे शक्य झालं की तुम्हाला भरून पावल्यासारखं वाटेल. घरात किरकोळ मुद्द्यांवरून भांडणं किंवा मतभेद अपेक्षित आहेत. अध्यात्मिक साधनेमुळे शांतता मिळू शकते.
रिलेशनशिप: तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेण्यात कमी पडू शकतो आणि तो पूर्णपणे उलट काहीतरी सुचवू शकतो. तुम्हाला स्वत:साठी थोडा वेळ घ्यावासा वाटेल किंवा स्पेस मिळवाशी वाटेल. एखाद्या मित्राच्या मनात तुमच्याबद्दल प्रेमभावना निर्माण होऊ शकतात पण तो त्या व्यक्त करू शकणार नाही.
करिअर: एखादी नवीन व्यक्ती तुमच्या टीममध्ये सामील होऊ शकते. पण, अंतर्गत सिस्टिममध्ये ती आधीपासूनच चांगली कनेक्ट झालेली दिसेल. तुम्हाला खात्री नसल्यास स्वत:हून मदत करण्याचा प्रयत्न करू नका. क्लिशे दृष्टिकोन तुम्हाला मागे ओढू शकतो.
लकी रंग : Coral
एप्रिल :
सर्वसाधारण: एखादी गोष्ट गृहीत धरली तर ती सत्यात उतरण्याची शक्यता आहे, अशी भीती तुमच्या मनात आहे. हे टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे त्याबाबत विचार करणं थांबवलं पाहिजे. जर तुम्ही आपल्या मानसिक सामर्थ्यावर काम केलं तर तुमचा दिवस शिस्तबद्ध असेल, असं एनर्जी दर्शवतात. तुम्ही तुमची दिनचर्या खूप काटेकोरपणे पाळू शकाल. तुमचे काही मित्र तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करतील पण तुम्ही त्यांना भेटण्यासाठी तयार नसाल.
रिलेशनशिप: तुमचा दृष्टिकोन सोपा आणि साधा-सरळ करा. तुम्ही कदाचित नातेसंबंधाची व्याख्या करणारी ठराविक मार्गदर्शक तत्त्वं फॉलो कराल. एकमेकांना स्पेस दिल्यास ती तुमच्या दोघांसाठी नवीन लाईफलाइन ठरू शकते.
करिअर: तुमच्याकडे सहकार्याने काम करण्यासंबंधी नवीन कल्पना असल्यास, त्यासाठी जोडीदार निवडताना पुनर्विचार केला पाहिजे. कागदपत्रांतील अनियमितता तुम्हाला अडचणीत आणू शकते. दूरच्या भागीदारापेक्षा स्थानिक भागीदाराला प्राधान्य देणं नेहमीच योग्य ठरेल.
लकी रंग : Silver
मे :
सर्वसाधारण: तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीकडून भेटीची वेळ घेतली असेल तर तुम्ही त्यांच्या वेळेचा आणि मेंटल स्पेसचा आदर कराल, याची खात्री करा. कदाचित अंमलात आणता येणार नाहीत अशा कल्पनांबद्दल बोलणं तुम्ही टाळू शकता. एखादी ज्येष्ठ व्यक्ती तुमच्याकडे मदत मागू शकते. पालक एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीचं नियोजन करत असतील. त्यांना त्याबद्दल तुमचं मत आणि सहभाग आवश्यक असेल.
रिलेशनशिप: मनात खोलवर वसलेलं प्रेम नातेसंबंध पूर्ण करण्यासाठी स्वतःचा मार्ग शोधू शकतं. अनेक चांगल्या आठवणी मागे सोडण्याचा हा महिना आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये असलेल्या व्यक्तींना जोडीदारासोबत चांगला वेळ घालवणं शक्य होईल.
करिअर: सध्या सुरू असलेली आर्थिक अस्थिरता लवकरच संपुष्टात येईल. त्यामुळे खूप दिलासा मिळेल. वरिष्ठांची तुमच्यावर चांगली छाप पडली आहे आणि ते निराश होऊ नयेत यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. तयारी करताना विद्यार्थ्यांना थकवा जाणवू शकतो.
लकी रंग : Mahogany
जून :
सर्वसाधारण: एखादी व्यक्ती मुद्दाम वाद घालण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे त्याकडे दुर्लभ करणं योग्य ठरेल. स्वभाव ही एक समस्या असू शकते. पण, आपण तो शांत करण्याचे मार्ग शोधू शकता. इतर लोक तुमच्यावर कामाचं आणि तणावाचं ओझं टाकण्याचा प्रयत्न करू शकतात. तुमच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू असेल, प्रत्येक गोष्टीबद्दल बोलणं गरजेचं नाही. तुम्हाला भूतकाळातील प्रकरण मार्गी लावण्याची संधी मिळू शकते. घराबाहेर वेळ घालवल्यानं आवश्यक ते बदल होऊ शकतात.
