कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Thursday, January 27, 2022

हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला असून आठवड्याची सुरवात आपण खूप ऊर्जेने करू शकाल. आपल्यातील भरपूर उत्साहामुळे आपणास कार्यात यश प्राप्त होईल. कौटुंबिक जीवनात प्रेम व स्नेह भावना असल्याचे दिसून येईल. एकमेकांची काळजी घ्याल. कामाच्या बाबतीत आपण यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती लक्षपूर्वक काम करतील, परंतु इतर लोक त्यांची चूक शोधण्याचा प्रयत्न करू शकतील. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी चांगला आहे. आपणास कामात यश मिळून प्राप्तीत वाढ होईल. आपला फायदा वाढेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सामान्य राहील. आपसात काही मतभेद होण्याची शक्यता आहे. प्रेमीजनांच्या जीवनात चढ - उतार येतील. आपणास आपल्या भावना प्रिय व्यक्तीस व्यक्त करून दाखविण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रतेचा अभाव जाणवेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29