कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Thursday, January 27, 2022

हा महिना आपल्यासाठी खूपच चांगला आहे. वर्षाची सुरवात आपल्यासाठी अत्यंत चांगली होणार आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण आपल्या प्राप्तीत वाढ करू शकाल. विद्यार्थी आपल्या अभ्यासाच्या बाबतीत सतर्क राहिले व एखादा विषय त्वरित लक्षात ठेवू शकले तरी सुद्धा त्यांच्या अध्ययनात काही अडथळे येण्याच्या शक्यतेमुळे त्यांना अभ्यासाच्या बाबतीत गंभीरपणे लक्ष द्यावे लागेल. आपले आरोग्य उत्तम राहील. त्याचा आपणास फायदा होईल. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या बाबतीत काही समस्यांना सामोरे जावे लागेल व त्यामुळे आपण नोकरी बदलण्याचा विचार सुद्धा करू लागाल. व्यापाऱ्यांसाठी हा महिना प्रतिकूल असल्याने त्यांनी सावध राहावे. त्यांचे खर्च वाढण्याची व प्राप्ती कमी होण्याची संभावना आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन चढ - उताराने भरलेले असेल. संबंधात माधुर्य आणण्यासाठी आपणास प्रयत्न करावे लागतील. हा महिना प्रेमीजनांसाठी सामान्य आहे. संवाद हाच आपल्या संबंधाचा आधार असेल. महिन्याचा तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे. कुटुंबात एखादी चांगली घटना घडल्याने कुटुंबीय आनंदात असतील. कुटुंबातील लहान मुलांचे आरोग्य बिघडण्याची संभावना असल्याने आपणास त्यांची काळजी घ्यावी लागेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:15 to 15:37

यमगंड:07:21 to 08:44

गुलिक काळ:10:06 to 11:29