कन्या   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

वार्षिक मराठी राशीभविष्य(कन्या राशी)

Saturday, March 25, 2023

हे वर्ष आपल्यासाठी मिश्रा फलदायी आहे. ह्या वर्षी आपणास सर्वात जास्त आपल्या कुटुंबाची काळजी वाटेल. काही गोष्टी अशा असतील कि ज्या कौटुंबिक वातावरण बिघडवण्यास कारणीभूत ठरू शकतील. आपला व्यवहार सुद्धा लोकांना समजू शकणार नाही. आपले म्हणणे काय आहे व आपणास काय करावयाचे आहे ते त्यांना समजणार नाही. आपल्या बोलण्या - वागण्यात फरक जाणवल्याने आपले कौटुंबिक संबंध बिघडण्याची संभावना आहे. ह्याकडे आपणास लक्ष द्यावे लागेल. प्रॉपर्टीशी संबंधित बाबीत आपणास यश प्राप्ती होऊ शकते. ह्या वर्षी आपण एखादी मोठी प्रॉपर्टी खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकता. वर्षाच्या मध्यास वैवाहिक जोडीदाराच्या मदतीने आपण एखादे मोठे वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. सासुरवाडी कडील लोकांशी वाद होण्याची संभावना असल्याने वर्षाचे सुरवातीचे दिवस धीराने घालवण्याचा प्रयत्न करा. ह्या वर्षाचा एप्रिल महिना प्रवासासाठी अत्यंत अनुकूल आहे. त्या नंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात प्रवास करून आपण आनंदित व्हाल. ह्या प्रवासांमुळे आपण खुश व्हाल. आपल्या लोकांसह प्रवास केल्याने आपले मन सुद्धा आनंदित होईल. वर्षाच्या सुरवाती पासूनच आपणास मित्रांचा पाठिंबा मिळेल. वर्षाच्या सुरवातीस शासना कडून सुद्धा काही चांगला लाभ मिळू शकतो. वडिलांशी आपले मतभेद होण्याची संभावना असल्याने त्यांच्याशी संबंध सुधारण्याकडे लक्ष द्यावे. सध्या आपण आपल्या प्रकृतीच्या बाबतीत काहीसे उदासीन असाल, तेव्हा त्याकडे थोडे लक्ष द्यावे. ह्या वर्षी आपणास यश प्राप्त होईल. आपल्या मनात नव - नवीन विचार येऊन आपण आपल्या व्यवसायात प्रगती साधू शकाल. सध्या नोकरी करणाऱ्या व्यक्ती एखादा व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतील, परंतु सध्या आपण नोकरीच करावी असा सल्ला आपणास देण्यात येत आहे. आपणास जर व्यवसायच करावयाचा असेल तर जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न करावा. ह्या व्यतिरिक्त आपण पहिल्या पासूनच जर व्यवसाय करत असाल तर आपण आपल्या व्यवसाया बरोबर जोड व्यवसाय करण्याचा प्रयत्न सुद्धा करू शकता. म्हणजे एकाहून अधिक व्यवसाय केल्यास यश मिळेल. आपणास आपल्या मातेचा पाठिंबा मिळेल व त्यांच्या आशीर्वादाने व आर्थिक मदतीने सुद्धा आपण आपल्या व्यवसायात प्रगती साधू शकाल. आपण जर राजकारण किंवा कायद्याशी संबंधित क्षेत्रात कार्यरत असाल तर ह्या वर्षी आपणास एखादे मोठे यश मिळू शकेल कि ज्यामुळे आपणास व आपल्या कुटुंबास आनंद साजरा करण्याची संधी मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह असतो. कन्याचे जातक प्रचंड कष्ट करतात, ते कायम दुसऱ्यांना मदत करण्यात आघाडीवर असतात. मूलभूत गोष्टींवर विश्वास आणि नम्रता ही कन्या राशीच्या लोकांची वैशिष्ट्य आहेत.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:39

आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्थी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:42 to 11:14

यमगंड:14:17 to 15:49

गुलिक काळ:06:39 to 08:11