रिलेशनशिप: अचानक एखादी नवीन प्रेमकथा सुरू होऊ शकते. हे रिलेशनशीप फार काळ टिकणार नाही. पण, त्यातून निर्माण झालेल्या आठवणी खूप मजबूत असतील. तुम्ही विवाहित असाल, तर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एखाद्या लहान ट्रिपची योजना आखू शकता. रिलेशनशीपबद्दल तुमच्या मनावर मित्रांचा प्रभाव पडत असल्याचं तुम्हाला जाणवेल.
करिअर: एखाद्या मित्रासोबत व्यवसायात काम करण्याची संधी मिळू शकते. तुमच्यापैकी सशस्त्र दलात असलेल्या व्यक्ती येत्या काळात व्यस्त असू शकतात. उत्पन्नाचे अनेक स्रोत शोधण्याची संधी मिळू शकते.
लकी रंग : Cyan
जुलै :
सर्वसाधारण: तुम्ही कदाचित एखादी योजना तयार केली असेल परंतु ती पूर्ण होण्यासाठी संयम ठेवावा लागेल आणि आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. साध्या दैनंदिन कामांना उशीर होऊ शकतो. तुमची वेळ पूर्णत्वाकडे जात आहे. तुम्ही भूतकाळात जे काही केलं आहे त्याचं फळ तुम्ही मिळवू शकता. एका वेळी एकाच गोष्टीचा विचार करणं योग्य आहे कारण एका वेळी अनेक गोष्टींबद्दल विचार केल्याने गोंधळ उडू शकतो. मनावर अनावश्यक ताण येऊ शकतो. लहानशा मेंटल ब्रेकसाठ प्लॅनिंग करू शकता.
रिलेशनशिप: वेळ अनुकूल असल्यानं नात्यातील अडचणी आता सुटू शकतात. परदेशात राहणारा एखादा जुना मित्र तुमच्याशी संबंध वाढवण्यात स्वारस्य दाखवू शकतो. हा मित्र तुमचा बालपणीचा क्रश देखील असू शकतो.
करिअर: आर्थिक स्थिती सामान्य दिसत आहे. पूर्वनियोजनाचे महत्त्व फार कमी लोकांना समजतं, तुम्ही योग्य वेळी त्याचा वापर केला पाहिजे. वेळेत सल्ला मिळाल्यानं तुम्हाला किचकट निर्णय घेण्यास मदत होऊ शकते.
लकी रंग : Maroon
ऑगस्ट :
सर्वसाधारण: तुम्ही काही नकोशा भावनांमध्ये गुंतले जाल. तुमच्या मनात संमिश्र भाव-भावनांची गर्दी होऊ शकते. तुम्हाला भावनिकदृष्ट्या असुरक्षित देखील वाटू शकतं. कोणतेही रँडम निर्णय न घेण्याचा प्रयत्न करा. सध्या एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या मनात गोंधळ निर्माण झाला असेल तर ती सोडून द्या.
रिलेशनशिप: सार्वजनिक ठिकाणी खासगी संभाषण करणं टाळा. खासकरून तुमच्या पार्टनरसोबत सार्वजनिक ठिकाणी बोलू नका. तुमच्या भूतकाळातील एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू शकते. एकाच वेळी अनेक लोकांमध्ये गुंतू नका कारण तसं होण्याची दाट शक्यता आहे.
करिअर: तुमचा गोंधळ उडाला असेल तर शांत राहून काम करण्याचा प्रयत्न करा. तसं करणं योग्य ठरेल. तुम्हाला तुमच्या टीमकडून, विशेषत: नॉन-टेक्निकल स्टाफकडून भरपूर पाठिंबा मिळू शकतो. वादासाठी कारणीभूत ठरणारी गोष्ट टाळा.
लकी रंग : Indigo
सप्टेंबर :
सर्वसाधारण: तुमच्या मनाला नवसंजीवनीची गरज आहे त्यामुळे स्वतःचे लाड करा. कोणत्याही प्रकारची विश्रांती घेतल्यास तुम्ही स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत कमी आणि स्वतःसोबत जास्त वेळ घालवावासा वाटेल. तुमच्यावर असलेला कौटुंबिक दबाव आता नाहिसा होऊ शकतो. इतरांचे उपकार घेणं टाळा.
रिलेशनशिप: पूर्वी तुम्हाला न आवडणारी एखादी व्यक्ती आता आवडू लागले. तुम्हाला तिच्यात रस निर्माण होईल. दुसरी व्यक्ती तुमच्याशी संवाद साधू शकेल असे स्वतःमध्ये बदल करा. विवाहाच्या प्रस्तावच्या बाबतीत हा महिना सामंजस्यपूर्ण आहे.
