कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

मासिक मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Monday, September 26, 2022

हा महिना अनेक बाबतीत आपणास चांगला आहे. आपली कार्यक्षमता वाढेल. आपल्या आरोग्यात सुधारणा होईल. आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता प्रबळ होईल. आपले डोके शीघ्र गतीने चालल्याने अवघड समस्यांचे निराकरण सुद्धा आपण त्वरित करू शकाल. एखाद्या कारणाने कुटुंबात एखादी समस्या निर्माण होण्याची संभावना असून त्याकडे थोडे दुर्लक्ष करावे. ह्या समस्यांमुळे आपल्या मानसिक चिंता वाढू नयेत म्हणून ह्या समस्यांत आपण हस्तक्षेप करणे टाळावे. खर्चात वाढ होईल. त्यावर आपणास अधिक लक्ष ठेवावे लागेल. ह्या महिन्यात कार्यक्षम आर्थिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी चांगला आहे. आपल्या चिकाटीमुळे आपण आपल्या कामात अग्रस्थानी राहाल. व्यापाऱ्यांना सुद्धा ह्या महिन्यात फायदा होऊ शकेल. त्यामुळे आपल्या व्यवसायावर खूप लक्ष द्यावे कि ज्यामुळे आपणास अधिक फायदा घेता येऊ शकेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. अधून मधून आपल्यात विज्ञान व धर्म यांच्यावर चर्चा होण्याची संभावना आहे. आपला वैवाहिक जोडीदार धार्मिक विचाराने प्रभावित होऊन आपल्याशी चर्चा करेल. आपण त्याने आनंदित तर व्हालच शिवाय त्याने कुटुंबात सुद्धा आनंद नांदेल. आपण एकमेकांच्या सहवासात भावुक व्हाल. प्रेमीजन आपल्या संबंधांप्रती गंभीर होऊन संबंध टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. परंतु आपल्या कष्टाचे चीज होईल. ह्या महिन्याचे पहिले दोन आठवडे प्रवासास अनुकूल आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31