कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

साप्ताहिक मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Monday, September 26, 2022

हा आठवडा आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरेल. आठवड्याच्या सुरवातीस काही खर्च झाले तरी ते आवश्यकच असतील. आपणास आपल्या कामात नावीन्य जाणवेल. आपला व्यवसाय योग्य दिशेने वाटचाल करत असून आपल्या नफ्यात वाढ करवून देणारा आहे. आपण सरकारी लाभ सुद्धा मिळवू शकाल. तेव्हा प्रयत्न करत राहावे. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात नैपुण्य मिळवू शकतील. आपणास वरिष्ठांचे सहकार्य मिळू शकेल. परंतु आपल्या कामाचा भार वाढण्याची संभावना सुद्धा आहे. असे असले तरी आगामी काळात आपणास त्याचा फायदा होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. आपण अहंकाराने कोणताही अपशब्द बोलणे टाळावे. प्रेमीजन आपल्या प्रणयी जीवनात खूप खुश राहतील. विद्यार्थी अभ्यासाकडे अधिक लक्ष देतील. आपणास आपल्या शिक्षणा संबंधी एखाद्याचे मार्गदर्शन सुद्धा मिळू शकेल. त्यामुळे आपण अभ्यासात प्रगती करू शकाल. आठवड्याचे मधले दिवस व अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31