कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Thursday, August 11, 2022

हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण कुटुंबातील छोट्यांशी मिळून मिसळून राहून त्यांच्याशी थट्टा मस्करी सुद्धा कराल. काही जुन्या मित्रांशी संपर्क सुद्धा होतील, व त्यामुळे आपले मन प्रसन्न होईल. आपण प्रवासासाठी खूप वेळ द्याल. आठवड्याच्या मध्यास आपण कुटुंबियांसह बसून त्यांची सुख - दुःख ऐकून घेऊन आपले मन सुद्धा हलके कराल. आठवड्याच्या अखेरीस आपण आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित कराल. प्राप्तीत वाढ करण्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करू शकाल. हा आठवडा प्रेमीजनांसाठी सामान्यच आहे. आपणास आपल्या संबंधात साधेपणाने वाटचाल करावी लागेल. तसेच आपल्या प्रेमिकेच्या इच्छांचा आदर करावा लागेल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात खूपच खुश राहतील. आपल्या वैवाहिक जोडीदाराच्या इच्छा पूर्ण होत असल्याचे त्यांना जाणवेल. व्यापाऱ्यांना व्यापारात खूप मोठा नफा होताना दिसल्याने ते अत्यंत आनंदित होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामात प्रगती करू शकतील. कामा निमित्त आपणास ठिकठिकाणी प्रवास करावा लागण्याची संभावना आहे. प्रकृती चांगली राहील. खर्च कमी झाल्याने आर्थिक दृष्ट्या आपण मजबूत व्हाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत करावी लागेल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:22 to 15:59

यमगंड:06:14 to 07:51

गुलिक काळ:09:29 to 11:06