मराठी बातम्या /बातम्या /राशीभविष्य /आनंददायी, मोहक, प्रभावशाली असतात R आद्याक्षराच्या व्यक्ती; भावतो त्यांचा हा गुण

आनंददायी, मोहक, प्रभावशाली असतात R आद्याक्षराच्या व्यक्ती; भावतो त्यांचा हा गुण

R अक्षराने नावाची सुरुवात होणाऱ्या लोकांचा स्वभाव

R अक्षराने नावाची सुरुवात होणाऱ्या लोकांचा स्वभाव

R अक्षरापासून नाव सुरू होणारी मुलं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लोकप्रियता मिळवतात. या व्यक्ती डिझायनिंग, कम्प्युटर, स्पोर्ट्स, ज्योतिष, वेदिक सायन्स, खगोलशास्त्र, संगीत, डान्स या क्षेत्रात चांगली कामगिरी करतात.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28 जानेवारी : बहुतांश भारतीय व्यक्ती आपल्या नवजात बाळाला एक लकी नाव देण्यासाठी लकी अक्षराची निवड करतात. अक्षराचं अंकशास्त्राच्या दृष्टीने असलेलं महत्त्व समजल्यामुळे जन्मतारखेशी अनुरूप असलेलं अक्षर निवडण्यात मदत होते, जेणेकरून उज्ज्वल भविष्याची दारं उघडता येतात.

#अक्षर R : ज्या व्यक्तींच नाव R या अक्षरानं सुरू होतं त्या गुणवान, शक्तिशाली, आनंददायी, मोहक, प्रभावशाली आणि लोकप्रिय असतात. R हे अक्षर नावांमध्ये सर्वांत सहज आढळणाऱ्या अक्षरांपैकी एक आहे. या अक्षराच्या व्यक्तींच्या आयुष्यात खोल अर्थ दडलेला असतो. या व्यक्ती सहजपणे मित्र बनवतात. त्यांना श्रीमंत व मदतीला तत्पर असं फ्रेंड सर्कल आवडतं. अशा व्यक्तींमध्ये लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता असते. त्यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये खूप यश मिळतं. विशेषत : राजकारण आणि ग्लॅमर इंडस्ट्रीशी संबंधित व्यक्ती फार यशस्वी होतात.

अनेक यशस्वी व्यक्तींच्या नावाची सुरुवात R या अक्षराने होते. विशेषत : मीडिया, डिझाइन, ग्लॅमर, क्रीडा आणि संगीत क्षेत्रात अशा व्यक्ती आढळतात. या व्यक्ती वास्तव मूल्यं आणि सद्गुणांचं कौतुक करतात आणि आपली तत्त्वं अतिशय व्यावहारिक पद्धतीनं वापरतात. या व्यक्ती स्वतःला मदत करतात; पण इतरांनाही मदत करायला त्यांची हरकत नसते. त्या उदार आणि दानशूर स्वभावाच्या असतात. त्यांना सुखसोयी आणि समृद्धीसह जीवन जगण्याची इच्छा असते. त्यासाठी या व्यक्ती कठोर परिश्रम करतात. या व्यक्ती पैसे कमावण्याच्या कल्पक साधनांचा अवलंब करत नाहीत.

R या अक्षराने ज्या व्यक्तींच्या नावाची सुरुवात होते त्या मोठ्या मनाच्या असतात आणि समाजात प्रतिष्ठित पदावर पोहोचतात. या व्यक्ती फार स्वाभिमानी असतात. या अक्षरानं नावाची सुरुवात असलेल्या स्त्रियांना घरकाम करण्याची आवड असते. त्यांनी शारीरिक व्यायाम केला पाहिजे. अन्यथा आरोग्याच्या समस्या जाणवतील. या व्यक्ती हसतमुख असतात आणि इतरांनाही हसवतात. त्यामुळे कुटुंबामध्ये त्या आवडीच्या असतात.

R अक्षरापासून नाव सुरू होणारी मुलं शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लोकप्रियता मिळवतात. या व्यक्ती डिझायनिंग, कम्प्युटर, स्पोर्ट्स, ज्योतिष, वेदिक सायन्स, खगोलशास्त्र, संगीत, डान्स या क्षेत्रात चांगली कामगिरी करतात. शिक्षण व्यवसाय, टेक्नॉलॉजी, ट्रेनिंग, फायनान्स, प्रिंटिंग, पब्लिकेशन, मेडिसिन, डिटेक्टिव्ह सर्व्हिस, क्रीडा उत्पादनं, इलेक्ट्रॉनिक वस्तू, धातू, खाद्यपदार्थ, चैनीच्या वस्तू, मनोरंजन व्यवसाय, हार्डवेअर, कंत्राटी कामं, रासायनिक वस्तू, गॅस एजन्सी, जहाजं, प्लायवूड फर्निचर या क्षेत्रांतल्या व्यवसायांसाठी R अक्षरापासून सुरू होणारं नाव वापरल्यास मोठ्या प्रमाणात यश मिळू शकतं.

शुभ रंग : Red and Pink

शुभ दिवस : मंगळवार

शुभ अंक : 9

उपाय :

1. सकाळी तुमच्या उजव्या हाताच्या अनामिकेनं कपाळाला चंदन किंवा कुंकू लावा.

2. वर्षातून एकदा मंगळ पूजा करा.

3. आश्रमात किंवा भिकाऱ्यांना लाल मसूर दान करा.

4. घराच्या पूर्व भिंतीवर 9 रॉडचं विंड चाइम लावा.

5. महिलांनी लाल बांगड्या घालाव्यात.

6. मांसाहार, मद्य, तंबाखू आदी बाबी टाळा. प्राण्यांच्या चामड्यापासून तयार केलेल्या वस्तूंचा वापर टाळा.

First published:

Tags: Astrology and horoscope, Numerology