कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Thursday, August 11, 2022

हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. परंतु आपणास सर्दी, खोकला किंवा ताप येण्याची शक्यता असल्याने आपल्याला आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बदलत्या ऋतुमानात स्वतःची काळजी घ्यावी. समतोल आहार घ्यावा. एखादा अपघात संभवतो. हा महिना प्रेमीजनांच्या जीवनात चढ - उतार आणणारा आहे. जर आपले ब्रेकअप झाले असेल तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात पुन्हा येण्याची संभावना आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन खूपच चांगले असेल. आपण वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. आपल्या वैवाहिक जोडीदारासह बाहेरगावी जाण्याची योजना आखू शकाल. असे केल्याने आपल्यातील जवळीक वाढेल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी खूपच चांगला आहे. आपल्या कामास गती येईल. कुशल कार्यक्षमतेमुळे आपण आपला व्यवसाय नफा मिळवून देणारा करू शकाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. नशिबाची साथ मिळाल्याने त्यांची कामगिरी उत्तम होईल. त्यांना बढती मिळण्याची तसेच थोडा फायदा होण्याची संभावना सुद्धा आहे. खर्चात मात्र वाढ होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल, त्यांचे मन अभ्यासापासून विचलित होण्याची संभावना असल्याने त्यांना अधिक कष्ट करावे लागतील. ह्या महिन्याचा पहिला व तिसरा आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:आयुष्यमान

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:22 to 15:59

यमगंड:06:14 to 07:51

गुलिक काळ:09:29 to 11:06