कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Saturday, January 28, 2023

हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा उपभोग घेऊ शकतील. जोडीदाराच्या कुटुंबियांशी सुद्धा सलोख्याचे संबंध राहतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा काहीसा चांगला आहे. आधीपासून असलेल्या समस्या निवळू लागतील. ह्या आठवड्यात खर्चात वाढ झाल्याने आपल्या चिंतेत भर पडेल. प्राप्ती सामान्यच राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्ती कामाचा आनंद घेऊ शकतील. ते आपल्या कौशल्याचा चांगला वापर करू शकतील. व्यापारात सुद्धा आपली तुतारी वाजत राहील. आपणास नशिबाची साथ सुद्धा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा यशदायी आहे. मेहनत केल्यास एखाद्या स्पर्धेत यशस्वी होता येईल. आठवड्याच्या मध्यास मानसिक तणाव वाढेल. एखाद्या गोष्टीने आपण चिंतीत व्हाल. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:साध्य​

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:06 to 11:29

यमगंड:14:15 to 15:38

गुलिक काळ:07:20 to 08:43