करिअर: कामातील स्थिरता ही आता भूतकाळातील गोष्ट आहे. तुमच्या सभोवताली व्यायामाचे अनेक पर्याय उपलब्ध असतील. कामाच्या बाबतीत स्थिरता मिळण्याची अपेक्षा करा. तुमचा लवकरच उच्च जबाबदारीसाठी विचार केला जाऊ शकतो.
लकी रंग : Sea green
ऑक्टोबर :
सर्वसाधारण: बर्याच दिवसांनी तुमचा आत्मविश्वास परत मिळेल. तुमच्या भूतकाळातील कामगिरीमुळे तुम्हाला तुमच्या आंतरिक क्षमतेची खात्री होऊ शकते. जर तुम्ही काही गुंतवणूक केली असेल तर त्यातील मुव्हमेंट कमी होऊ शकते. काही नातेवाईक तुम्ही राहत असलेल्या शहराला भेट देण्याची योजना आखतील आणि लवकरच ते तुम्हालाही भेटतील.
रिलेशनशिप: तुमच्या सध्याच्या रिलेशनशीपमधील टॉक्सिकपणा काढून टाकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जोडीदाराबद्दल असलेल्या विचारांवर पुनर्विचार करण्याचे संकेत मिळू शकतात. तुमच्या माहितीप्रमाणं जी गोष्ट गुपित आहे कदाचित ती काहींना अगोदरच माहिती झालेली असेल.
करिअर: नुकत्याच केलेल्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून तुम्ही ऑफिसमधील लोकांवर चांगली छाप पाडू शकता. तुमच्यावर लक्ष असलेली एखादी व्यक्ती तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करू शकते. काही दिवस बँक पेपरवर्क करण्यात तुम्ही गुंतले जाऊ शकतात.
लकी रंग : Orange
हे वाचा - बुध-शुक्राच्या संयोगातून साकारला लक्ष्मी-नारायण योग, या राशींसाठी ठरणार भाग्यवान
नोव्हेंबर :
सर्वसाधारण: दुसर्या व्यक्तीचा हेतू समजून घेणं सोपे काम नसेल पण तरीही तुम्ही धोका पत्करण्यास तयार असाल. तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर विश्वास ठेवणं तुमच्यासाठी कठिण असेल. सध्याच्या योजनेसाठी तुमच्याकडे पुरेसा बॅकअप असल्याची खात्री करा. सहली आणि प्रवास करण्याचे योग आहेत. तुम्ही ज्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत आहात ती अचानक समोर येऊ शकते. आपल्या जवळच्या मित्रांची हुशारीनं निवड करा.
रिलेशनशिप: तुमच्या दोघांमध्ये थोडा अवघडलेपणा असू शकतो. एखादा वाद आणि नाराजी याचं कारणं असू शकतं. लवकरच आशेचा नवा किरणही दिसू शकतो. लाँग डिस्टन्स रिलेशनशीपमधील व्यक्ती एकमेकांना भेटण्याचा प्लॅन करू शकतात.
करिअर: वर्षभरात केलेल्या कठोर परिश्रमांचा आनंद घेण्याची आणि त्याचा लाभ घेण्याची ही वेळ आहे. कामाच्या बाबतीत कोणीतरी तुमची मदत घेईल. तुमच्या प्रयत्नांवर बारकाईनं लक्ष ठेवलं जात आहे.
लकी रंग : Midnight Blue
हे वाचा - नववर्षात या 3 राशीच्या लोकांचे लव्ह लाईफ झकास! यांना घ्यावी लागेल काळजी
डिसेंबर :
सर्वसाधारण: तुमच्या लक्षात आलेल्या एखाद्या विशिष्ट प्रासंगिक विषयाबद्दल तुम्ही पुराणमतवादी होऊ शकता. एक सोपा दृष्टीकोन तुम्हाला लवकरच तुमचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यात मदत करेल. तुमची काही प्रभावशाली व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता आहे. तुम्हाला सहयोगाची नवीन संधी मिळेल. प्रचंड धैर्य दाखवाल आणि त्याचा फायदाही होईल. ओळख निर्माण होण्याचे योग आहेत.
रिलेशनशिप: नातं टिकण्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागणार नाही. आव्हानांचा सामना केल्यानं तुम्ही अधिक कणखर व्हाल. काही वेळा चेष्टा करणं अंगलट येईल.
करिअर: कामाच्या ठिकाणी तुम्ही आळशीपणा करण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी मिळालेल्यांना नोकरी टिकवण्यासाठी हुशारीनं काम करावं लागेल. करिअरच्या क्षेत्रात बदल करायचा असल्यास आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
लकी रंग : Gold
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.